आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Miraj Had Carried Out An 'air Strike' In Pakistan, While Raphael Is Feared By China; So France Is An Important Country

दिव्य मराठी एक्सप्लेनर:मिराजनेच केली होती पाकिस्तानात ‘एअर स्ट्राइक’ तर राफेलला घाबरतो चीन; त्यामुळे फ्रान्स भारतासाठी महत्त्वाचा देश

नवी दिल्ली | अभिषेक पाण्डेय20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचणार आहेत. यापूर्वी मोदींनी जर्मनी आणि डेन्मार्कला भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींचा या वर्षातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. 24 एप्रिल रोजी इमॅन्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या निवडणुकीत अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर मोदींच्या फ्रान्स दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.

भारताचे फ्रान्ससोबतचे संबंध अतिशय जवळचे आहेत. 1998 मध्ये, दोन्ही देशांत धोरणात्मक भागीदारीला सुरूवात झाली होती. ज्यामध्ये संरक्षण आणि सुरक्षा, सहकार्य, अंतराळ सहकार्य आणि नागरी आण्विक सहकार्य यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

फ्रान्स दीर्घकाळापासून भारताचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. अलीकडेच भारत आणि फ्रान्समधील राफेल लढाऊ विमान कराराची खूप चर्चा झाली. याशिवाय फ्रान्सचे मिराज लढाऊ विमान हे भारतीय हवाई दलाचे दीर्घकाळापासून बलस्थान आहे.

अशा परिस्थितीत फ्रान्स भारतासाठी खूप महत्त्वाचा का आहे? हे जाणून घेऊया. फ्रान्सच्या कोणत्या प्रमुख शस्त्रांमुळे भारताची ताकद वाढली आहे? गेल्या अनेक वर्षांपासून फ्रान्स भारताला कसा पाठिंबा देत आहे?

फ्रान्स भारताचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार

भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार असून भारत रशियाकडून बहुतांश शस्त्रास्त्रे खरेदी करतो. असे असले तरी गेल्या काही वर्षांत भारताने फ्रान्सकडूनही प्रचंड शस्त्रे खरेदी केली आहेत.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार, 2017-2021 दरम्यान फ्रान्स रशियानंतर भारताला शस्त्रास्त्र पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश होता. 2016-2020 या कालावधीत फ्रान्सकडून भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीत 709% वाढ झाली आहे.

या अहवालानुसार, 2017-2021 या कालावधीत रशियाकडून भारताच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा 47% नी कमी झाला आहे, तर या कालावधीत फ्रान्सकडून भारताची शस्त्र खरेदी 10 पटीने वाढली आहे.

मिराजपासून राफेलपर्यंत: फ्रान्सने भारताला कोणती प्राणघातक शस्त्रे दिली?

फ्रान्सने भारताला अनेक घातक शस्त्रे पुरवली आहेत. यामध्ये मिराजपासून राफेलपर्यंतच्या प्राणघातक लढाऊ विमानांचा समावेश आहे. मिराजच्या मदतीनेच भारताने 1999 मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानला चपराक दिली होती. त्याचवेळी राफेलच्या क्षमतेने चीनही हादरला होता. फ्रान्सने भारताला दिलेल्या प्रमुख शस्त्रास्त्रांवर एक नजर टाकूया.

राफेल : 2016 मध्ये, भारताने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 7.87 अब्ज युरो, म्हणजे सुमारे 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. फेब्रुवारी 2022 पर्यंत भारताकडे 35 राफेल आहेत.

मिराज बनवणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशननेही राफेलची निर्मिती केली आहे. राफेल हे जगातील सर्वात आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे, जे अनेक प्राणघातक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. अंतराच्या दृष्टीने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या जवळ असलेल्या भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर ते तैनात करण्यात आले आहे.

राफेल प्रामुख्याने वेग, शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आणि हल्ला करण्याची क्षमता यासाठी ओळखले जाते. हे सिंगल आणि ड्युअल सीटर दोन्ही पर्यायांसह येते. भारताने 28 सिंगल आणि 8 ड्युअल सीटर राफेल खरेदी केले आहेत.

