आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Carrier Funda । Four Lessons For Us In Modern Times From Alexander The Great । Exam Preperations, Vision, Thinking,

करिअर फंडा:अलेक्झांडरने पोरसशी केले होते युद्ध, आधुनिक काळात आपल्यासाठी चार धडे- जो जिंकला तोच सिकंदर

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधने4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“तलवारीच्या जोरावर आपण जे काही मिळवतो ते निश्चित वा स्थायी असू शकत नाही, पण दया आणि संयमाने प्राप्त प्रेम निश्चित आणि टिकाऊ आहे.” - अलेक्झांडर द ग्रेट

करिअर फंडामध्ये स्वागत!

एक तरुण, जग जिंकण्याचे स्वप्न घेऊन निघाला

बहुधा अलेक्झांडरने वर दिलेले विचार आणि अशाच इतर विचारांमुळे तो इतिहासाच्या पानांमध्ये महान म्हणून ओळखला जातो. भारतात या राजाला पोरसशी युद्धासाठी ओळखले जाते.

A. अवघ्या 20 वर्षांचा एक तरुण 40,000 सैनिकांच्या सैन्यासह विश्वविजयाचे स्वप्न घेऊन आपला देश मेसेडोनियातून निघतो, 20 मोठी युद्ध आणि शेकडो छोट्या लढाया जिंकत एक-एक करून वाटेत येणाऱ्या सर्व राज्यांचा पराभव करतो, यावर तुमचा विश्वास बसेल?
B. त्याचे सैन्य घोड्यांच्या पाठीवर बसून तब्बल 17,000 मैलांचा प्रवास करून त्या काळी जगाचा शेवट समजल्या जाणाऱ्या किनाऱ्याला अर्थात झेलम नदीपर्यंत पोहोचतो, यावर तुमचा विश्वास बसेल? हे आजच्या काळात इतक्या लोकांना चंद्रावर नेण्यासारखे आहे, असे इतिहासकारांचे मत आहे.
C. हाच तरुण वयाच्या 32व्या वर्षापर्यंत जग जिंकतो, यावर तुमचा विश्वास आहे का? बरं, तेव्हा अनेकांना पृथ्वी सपाट वाटायची!

तर मग चला, आज जाणून घेऊया की, एका अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वापासून आपण मॉडर्न लाइफमध्ये काय शिकू शकतो.

अलेक्झांडर ऑफ मॅसेडोनिआच्या आयुष्यातून चार मोठे धडे

1) जीवनात चांगले टीचर/मेंटर्सचे महत्त्व– अलेक्झांडरचा जन्म मेसेडोनियाचा (वर्तमानात युरोपचा एक देश) राजा फिलिप II च्या घरी इसवी सनपूर्व 356 मध्ये झाला.

A. त्याचे वडील एक यशस्वी आर्मी कमांडर होते आणि युद्ध तसेच लष्कर संचलन त्याने आपल्या वडिलांकडूनच शिकले.
B. अलेक्झांडरच्या आईचे नाव ओलम्पिया होते, तसेच त्या नेहमीच अलेक्झांडरला महान बनण्याची प्रेरणा द्यायच्या.
C. एका राजाच्या घरात जन्म घेण्याचा अलेक्झांडरचा सर्वात मोठा फायदा कोणता असेल तर त्याला त्या काळातील सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकण्याची संधी मिळाली- हो, त्याचे शिक्षण होते प्रसिद्ध तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल.
D. खुद्द अलेक्झांडरच्या शब्दांत “मी जीवनासाठी माझ्या वडिलांचा ऋणी आहे, पण चांगले जगण्यासाठी माझ्या शिक्षकाचा."
E. अॅरिस्टॉटलच्या शिकवणीमुळेच अॅलेक्झांडरला लॉजिकली विचार करणे, कारणे आणि उपायांवर काम करणे, आणि एक असा विचार विकसित करण्यात मदत मिळाली जो काळाच्या पुढे होता. याच कारणामुळे त्याला आपले विश्वविजयाचा दृष्टिकोन निश्चित करता आला.

