आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या काळात जग डिजिटल युग बनले आहे. लग्नापासून ते किराणा सामानापर्यंत, आपल्या प्रत्येक गरजेसाठी world wide web हे माध्यम बनले आहे. परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील आहे. बर्याच लोकांचा स्क्रीन टाइम इतका वाढला आहे की त्याचा लोकांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ लागला आहे.
एरिक्सन मोबिलिटी अहवालानुसार, भारतातील लोकांचा स्क्रीनचा कालावधी गेल्या सात महिन्यांत चार ते पाच तासांपर्यंत वाढला आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनासार, जागतिक स्तरावर गॅझेट्स वापरचा वेळ 90% वाढला आहे.
रिपोर्टनुसार, पूर्वी स्मार्टफओन वापरण्याचा प्रति व्यक्ती सरासरी वेळ हा तीन तास असायचा आता तो पाच तासांवर गेला आहे. ब्रॉडबँड किंवा वायफायशी जोडलेले असताना, एखादी व्यक्ती सरासरी अडीच तास स्क्रीन वापरत असे, आता हा आकडा साडे चार तासांवर पोहोचला आहे.
टेक्सास युनिव्हर्सिटीचे सायकॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. जॉन डी कॅरी म्हणतात की, एका दिवस देखील सोशल मीडिया किंवा डिजिटल डिवाइसचा वापर थांबवणे फार कठीण आहे. सोशल मीडिया एकमेकांशी संपर्कात राहण्यास, माहिती शेअर करण्यास, करमणूक प्रदान करण्यात मदत करते. त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही आहेत. मात्र, त्यावर जास्त वेळ घालवणे देखील व्यसनाधीन असल्यासारखे आहे. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो.
स्क्रीन टाइम कमी करण्याचे सोपे मार्ग
आजकाल लोकांना मेसेजवर बोलणे किंवा चॅट करणे सोपे जाते. परंतु एखाद्याशी चॅट करताना 2 मिनिटांची चर्चा 10 मिनिटेदेखील चालते. परंतु तीच गोष्ट कॉल केल्यास 2 मिनिटात घडते. यामुळे स्क्रीन टाइम कमी होतो.
उपयुक्त तेच अॅप्स फोनमध्ये ठेवा. अनावश्यक अॅप काढून टाका. स्क्रीन वेळ वाढवणारे अॅप डिलीट करा. ज्या अॅपचा 15 दिवसात एकदाही वापर झाला नाही, असेही अॅप्स फोनमध्ये ठेऊ नका.
स्क्रीनचा वापर करण्याचा प्लान आखा. कामाच्या वेळी सर्वजण लॅपटॉप, संगणक किंवा मोबाईलचा वापर करतात, या व्यतिरिक्त आपण गॅझेट केव्हा आणि किती वेळ वापराल याची योजना बनवा. दिवसातून एक वेळ निश्चित करा, जेव्हा तुम्ही कोणतेही गॅझेट वापरणार नाहीत. असे केल्याने तुम्ही कमीत कमी स्क्रीनचा वापर कराल.
तज्ज्ञांच्या मते, गॅझेट वापरणे हे फिजिकल अॅक्टिव्हिटीत अडथळा निर्माण करते. आपण गॅझेट किती वेळ वापरत आहात आणि आपण किती काळ फिजिकल अॅक्टिव्हिटी करत आहात, याची विशेष काळजी घ्या. गॅझेट वेळ आणि फिजिकल अॅक्टिव्हिटीत यात बॅलेन्स ठेवा, जेणेकरुन आरोग्याचे नुकसान होणार नाही.
संशोधनानुसार, लोक पलंगावर पडून गॅझेटचा सर्वाधिक वापर करतात. यामुळे लोकांच्या झोपेच्या सवयीही खराब होत आहेत. तसेच, गॅझेटच्या वापराचा वेळ वाढत आहे. म्हणूनच बेडरूममध्ये टीव्ही किंवा संगणक ठेऊ नका.
