आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंथ​​​​​​​हालेलुया, हालेलुया… जा तुमच्या शरीरातून कॅन्सर निघून गेला:ख्रिश्चन पाद्री करतात स्पर्श करून भूत काढण्याचा दावा, त्यांना फक्त भेटण्याचा खर्च दीड लाखांपर्यंत

चंदीगड येथून मनीषा भल्ला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो लोकांची गर्दी. लोक हालेलुया, हालेलुया, शेर-ए-बब्बर जीसस, शेर-ए-बब्बर जीसस असा जयघोष करत आहेत. काही रडत आहेत तर काही बेशुद्ध पडले आहेत. कोणाची दृष्टी गेली आहे, तर कोणाला पायावर उभे राहता येत नाही. पाद्री त्यांच्या डोक्यावर हात फिरवत आहेत. त्याच्या स्पर्शाने काही लोक जमिनीवर पडतात, तर काही रडू लागतात.

चंदिगडमधील राजपूत भवनचे हे दृश्य आहे. या कम्युनिटी हॉलमध्ये दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हीलिंग प्रेअर किंवा चंगाई सभा आयोजित केली जाते. ख्रिश्चन धर्मात याला एक्सॉर्सिझम (Exorcism) असेही म्हणतात. याद्वारे पाद्री भूतबाधाबरोबरच कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करतात.

जवळपास 10 जण मिळूनही या व्यक्तीला सांभाळू शकत नाहीत. पास्टर म्हणतात की, त्याच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे.
जवळपास 10 जण मिळूनही या व्यक्तीला सांभाळू शकत नाहीत. पास्टर म्हणतात की, त्याच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे.

पंथ मालिकेतील ही हीलिंग प्रेअर आणि एक्सॉर्सिझम नेमके काय आहे, हे समजून घेण्यासाठी मी दिल्लीपासून 250 किलोमीटर दूर चंदीगड सेक्टर 24 येथे पोहोचले.

रविवार, सकाळी 10 वा. राजपूत भवन भरलेले आहे. प्रत्येकाला पाद्रीला स्पर्श करायचा आहे. त्यांना भेटायचे आहे. कधी कधी मधूनच आवाज येतो...

'पास्टर मला ऐकू येत नाही, माझे कान नीट करा.'

'मला दिसत नाही, डोळे नीट करा.'

'माझ्या वडिलांना कर्करोग आहे, त्यांना वाचवा.'

दरम्यान, पाद्री एका महिलेच्या डोक्याला स्पर्श करताता. ती जोरजोरात रडायला लागते. तिच्या ओरडल्याने संपूर्ण सभागृह दुमदुमते. पाद्री म्हणतात, 'दुष्ट आत्मा तिच्या शरीरात वास करतोय. तोच तिला त्रास देतोय.’

पाद्री डोळे बंद करतो आणि काहीतरी बडबडतो. मग हात वर करतो आणि म्हणतो, 'येशूच्या नावाने सोडून दे, हिच्या शरीरातून बाहेर जा... हालेलुया, हालेलुया.' काही वेळाने ती स्त्री शांत होते.

पाद्री पॉल स्टालिन हे प्रोटेस्टंट धर्माचे ज्येष्ठ पाद्री आहेत. ते म्हणतात की येशूने मला सैतानावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दिली आहे.
पाद्री पॉल स्टालिन हे प्रोटेस्टंट धर्माचे ज्येष्ठ पाद्री आहेत. ते म्हणतात की येशूने मला सैतानावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दिली आहे.

हवाई दलात कार्यरत असलेले किशोरी लाल यांना मोठ्या कष्टाने चालता येते. ते म्हणतात, 'मला अर्धांगवायू झाला आहे. शरीर काम करत नाही. बोलण्यातही अडचण येते. पूर्वी समस्या जास्त होत्या. थोडीही हालचाल होत नव्हती. मी फक्त पाद्रीच्या स्पर्शाने चालू आणि बोलू शकतो. मी दर रविवारी इथे येतो. पाद्री सर्व काही ठीक करतील.

पाद्री पॉल स्टालिन हे प्रोटेस्टंट धर्माचे ज्येष्ठ पाद्री आहेत. ते भुते आणि दुष्ट आत्मे घालवण्याचा आणि जादू तोडण्याचा दावा करतात.

