आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Central Governments 'online' Watch On Sweet Shops From Today ; If The Turnover Is Over Rs 12 Lakh, Then Confectionery Traders Will Have To Hire A Chemistry Expert.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:12 लाख रुपयांवर उलाढाल असेल तर मिठाईच्या व्यापाऱ्यांना नेमावा लागणार केमिस्ट्री विषय तज्ज्ञ

मनोज व्हटकर | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिठाई दुकानांवर आजपासून केंद्राची ‘ऑनलाइन’ नजर; दर्जासह व्यवहारही कक्षेत

दिवाळी तोंडावर असतानाच मिठाई व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथाॅरिटी ऑफ इंडियाने (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) ‘फोसकोस’ हे पोर्टल आणले आहे. आता एक नाेव्हेंबरपासून तपासणी, आर्थिक व्यवहार (जीएसटीद्वारे), उत्पादनांचा दर्जा यावर थेट नजर राहील. वार्षिक उलाढाल १२ लाखांपुढे असलेल्या मिठाई दुकानदारांना केमिस्ट्री विषयातील पदवीधर नेमावा लागणार आहे. देशभरात याची अंमलबजावणी होणार आहे.

सरकारने एक ऑक्टोबरपासून बंद डब्यात विक्रीसाठी उपलब्ध मिठाईच्या बॉक्सवर “मॅन्युफॅक्चरिंग डेट’, एक्सपायरी डेट, उपयोग करण्याच्या कालावधीबाबत सूचना देणे, बाजारात विकल्या जाणाऱ्या सुट्या मिठाईचा उपयोगाचा कालावधी ही माहिती ग्राहकांना देणे अनिवार्य केले आहे. त्यानंतर आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने हे नवे नियम जारी केले आहेत.

आता फोसकोस पोर्टल :

मिठाई दुकानदारांसंदर्भात या सर्व बाबी एक नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘फोसकोस’ (फूड सेफ्टी कम्प्लायन्स प्लॅटफॉर्म) या पाेर्टलवर होणार आहेत. त्यांच्या नोंदणी, उत्पादन, इन्स्पेक्शन, आर्थिक उलाढाल, शहर, जिल्हानिहाय कोड सिस्टिम, जिल्हानिहाय अन्न प्रशासनाचे अधिकारी या सर्व नोंदी या पोर्टलवर असतील. परवानाही यावरच मिळेल.

नियमांच्या अंमलबजावणीचा बोजवारा :

गेल्या अनेक वर्षांपासून मिठाई दुकानांसाठी नियमावली आहे. उघड्या मिठाई बाबत अनेक वेळा तक्रारी केल्या गेल्या. पण अन्न औषध प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई होते अन पुन्हा तेच प्रकार सुरू राहतात.

आता तांत्रिक इन्चार्ज आवश्यक

समोसा, कचाेरी, शेव, नमकीन, पनीरसह सर्व खाद्य पदार्थाबाबत हे नियम लागू आहेत. ज्या मिठाई व्यापाऱ्यांची उलाढाल १२ लाखांवर आहे, त्यांना केमिस्ट्री विषयाचा पदवीधर (तांत्रिक इन्चार्ज) नियुक्त करावा लागेल. त्याच्यावर दुकानातील मिठाईच्या दर्जाबाबतची कायदेशीर जबाबदारी राहील. नमकीन, मसाले, आइस्क्रीम, फूड फ्लेव्हर, पनीर, मावा, पॅकिंग वाॅटर व्यवसाय करणाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.