राफेलची स्ट्राइक रेंज 3,700 किमी आहे. यामध्ये तीन प्रकारची क्षेपणास्त्रे बसवता येतील. हवेतून हवेतील मीटियोर, हवेतून पृष्ठभागावरील स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रे.

राफेल सुरू होताच अवघ्या एका सेकंदात 300 मीटरची उंची गाठू शकते. म्हणजेच एका मिनिटात राफेल 18 हजार मीटरची उंची गाठण्यास सक्षम आहे. त्याचा ‘रेट ऑफ क्लाइंब’ चीन-पाकिस्तानजवळ असलेल्या आधुनिक लढाऊ विमानांपेक्षाही चांगला आहे.

राफेल हे चीनच्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान J20 आणि पाकिस्तानच्या F-16 पेक्षा अनेक बाबतीत सरस आहे. चीनच्या J20 ला प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नाही, तर फ्रेंच हवाई दलाने अफगाणिस्तान, लिबिया आणि मालीमध्ये राफेलचा वापर केला आहे. त्याचबरोबर राफेल युद्धात अमेरिकेत बनवलेल्या पाकिस्तानी F-16 फायटर प्लेनलाही पराभूत करू शकते.

राफेल हे ओमनी रोल लढाऊ विमान आहे, जे पर्वतावर अगदी लहान जागेत उतरवता येते आणि समुद्रात फिरणाऱ्या युद्धनौकेवरही उतरवता येते.

राफेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हवेत उडताना इंधन भरणे. एकदा इंधन भरल्यावर ते 10 तास सतत उडू शकते.

मिराज 2000: हे भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम आणि प्राणघातक लढाऊ विमानांपैकी एक आहे. मिराज-2000 ही फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवले आहे. या विमानाने 1978 मध्ये पहिले उड्डाण केले आणि 1984 मध्ये फ्रेंच हवाई दलात सामील झाले. 1985 मध्ये मिराजचा प्रथम भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला होता. भारतीय हवाई दलाने याला वज्र असे नाव दिले आहे.

भारताने 1982 मध्ये फ्रान्सकडून 36 सिंगल सीटर आणि 4 ट्विन सीटर मिराज 2000 खरेदीची ऑर्डर दिली होती. पाकिस्तानने अमेरिकेकडून F-16 लढाऊ विमाने खरेदी केल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. भारताने 2004 मध्ये आणखी 10 मिराजच्यााा खरेदीसाठी ऑर्डर दिली, ज्यामुळे भारतीय हवाई दलातील मिराजची संख्या 50 झाली.

1999 मध्ये कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिराजने पाकिस्तानी लष्कराचे अनेक बंकर उद्ध्वस्त केले होते. 2020 मध्ये, भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना लक्ष्य करून हवाई हल्ल्यांमध्ये मिराजचा वापर केला.

SEPECAT जग्वार: जग्वार लढाऊ विमान ब्रिटिश रॉयल एअर फोर्स आणि फ्रेंच एअर फोर्स यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. आता जग्वारची अपग्रेडेड आवृत्ती फक्त भारतीय हवाई दल वापरत आहे. भारताने 1978 मध्ये जग्वारची पहिली ऑर्डर दिली आणि 1981 मध्ये 35 जग्वारची पहिली खेप मिळाली.

90 च्या दशकात जग्वार देशाच्या हवाई संरक्षणात एक बलस्थान राहिले आणि त्यांनी पाळत ठेवणे आणि बॉम्बफेक या दोन्हींसह अनेक लढायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत कमी उंचीवर उडण्याची, रडारला चकमा देण्याची आणि लक्ष्यांवर अचूक लक्ष्य ठेवण्याची त्याची क्षमता त्याला विशेष बनवते.