प्रोटेस्टंटवाद म्हणजे ख्रिश्चन समाजाचा तो भाग जो कॅथोलिक चर्च आणि त्याच्या पोपवर विश्वास ठेवत नाही. 15 व्या शतकात, जेव्हा कॅथोलिक चर्चवर अत्याचाराचा आरोप होता, तेव्हा मार्टिन ल्यूथरने प्रोटेस्टंट चळवळ सुरू केली. ल्यूथर हे अमेरिकेचे धर्मसुधारक मानले जातात.

मी विचारते की, तुमची प्रक्रिया काय आहे?

पाद्री प्रथम मला एक व्हिडिओ दाखवतात...

यामध्ये एक महिला जोरजोरात ओरडत आहे. ती म्हणतेय, ‘मी हीच्या अंगातून जाणार नाही, अजिबात जाणार नाही. मी हीला खाणार आहे. मी हीच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करीन. मी सगळ्यांना मारायला आले आहे.’

पाद्री स्त्रीवरुन हात फिरवतात, तिचे डोके दाबतात. काही बडबडतात आणि हात वर करतात. त्यानंतर महिलेला तिच्या शरीरातून बाहेर पडण्यास सांगितले जाते. भूतांनो हीचे शरीर सोडून द्या. हालेलुया, हालेलुया. येशू हीला स्पर्श करो. कोणीही मरणार नाही.

चंदिगडमध्ये राहणाऱ्या या महिलेला कंपनाचा आजार आहे. ती आपल्या मुलाकडे बोट दाखवते आणि म्हणते की, मी एक भूत आहे, मी त्याचे संपूर्ण कुटुंब नष्ट करील.
चंदिगडमध्ये राहणाऱ्या या महिलेला कंपनाचा आजार आहे. ती आपल्या मुलाकडे बोट दाखवते आणि म्हणते की, मी एक भूत आहे, मी त्याचे संपूर्ण कुटुंब नष्ट करील.

महिलेच्या बाजूला तिचा तरुण मुलगाही उभा आहे. तोही शुद्धीत नाही, जोरजोरात किंचाळतोय. काही लोक मिळून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो आटोक्यात येत नाही. यानंतर पाद्री म्हणतात की, त्याला पवित्र पाणी द्या.

एक व्यक्ती त्याला पाणी देते. पाद्री त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. मनात काहीतरी बडबड करत त्याचे डोकं दाबतात. हालेलुया, हालेलुया, येशू याला स्पर्श कराे… ते बोलू लागले की, ही वेळाने ती व्यक्ती शांत होते.

जवळच खुर्चीवर 70-80 वर्षांचा एक वयस्क व्यक्ती बसलेला आहे. त्याचे डोळे सारखे बंद होत आहेत. त्याला कर्करोग आहे. पाद्री एका हाताने त्याचे डोके आणि दुसऱ्या हाताने छाती दाबतो. मग ते म्हणतात, 'याच्या शरीरातून कर्करोग काढून टाका. ते हेच शब्द पुन्हा पुन्हा सांगतात. काही वेळाने वृद्धाचे डोळे उघडतात.

या वृद्ध नागरिकाला कर्करोग झाला होता. चर्चच्या मुख्य पाद्रीने त्याला हिलींग प्रेयर दिली, तरी देखील या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही.
या वृद्ध नागरिकाला कर्करोग झाला होता. चर्चच्या मुख्य पाद्रीने त्याला हिलींग प्रेयर दिली, तरी देखील या वृद्ध व्यक्तीचा जीव वाचू शकला नाही.

मी विचारते की, हे लोक बरे झाले आहेत का?

पाद्री उत्तर देतात - होय.

मी या लोकांना भेटू शकते का?

माझ्या या प्रश्नानंतर ते काहीतरी सबब सांगून प्रकरण टाळतात. दुसऱ्या दिवशी मी पाद्रीला पुन्हा कॉल करते. त्यानंतर ते पुन्हा टाळाटाळ करतात. यानंतर मी त्यांना अनेकदा फोन केला. शेवटी ते त्या व्यक्तीचा नंबर माझ्यासोबत शेअर करतात. मनदीप सिंग असे त्याचे नाव असून ते चंदीगड येथे राहतात.