जर स्क्रीन टाइम अधिक असेल किंवा गॅझेटचा वापर जास्त असेल तर डिजिटल व्हिजन सिंड्रोम ही समस्या निर्माण शकते. यामुळे डोळे अशक्त होऊ लागतात. या सिंड्रोममुळे मानसिक आणि शारीरिक समस्या देखील उद्भवतात.
स्क्रीनचा वेळ अधिक असणे हे अनेक प्रकारे धोकादायक ठरू शकते. हे समाज, मित्र आणि कुटूंबापासून लोकांना वेगळे करते. आपण जितके लोकांपासून दूर राहता तितकेच एकाकीपणा आणि नैराश्याला बळी पडू शकता. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळे खराब होतात, डोकेदुखी आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांची भीती देखील असते.
रात्री स्क्रीनचा वापरताना, उत्सर्जित होणारा प्रकाश थेट डोळयातील पडदा यावर परिणाम करते. यामुळे आपले डोळे पटकन बिघडू लागतात. हळू हळू पाहण्याची क्षमता कमी होऊ लागते.
दिवसभर काम केल्यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळत नाही, अशा परिस्थितीत रात्री झोपेऐवजी जास्त वेळ फोनवर व्यस्त राहिल्यामुळे डोळे कोरडे होतात. यामुळे डोळ्यांना खाज सुटते आणि जळजळ होते. हे सतत केल्याने डोळ्याच्या अश्रू ग्रंथीवर वाईट परिणाम होतो.
बर्याच संशोधनात असे समोर आले आहे की सतत स्क्रीन पाहिल्याने अंधत्व येऊ शकते. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना पूर्णपणे नुकसान पोहोचवू शकतो.
तासन्तास स्क्रीन सतत पाहिल्यानंतर डोळ्यांतून पाणी येऊ लागते. स्क्रीनमधून निघालेल्या किरणांमुळे असे होते. सतत मोबाईल बघितल्याने पापण्यांची उघडझाक जवळजवळ कमी होते. यामुळे डोळ्यांना आराम मिळत नाही आणि डोळ्यांतून पाणी येऊ लागते.
सतत स्क्रीन पाहण्याच्या सवयीमुळे लवकरच चष्मा लागू शकतो. इतकेच नाही तर हळूहळू डोळ्यांचा नंबरदेखील वाढू लागतो. काही वर्षांनंतर आपल्याला डोळ्याचे ऑपरेशन करायची वेळ येऊ शकते.
स्क्रीनचा जास्त वापर केल्याने पापणीची उघडझाक करण्याची प्रक्रिया कमी होते. सोबतच डोळ्याच्या बाहुल्या आकुंचन पावतात. यामुळे डोळ्यांसह डोकेदुखीचा त्रास देखील होतो.
जर तुम्ही सतत स्क्रीनकडे बघत असाल आणि अचानक तुमचे लक्ष दुसरीकडे गेले, तर काही क्षणांसाठी तुम्हा सर्व अंधूक दिसू लागले, डोळ्यांसमोर अंधारी येते. आपल्या डोळ्यांसाठी हे चांगले लक्षण नाही.
स्क्रीनचा अतिवापर केल्यामुळे एवढे नुकसान होते की आपल्याला सर्व अस्पष्ट दिसण्यास सुरुवात होते. इंग्रजीमध्ये त्याला ब्लर्ड व्हिजन म्हणतात. ही प्रक्रिया नंतर गंभीर होते आणि आपल्याला दिसण्यात अडचण येऊ लागते.
कोरोनामुळे मुलांच्या स्क्रीनची वेळ लक्षणीय वाढली आहे. ते डिजिटल माध्यमावर अवलंबून आहेत. केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर परस्परसंवाद आणि करमणुकीसाठी देखील. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे खूप महत्वाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.