आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा8 मार्च रोजी धुलिवंदनासह आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा करण्यात आला. यावेळी संयुक्त राष्ट्राची थीम होती... DigitALL: Innovation and technology for gender equality.
आम्ही डिजिटल विश्वातील सर्वाधिक चर्चेतील संशोधन ChatGPT कडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, अखेर AI चे सर्वात मोठे संशोधन स्वतः या क्षेत्रात महिलांच्या अधिकारांविषयी काय विचार करते?
ChatGPT म्हणजेच एक असे चॅटबॉट जे AI च्या मदतीने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा दावा करते.
आम्ही ChatGPT ला प्रश्न विचारले... उत्तरे आश्चर्यचकित करणारी आहेत
जर तुम्हाला असे वाटते की तंत्रज्ञान प्रगती जगाला पुढे नेत आहे, तर हेही जाणून घ्या की या प्रगतीत महिलांची भूमिका आणि त्यांची स्थिती खूप खराब आहे.
जगभरात AI वर काम करणाऱ्या लोकांत केवळ 22 टक्के महिला आहेत. फेसबूक, गूगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या बिगटेक कंपन्यांत ही हिस्सेदारी आणखी कमी आहे.
स्वतः ChatGPT ची वॉर्निंग आहे... जर AI संशोधन आणि त्याच्या अल्गोरिदरम डेटात महिलांची हिस्सेदारी वाढवली नाही तर AI ही कदाचित महिलांना त्याच दृष्टीने बघेल जसे एखादा रुढीवादी पुरूष बघतो.
याचा परिणाम... जगातील प्रत्येक क्षेत्रात ऑटोमेशन आणि ऑटोमेशनमध्ये AI चा वापर वेगाने वाढत आहे. त्याही पुढे जाऊन स्थिती अशीही येऊ शकते की नोकरीपासून ते उपचारापर्यंत प्रत्येक ठिकाणी AI महिलांशी भेदभाव करेल.
जाणून घ्या काय आहे ChatGPT ची आश्चर्यचकित करणारी उत्तरे आणि हा इशारा महिला समानतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी गांभीर्याने का घ्यायला हवा.
आधी जाणून घ्या, ChatGPT ने आमच्या प्रश्नांना काय उत्तरे दिली
आम्ही ChatGPT ला 3 प्रश्न विचारले. ग्राफिक्समध्ये पाहा त्याची उत्तरे...
ChatGPT चा सल्ला... महिलांची AI मधील हिस्सेदारी वाढवा
जगातील सर्वात अत्याधुनिक AI चॅटबॉटचा सल्ला आहे की महिलांची हिस्सेदारी AI संशोधनात वाढवली जावी. असे केल्यानेच AI ला लिंग समानतेविषयी समजावून सांगितले जाऊ शकते.
सध्या जगात अशा अनेक संस्था आहेत, ज्या महिलांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. अनेक संस्था महिलांसाठी विशेष स्कॉलरशिप प्रोग्राम्सही चालवत आहेत.
ChatGPT चे म्हणणे आहे की, अल्गोरिदमस आणि डेटा सेटसमध्ये महिलांचा दृष्टीकोन तेव्हाच येईल, जेव्हा संशोधन आणि विकासात त्यांचा सहभाग वाढेल
UN चे म्हणणे आहे... 44 टक्के AI सिस्टिम महिलांशी भेदभाव करत आहेत
ChatGPT चा इशारा वास्तवात योग्य ठरत आहे. 2023 च्या महिला दिनासाठी थीम ठरवताना UN Women कडून केलेल्या अभ्यासाने हेच सांगितले आहे.
याच अभ्यासानुसार जगभरातील विविध कंपन्यांत AI संशोधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांत महिला केवळ 22 टक्के आहेत.
इतकेच नव्हे, जगातील 133 AI बेस्ड सिस्टिम्सचे विश्लेषण सांगते की, यापैकी 44.2 टक्के सिस्टिम्स महिलांशी भेदभाव करतात.
UN चे मानणे आहे की ही स्थिती तेव्हाच सुधारेल जेव्हा STEM म्हणजेच सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्समध्ये महिलांची संख्या वाढेल.
भारतात STEM ग्रॅज्युएटसमध्ये 43 टक्के मुली... मात्र संशोधन आणि विकासात केवळ 14 टक्के
भारतात STEM क्षेत्रात ग्रॅज्युएशनच्या बाबतीत मुलींची संख्या चांगली आहे. वर्ल्ड बँकेच्या 2020 च्या अहवालानुसार भारतात STEM ग्रॅज्युएटसमध्ये 43 टक्के मुली असतात.
ही संख्या अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या विकसित देशांच्या तुलनेत खूप चांगली आहे. अमेरिकेच्या STEM ग्रॅज्युएटसमध्ये मुली 34 टक्के आहेत.
ब्रिटनमध्ये ही आकडेवारी 38 टक्के, जर्मनीत 27 टक्के आणि फ्रान्समध्ये 32 टक्के आहे. मात्र पदवीच्या पुढे संशोधनाच्या पातळीवर भारतात मुलींची संख्या कमी होते.
वर्ल्ड बँकेनुसार विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये STEM शी संबंधित संशोधन आणि विकासाच्या कामात मुली केवळ 14 टक्के आहेत.
गृहिणींचे जीडीपीतील योगदान आपण मोजतो... मात्र तंत्रज्ञानात त्यांचे प्रतिनिधित्व वाढले नाही
एसबीआयने अलिकडेच एक रिपोर्ट जारी केला होता. यानुसार भारतात गृहिणींचे जीडीपीतील योगदान 22.7 लाख कोटी आहे. हे जीडीपीच्या 7.5 टक्के आहे.
जीडीपीत गृहिणींचे योगदान मोजणे एक चांगले पाऊल आहे. मात्र देशात लैंगिक समानता पूर्णपणे आणण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे.
मात्र अजूनही या बाबतीत भारत खूप मागे दिसतो. स्टार्ट-अप्ससाठी जगातील तिसरा सर्वात मोठा इको-सिस्टिम असूनही भारताच्या युनिकॉर्न्सपैकी केवळ 15 टक्क्यांच्या संस्थापक महिला आहेत.
STEM शी संबंधित इंडस्ट्रीत उच्च पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व खूप कमी आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या वर्कफोर्समध्ये महिलांची भागीदारी 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
ChatGPT ची वॉर्निंग आपण गांभिर्याने घेऊन काम सुरू केले नाही तर रुढीवादी समाजाचा परिणाम AI वर दिसणे निश्चित आहे.
ही बातमीही वाचा...
महिला पार्टीसाठी नटतात हे अर्धसत्य:बंद खोलीतील पतीची मारहाण लपवायलाही मेकअप करावा लागतो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.