मी मनदीप सिंग यांना फोन करते. मला वाटले की, ते सत श्री अकाल म्हणतील, पण ते जय मसिह म्हणाले. ते म्हणतात, 'दिदी, आज मी येशू आणि पाद्री यांच्यामुळे जिवंत आहे. नाहीतर दुष्ट आत्म्याने संपूर्ण कुटुंबाला मारले असते.'

मी मनदीप यांना भेटण्याची वेळ मागते. आधी ते नकार देतात, मग विनंती केल्यावर भेटायला घरी बोलावतात.

मी विचारले तुमच्या कुटुंबात काय समस्या होती? पाद्रींनी ती कशी ठिक केली?

हे मनदीप सिंग आहेत. ते म्हणतात की माझ्यात एक दुष्ट आत्मा शिरली होती. त्यामुळे लोक मला वेडा समजायचे.
हे मनदीप सिंग आहेत. ते म्हणतात की माझ्यात एक दुष्ट आत्मा शिरली होती. त्यामुळे लोक मला वेडा समजायचे.

मनदीप सिंग त्यांची कहाणी सांगतात...

"आईला कपकपीचा आजार होता. अनेक डॉक्टरांना दाखवले. काही फायदा नाही. एके दिवशी माझ्या लक्षात आले की, उतारावर जाण्याऐवजी अंगणात ठेवलेली सायकल स्वतःहून वर सरकत होती. दुसऱ्या दिवशी लक्षात आले की, घरातल्या वस्तू स्वतःच गायब होत होत्या. हे का होत आहे हे समजू शकले नाही.

हळूहळू दुष्ट आत्मा माझ्या आत स्थिरावला. लोक मला वेडा म्हणू लागले. पप्पांना कॅन्सर झाला. अनेकवेळा रुग्णालयात नेले, पण उपयोग झाला नाही. रात्रभर आवाज येत होते. कोणीतरी दार ठोठावायचे, पण बाहेर गेल्यावर तिथे कोणीच नव्हते.

माझ्या शेजाऱ्याने एका पाद्रीबद्दल सांगितले. मी त्यांना भेटायला चर्चमध्ये गेलो. तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे, असे ते म्हणाले. यामुळेच हा प्रकार घडत आहे. मी तुमच्या कुटुंबाला वाचवतो.

यानंतर पाद्री माझ्या घरी येऊ लागले. आम्हीही कुटुंबासह चर्चला जाऊ लागलो. वडील जगले नाहीत, पण आई मात्र सावरली. मी पण बरा झालो आहे. कुटुंबातील सर्व समस्या संपल्या. तेव्हापासून आम्ही येशूवर विश्वास ठेवू लागलो.

यानंतर मी पंजाबमधील बालचौर येथे राहणाऱ्या उर्मिल राणीला भेटते. त्या म्हणते, 'माझ्या घरात रोज सकाळी रक्ताचे शिंतोडे दिसत होते. कपाटात ठेवलेले कपडे कापलेले आढळत होते. घरातील वस्तू गायब व्हायच्या. रोज रात्री उर्मिल उठ, उठ… असे मोठे आवाज येत होते… पाद्रीने मला पवित्र पाणी दिले तेव्हा सर्व काही ठीक झाले.’

तुम्ही दुष्ट आत्म्याला कसे दूर करता?

पास्टर म्हणतात, 'ख्रिश्चन समाजात भूत आणि जादूटोण्यांवर खूप श्रद्धा आहे. येशूच्या चमत्कारानेच ते बरे होऊ शकते. दर रविवारी आम्ही राजपूत भवन येथे येशूची प्रार्थना करतो. देशभरात अशी 3000 हून अधिक केंद्रे आहेत, जिथे माझ्यासारखे पाद्री लोकांचे आजार बरे करत आहेत.

याशिवाय आम्ही घरोघरी जाऊन भूत आणि दुष्ट आत्मे दूर करण्याचे काम करतो. लोक आम्हाला फोन करून बोलावतात.

पाद्रीसमोर स्वेटर घालून उभ्या असलेल्या माणसाला अर्धांगवायू झाला आहे. तो म्हणतो की, पूर्वी मला उभे राहता येत नव्हते. येशूमुळे मी बरा होत आहे.
पाद्रीसमोर स्वेटर घालून उभ्या असलेल्या माणसाला अर्धांगवायू झाला आहे. तो म्हणतो की, पूर्वी मला उभे राहता येत नव्हते. येशूमुळे मी बरा होत आहे.