2) वैज्ञानिक विचार– अलेक्झांडरने अनेक मिलिटरी इन्व्हेंशन्सना सपोर्ट केला

A. सीझ मशीनरी उदा. सीझ टॉवर इत्यादी त्याच्या वडिलांच्या काळापासूनच लष्करात वापरात येत होते. अलेक्झांडरने तिचे आधुनिकीकरण केले, टायरच्या युद्धात त्यांचा वापर उल्लेखनीय आहे.
B. त्याच्या चीफ इंजीनियरचे नाव डियोड्स होते. डियोड्सने किल्ल्याच्या भिंती तोडण्यासाठी 'ट्रूपेनॉन' नावाचा बोरर, डिफेन्सला मागे ढकलण्यासाठी ग्रेपलिंग मशीन, सैनिकांना सीज टॉवरहून किल्ल्याच्या भिंतीवर चढण्यासाठी 'ड्रॉब्रिज'चे प्रगत व्हर्जन, तथा 'स्टोन थ्रोअर', 'लिथोबोलोली'चे प्रगत व्हर्जन तयार केले.
C. अशा प्रकारे सतत नवे शोध लावत राहिल्याने त्या काळात अलेक्झांडरला खूप फायदा झाला.

3) करिझ्मा आणि सोशल इंटेलिजन्स– अलेक्झांडरचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक होते

A. तो आपल्या सैनिकांसाठी देवासमान होता. जिंकल्यावर तो आपल्या सैनिकांना पुष्कळ धन पुरस्काराच्या स्वरूपात द्यायचा- इतके की पर्शियात त्याला 'दानशूर सिकंदर' म्हटले गेले.
B. तो आपल्या सैनिकांना नावानिशी पुकारायचा आणि बहादुरीचा सन्मान करायचा. त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायचा.
C. बहुतांश वेळा अलेक्झांडरचे सोशल इंटेलिजन्स खूप अचूक राहिले, केवळ एकवेळचे सोडून जेव्हा त्याने आपल्या एका सीनियर मिल्ट्री कमांडर 'पेर्मेनियन'चा छोट्याशा वादानंतर 'मर्डर' केला होता.
D. यानंतर त्याच्या लष्करात बंडही झाले होते.

4) जास्त लवचिक योजना– एशिया माइनरपासून ते इजिप्त आणि भारतापर्यंत, सिकंदरच्या विजयाने त्याला विविध प्रकारच्या सैन्यांविरुद्ध उभे केले आणि त्याला अनेकविध संस्कृतींच्या संपर्कात आणले.

A. सतत बदलणारे सैन्य, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक परिदृश्याचा मुकाबला करण्यासाठी त्याने काळजीपूर्वक योजना आखली, माहितीच्या प्रत्येक भागाचे विश्लेषण केले आणि जेवढे शक्य असतील तेवढे पर्याय तयार केले, ज्यामुळे त्याला आपली स्थिती आणि पर्यावरणाच्या आधारावर आपली रणनीती बदलता आली.
B. उदाहरणासाठी, इसवी सनपूर्व 334 मध्ये ग्रॅनिकसच्या युद्धानंतर सिकंदरने मिलिटसच्या किनारी शहराला वेढा टाकला. स्वीकृत सैन्य ज्ञानानुसार नौदलाचा हल्ला करायचा होता. पण अलेक्झांडरने या गोष्टीचा अंदाज घेतला की, किल्ल्याच्या भिंती समुद्राजवळील जमिनीवर उभारल्या आहेत, त्याने नौदलाचा हल्ला केला नाही.
C. याऐवजी सीज इंजिनांनी मिलेटस किल्ल्याच्या भिंतींवर हल्ला चढवला. बॉम्बवर्षावामुळे भिंती लवकरच कोसळल्या.

अलेक्झांडरचा प्रभाव

अलेक्झांडरच्या मोहिमेनंतर जग पहिल्यासारखे नाही राहिले.

त्याच्या अभियानामुळे पूर्व आणि पश्चिमेतील व्यापार संबंधांचा मार्ग उघडला. त्याने या मार्गावर अनेक शहरे वसवली होती, रोमन साम्राज्याची स्थापनाही सिकंदरच्या विजयांवर आधारित होती, सिकंदरच्या विजयाने लोकांना विज्ञानाचे अध्ययन करण्याची प्रेरणा जागवली.

अलेक्झांडरचा मृत्यू फक्त 32 वर्षे वयात, इसवी सनपूर्व 323 मध्येच झाला होता.

आजचा करिअर फंडा आहे की, अलेक्झांडरप्रमाणे इंटेलिजन्स, सायंटिफिक अप्रोच, लॉजिकल थिंकिंग, दृढता, व्हिजनच्या बळावर वयाच्या कितीतरी पुढे जाऊन यश मिळवले जाऊ शकते.

करून दाखवू!

बातम्या आणखी आहेत...