भारतीय वायुसेनेमध्ये ते समशेर म्हणून ओळखले जाते. जग्वारचा वापर प्रामुख्याने भारतीय वायुसेना ग्राउंड अॅटॅक एअरक्राफ्ट म्हणून करते. भारतीय जग्वार ब्रिटीश जग्वारपेक्षा थोडे वेगळे आहे, ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे यूके आणि फ्रान्ससोबतच्या परवाना करारांतर्गत स्वदेशी पद्धतीने बनवले जाते. IAF ने अलीकडेच त्यांच्या जग्वार फ्लीटमध्ये एव्हीओनिक्स सपोर्ट जोडून अपग्रेड केले आहे.

HAMMER क्षेपणास्त्र: हॅमर म्हणजेच हायली एजाइल मॉड्यूल म्युनिशन एक्स्टेंडेड रेंज हे हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, जे फ्रान्सच्या Safran ग्रुपने विकसित केले आहे.

हॅमर हे फायर एंड फरगेट क्षेपणास्त्र आहे आणि ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. ते हलणारे आणि स्थिर अशा दोन्ही प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.

हॅमरमध्ये 125 किलो ते 1,000 किलोपर्यंतचे विविध प्रकारचे बॉम्ब बसवता येतात.

भारताने नुकतेच फ्रान्ससोबत लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसमध्ये जोडण्यासाठी हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी करार केला आहे. फ्रान्सने भारताला राफेलसह काही हॅमर क्षेपणास्त्रे दिली आहेत.

तेजसमध्ये हॅमर क्षेपणास्त्र संमलित केल्याने, ते 70 किमी पर्यंतच्या अंतरावरील जमिनीवरील लक्ष्य आणि मोठे बंकर नष्ट करण्यास सक्षम असेल.

चीनसोबत नुकत्याच झालेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले आहे. हॅमर क्षेपणास्त्र कमी उंचीवर आणि भारत-चीन सीमेवरील डोंगराळ भागात वापरता येऊ शकते.

स्कॉर्पीन-क्लास पाणबुडी: 2005 मध्ये भारताने स्कॉर्पीन-क्लास पाणबुडी बनवण्यासाठी फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपसोबत 3.75 अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे 28.6 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या पाणबुड्या माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने फ्रान्सच्या सहकार्याने बनवल्या आहेत.

एप्रिल 2022 मध्ये, भारताने स्कॉर्पीन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी INS वागशीर लाँच केली आहे, जी 2024 पर्यंत भारतीय नौदलात सामील होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय नौदलाने स्कॉर्पीन पाणबुडीच्या नौदलाच्या प्रकल्प 75 अंतर्गत डिसेंबर 2017 मध्ये INS कलवरी म्हणून पहिली पाणबुडी समाविष्ट केली होती.

या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत - INS कलवरी (डिसेंबर 2017), INS खांदेरी (सप्टेंबर 2019), INS करंज (मार्च 2021) आणि INS वेला (नोव्हेंबर 2021). पाचवी पाणबुडी INS वगीर नोव्हेंबर 2020 मध्ये भारतात लाँच करण्यात आली आणि त्याची चाचणी सुरू आहे, 2022 च्या अखेरीस ती नौदलात सामील होण्याची अपेक्षा आहे.

स्कॉर्पिन-श्रेणीच्या पाणबुड्या विविध प्रकारच्या लढाऊ मोहिमा करू शकतात. या पाणबुड्यांचा वापर पृष्ठभागविरोधी, पाणबुडीविरोधी युद्ध, विशेष ऑपरेशन्स, गुप्तचर माहिती गोळा करणे यासाठी होऊ शकतो.

डिसेंबर 2017 मध्ये भारतीय नौदला समावेश झालेली INS कलवरी फ्रान्सच्या सहकार्याने निर्मिती झालेली सर्वात पहिली स्कॉर्पीन क्लास पाणबुडी आहे.
डिसेंबर 2017 मध्ये भारतीय नौदला समावेश झालेली INS कलवरी फ्रान्सच्या सहकार्याने निर्मिती झालेली सर्वात पहिली स्कॉर्पीन क्लास पाणबुडी आहे.
बातम्या आणखी आहेत...