पाद्री म्हणतात, 'आपण येशूवर जितका जास्त विश्वास ठेवतो, तितका सैतान घाबरतो, लाजतो आणि शरीरातून पळून जातो. सर्व काही विश्वासावर अवलंबून आहे. तुम्ही हे लोक पाहत आहात, ते सर्व येशूच्या चमत्काराने बरे होतील. आंधळे, बहिरे, मुके, अगदी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त लोकही बरे झाले आहेत कारण त्यांचा येशूवर विश्वास आहे.'

मी विचारले, आता तुम्ही हालेलुया, हालेलुया म्हणत होतात. याचा अर्थ काय?

पास्टर म्हणतात, 'हा एक शब्द आहे जो जगभर सारखाच उच्चारला जातो. मूळ शब्द हालेलुजाह आहे. लोक त्याला हालेलुया म्हणतात. हिब्रू बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे. हा हालेल आणि जाह यांनी बनलेलाआहे. हालेल म्हणजे प्रार्थना आणि जाह म्हणजे देव.

पाद्री म्हणाले - 51 दिवस उपवास केला, नंतर सैतान बांधण्याची शक्ती मिळाली

पाद्री स्पष्ट करतात, “मी जादूटोणा आणि भूतविद्या यांचा अभ्यास केला आहे. या क्षेत्रात स्पेशलायझेशन केले जाते. यासाठी बॅचलर ऑफ थिओलॉजी आणि नंतर मास्टर्स ऑफ थिओलॉजी करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सराव करावा लागेल.

एवढेच नाही तर सिद्धी मिळविण्यासाठी 21 दिवस, 40 दिवस किंवा 51 दिवस अशा सात वेगवेगळ्या स्तरावरील प्रार्थना आणि उपवास करावे लागतात. यादरम्यान आम्ही सैतान आणि त्याच्या सैन्याशी लढतो. सैतानाला बांधतो. सैतानाने माझ्यावर अनेकदा हल्ला केला आहे, परंतु प्रत्येक वेळी येशू मला वाचवतो. त्यांच्याकडूनच आपल्याला सैतानाला बांधून ठेवण्याची ऊर्जा मिळते. बायबलमध्ये उपचारांच्या अशा असंख्य कथा आहेत. ज्यामध्ये येशू लोकांना स्पर्श करून बरे करतात.'

पास्टर पॉल स्टॅलिन म्हणतात की त्यांनी भूत-प्रेत काढण्याचे शिक्षण घेतले आहे. त्यासाठी 51 दिवस ध्यानही केले आहे.
पास्टर पॉल स्टॅलिन म्हणतात की त्यांनी भूत-प्रेत काढण्याचे शिक्षण घेतले आहे. त्यासाठी 51 दिवस ध्यानही केले आहे.

यानंतर मी पंजाबमधील तीन वेगवेगळ्या चर्चमध्ये गेले. कमी-अधिक प्रमाणात हेच दृश्य सर्वत्र दिसत होते. काहींच्या पोटात तर काहींना पाय दुखतात. काहींना बोलता येत नाही तर काहींना दिसत नाही.

काहींना एपिलेप्सी, कॅन्सरसारखे आजार आहेत, तर काही जण वेड्यासारखे वागत आहेत. बरे होण्याची प्रक्रियाही सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच, पाद्री लोकांच्या डोक्याला स्पर्श करतात, येशू आणि हालेलुया, हलेलुया असे म्हणतात.

आता मी पेशंट बनून पास्टरला भेटायचे ठरवले. नवनशहर येथील पास्टर मीना यांचा संपर्क क्रमांक मला मिळाला. मी त्यांना फोन केला तेव्हा त्याने माझी पहिली मुलाखत घेतली. पूर्ण तपास केला. मग मला विचारले - काय प्रॉब्लेम आहे?

मी म्हणाले, मला वाईट स्वप्न पडतात. मला रात्री भीती वाटते.

पाद्री म्हणाल्या, ''मला भेटण्यासाठी इतक्या लांब येण्याची गरज नाही. मी फोनवर तुझ्यासाठी प्रार्थना करते. तुम्ही मोहालीतील पास्टर कीर्तीकडे जा, ती तुमच्यासाठी प्रार्थना करेल.

मी पास्टर कीर्ती यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी भेटीची वेळ दिली नाही.

वरिष्ठ पाद्रींना भेटण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा

मला पंजाबमधील त्या पाद्रीच्या प्रार्थना सभेला जायचे होते, ज्याची चर्चा जगभर आहे. उदाहरणार्थ पास्टर अंकुर नरुला, पास्टर बजिंदर सिंग, पास्टर अमृत संधू. ज्यांच्यामार्फत मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितले की पास्टर अंकुर नरुला यांना भेटण्यासाठी 4-6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.

मी म्हणाले त्यांना भेटण्यासाठी दुसरा कोणता मार्ग असू शकतो. माझ्या सूत्राने सांगितले की, दीड लाख रुपये देता येत असतील तर सांगा. मी म्हणाले माझ्याकडे इतके पैसे नाहीत. ते म्हणाले सोडा मग, इथे मंत्र्यांनाही पाद्रींना भेटायला थांबावे लागते.

हे अंकुर नरुला आहेत. ख्रिश्चन पाद्री म्हणून त्यांचे मोठे नाव आहे. त्यांना भेटण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावे लागते.
हे अंकुर नरुला आहेत. ख्रिश्चन पाद्री म्हणून त्यांचे मोठे नाव आहे. त्यांना भेटण्यासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावे लागते.

हीलिंग प्रार्थना चळवळ अमेरिकेत चौथ्या शतकात सुरू झाली

जगभरात हीलिंग प्रार्थनेला अंधश्रद्धा म्हणणारे आणि त्या विरोधात काम करणारे फिनलंडचे सनल इडामारुकू म्हणतात की, 'ख्रिश्चन धर्माची ओळख होण्यापूर्वी ज्या चमत्कारिक कथा समाजात होत्या, त्या चौथ्या शतकात मोठ्या प्रमाणात सामील झाल्या. या लोकांचा विज्ञानावर विश्वास नव्हता. ते कोणत्याही कॅथलिक संघटनेशी संबंधित नव्हते.

औषधे घेऊ नयेत असे त्यांचे मत होते. फक्त येशूच आपल्याला बरे करेल. ही चळवळ अमेरिकेत सुरू झाली आणि नंतर हळूहळू जगभर पसरली. यांमध्ये, पाद्रीची एकल सत्ता असते.

ते स्वतःला सर्वेसर्वा समजतात. वास्तविक ही एक विश्वासाने उपचार करणारी चळवळ आहे ख्रिश्चन धर्माची नाही. याला नवीन प्रोटेस्टंट चळवळ किंवा बाप्टिस्ट चळवळ म्हणतात. भारतातील पंजाब, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये त्याचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत.

ख्रिस्ती पाद्री म्हणतात की, बायबलमध्ये येशूच्या चमत्कारांचाही उल्लेख आहे. ते लोकांना स्पर्श करून बरे करत असे.
ख्रिस्ती पाद्री म्हणतात की, बायबलमध्ये येशूच्या चमत्कारांचाही उल्लेख आहे. ते लोकांना स्पर्श करून बरे करत असे.

मानसशास्त्रज्ञ म्हणतात - जेव्हा विश्वास आणि मान्यता तर्कशास्त्रावर प्रभुत्व मिळवतात तेव्हा हे घडते

बेंगळुरूच्या NIMHANS येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष चेरिअन यांनी या प्रकारच्या श्रद्धा आणि विश्वासावर संशोधन केले आहे. ते म्हणतात, 'ही एक प्रकारची मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये माणूस 'मास बिलीफ'वर विश्वास ठेवू लागतो. अशा लोकांना सूचक लोक म्हणतात. हे लोक दुसऱ्याच्या बोलण्यात सहज अडकतात.

दिल्लीतील मानसशास्त्रज्ञ डॉ. गीतांजली कुमार म्हणतात, 'काही लोक एखाद्या ठिकाणी जातात, नंतर तिथल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करतात. दुसर्‍याला विश्वास असेल तर तो त्या ठिकाणी जातो आणि मग आपला अनुभव तिसर्‍याला सांगतो.

हे लोक स्वतःच विचार करू लागतात की तिथे जाऊन आपण बरे झालो आहोत किंवा आपले काम होत आहे. ही गोष्ट त्यांच्या मनात घर करून राहते. याला प्लेसबो इफेक्ट म्हणतात. येथे विश्वास आणि श्रद्धा हे तर्कावर प्रभुत्व मिळवतात.

टीप : ही कथा प्रत्यक्ष दिसलेल्या घटना आणि लोकांशी झालेल्या संवादांवर आधारित आहे. दिव्य मराठी नेटवर्क अशा कोणत्याही विश्वासावर आधारित गोष्टींचे समर्थन करत नाही...

आता पंथ मालिकेच्या आणखी काही कथा पण वाचा...

रात्री लग्न, सकाळी विधवा:पती अरावनाचे कापतात शीर, मंगळसूत्र तोडतात; किन्नर रात्रीच्या अंधारात का करतात अंत्यविधी?

पंथ मालिकेत किन्नरांचे खरे आयुष्य, त्यांच्या परंपरा आणि श्रद्धा जाणून घेण्यासाठी मी दिल्लीपासून सुमारे 310 किलोमीटरचा प्रवास करून चंदीगडमधील 'किन्नरांचे मंदिर' गाठले.

देशातील सर्वात जुन्या किन्नर मंदिरांपैकी एक. किन्नरांवर संशोधनासाठी मोठमोठे अभ्यासक येथे येतात. दुपारी 3 वा. मुख्य गेट उघडे होते. मी सरळ आत गेले. किन्नरांची गुरु माता कमली समोरच सिंहासनावर बसलेली होती. सिंहासनाजवळ पितळी कमंडल आणि पानदान ठेवलेले आहे. अत्तराचा सुगंध चारी बाजूने दरवळत आहे. पाठीमागे त्यांच्या चार गुरूंची प्रतिमांना हार घातलेला आहे. काही मुले झोपली आहेत. चौकशी केली असता ही अनाथ मुले असल्याचे कळाले. किन्नरांचे मंदिर त्यांचा सांभाळ करते. पूर्ण बातमी वाचा..

पत्नीच्या अंगात भूत, जे मुलांना खाते:अनेक ठिकाणी उपचार करूनही उपयोग नाही, बालाजी महाराजांच्या भीतीने भूत पळून जाईल

हजारोंची गर्दी, कोणी भिंतीवर डोकं आपटते तर कोणी केस ओढते. कोणी कर्कश ओरडतेय तर कोणी रडते. काहींनी स्वत:ला लोखंडी साखळदंडांनी बांधून घेतले, तर काही जण रस्त्यावर बेधुंदपणे धावत आहेत. हे सर्व पाहून माझे मनही थरथरले. हे मेहंदीपूर येथील बालाजी धामचे दृश्य आहे. पंथ मालिकेत मी भूत, भ्रम आणि त्यांच्याशी निगडीत श्रद्धा समजून घेण्यासाठी जयपूरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजी धामला पोहोचले. पूर्ण बातमी वाचा...

माणसाचे मांस आणि विष्ठाही खातात अघोरी:स्मशानभूमीत कवटीमध्ये जेवण, अनेकांची कोंबडीच्या रक्ताने साधना

रात्रीचे 9 वाजले आहेत. आणि स्थळ आहे, बनारसचा हरिश्चंद्र घाट. आजूबाजूला असलेल्या ज्वालांनी परिसरातील उष्णता निर्माण केली आहे. ज्वाळांमुळे डोळ्यांची जळजळ होतेय तर दुसरीकडे धुरामुळेही त्रास होतोय. अंत्यसंस्कर करण्यात आलेल्या चितेजवळ कोणी नामजप करत आहेत, तर कोणी जळत्या चितेच्या राखेने मालिश करत आहेत, तर कोणी कोंबड्याचे डोके कापून त्याच्या रक्ताने आध्यात्मिक साधना करत आहेत. मानवी कवटीत इन्न खाणारे आणि त्यातूनच मद्य पिणारेही अनेक आहेत. त्यांना पाहून मन थरथर कापायला लागते. हे आहेत अघोरी. म्हणजेच त्यांच्यासाठी काहीच अपवित्र नाही. ते माणसाचे कच्चे मांसही खातात. अनेक अघोरी मलमूत्र आणि लघवी देखील पितात. आज पंथ या सिरीजमध्ये वाचा अघोरींची कथा…

बातम्या आणखी आहेत...