आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • China Coronavirus First Case Report; Wuhan News | COVID 19 Originated In October And November Of 2019

एक्सप्लेनर:कोरोना उद्रेकाच्या खोट्या तारखा सांगत होता चीन; नवीन संशोधनातील दावा - जगातील कोरोनाचे पहिले प्रकरण नमूद तारखेच्या एक महिन्यापूर्वीच समोर आले होते

जयदेव सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या संशोधनातून कोणत्या गोष्टी समोर आल्या आहेत...

कोरोना विषाणू केव्हा आला? तो कोठून आले? तो कसा आला? जेव्हा जेव्हा या प्रश्नांचा उल्लेख केला जातो तेव्हा चीनवर बरेच प्रश्न उपस्थित होतात. आता एका नव्या संशोधनात चीनच्या दाव्यांवर अजून प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संशोधनात असे म्हटले आहे की, जेव्हा चीनने जगाला कोरोनाबद्दल सांगितले त्याच्या एक ते दोन महिन्यांपूर्वीच कोरोनाची प्रकरणे तेथे समोर येऊ लागली होती. यापूर्वी अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली होती, असे म्हटले आहे.

या अहवालात काय म्हटले आहे? हा दावा कोणत्या आधारावर केला जातोय? वॉल स्ट्रीट जर्नलने कोणत्या आधारावर चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे म्हटले? कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आतापर्यंतच्या अहवालात काय म्हटले गेले आहे? चला जाणून घेऊयात....

नवीन अहवालात कोणती माहिती समोर आली आहे?
PLOS या रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित अहवालात म्हटले आहे की, जगातील कोरोनाचे पहिले प्रकरण नोव्हेंबर 2019 मध्ये समोर आले होते. तारखेबद्दल बोलायचे म्हणजे 17 नोव्हेंबरला कोरोनाची पहिली घटना समोर येण्याची शक्यता या अहवालात वर्तवली गेली आहे. त्याची सुरुवात चीनपासून झाली. तर चीनचा दावा आहे की, त्यांच्या देशात पहिली घटना डिसेंबर 2019 च्या सुरुवातीस आली होती.

हे संशोधन कोणी केले आहे?
UK च्या केंट विद्यापीठातील डेव्हिड रॉबर्ट आणि त्यांच्या सहका-यांनी गणिताचे मॉडेल विकसित केले आहे. त्यांचे मूळ मॉडेल प्राणी आणि पक्ष्यांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी विकसित केले गेले होते. मूळ मॉडेलमध्ये सुधारणा करून, केंट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी कोरोनाची सुरुवात कधीपासून झाली, त्या तारखेचा अंदाज घेतला आहे.

हे मॉडेल विकसित करणा-या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे रोगांचा प्रारंभ आणि भविष्यात त्यांचा प्रसार होण्याची शक्यता शोधण्यात मदत होईल. यासाठी बर्‍याच डेटाची देखील आवश्यकता नाही. कोरोनावर केलेल्या या संशोधनातून चीनमध्ये कोरोनाची पहिली घटना 17 नोव्हेंबर 2019 रोजी समोर आली असावी असा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये हा रोग जगभर पसरला.

या संशोधनात इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रसार कधी झाला याबद्दलची माहिती आहे का?
चीन व्यतिरिक्त ज्या पाच देशांमध्ये कोरोना प्रथम पोहोचला, त्यांचादेखील या संशोधनातून अंदाज घेण्यात आला आहे. या देशांमध्ये कोरोनाची पहिली घटना कोणत्या तारखेला आली हे या संशोधनातून समोर आले आहे.

संशोधन असे सांगते की, 3 जानेवारी 2020 रोजी चीननंतरची पहिली घटना जपानमध्ये समोर आली होती. यानंतर 7 जानेवारी रोजी थायलंडमध्ये, 12 जानेवारीला स्पेन आणि 14 जानेवारीला कोरिया येथे कोरोनाचे रुग्ण आढळले. युरोपमध्ये पोहोचल्यानंतर कोरोना 16 जानेवारीला अमेरिकेत पोहोचला.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात काय आहे?
गेल्या महिन्यात अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकेच्या गुप्तचर अहवालाचा हवाला देत दावा केला की, वुहानच्या प्रयोगशाळेतील बरेच शास्त्रज्ञ नोव्हेंबर 2019 मध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळातच आजारी पडले होते. या लोकांना सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची लक्षणे आढळली होती. पण, चीनने त्यावेळी याबाबत जगाला सांगितले नाही. त्या घटनेच्या एका महिन्यानंतर म्हणजेच, डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाची माहिती जगाला दिली.

यापूर्वी , अमेरिकेचे आरोग्यमंत्री झेवियर बेसेरा यांनी जागतिक आरोग्य असेंबलीत डब्ल्यूएचओला सांगितले होता की, कोरोनाचा प्रसार कसा झाला, याची चौकशी करणारा पुढील टप्पा 'पारदर्शक' हवा. बेसेरा यांनी चीनचे नाव न घेता जानेवारीत डब्ल्यूएचओच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, चीनने या सर्व बातम्यांचे खंडन केले होते. यासह या विषाणूची उत्पत्ती अमेरिकेच्याच एखाद्या प्रयोगशाळेत झाली असावी असा त्यांनी एक नवीन आरोप केला होता. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजियान यांनी असा दावा केला की, 30 डिसेंबर 2019 पूर्वी वुहानच्या प्रयोगशाळेत​​​​​कोरोनाचे कोणतेही प्रकरण आढळले नव्हते.

चीनमध्ये गेलेल्या WHO च्या पथकाला काय मिळाले?
यावर्षी जानेवारीमध्ये WHO ची टीम चीनच्या वुहान शहरात गेली. एप्रिलमध्ये या पथकाने आपला अहवाल दिला, परंतु या अहवालात काहीच निष्पन्न झाले नाही. यात कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी कोणतेही निश्चित निष्कर्ष काढले गेले नाहीत. मागील दोन वर्षांत जे लोकांना सांगण्यात आले, त्याच गोष्टी या अहवालात सांगितल्या गेल्या. या अहवालात असे म्हटले आहे की, चीनमधील लोकांना या विषाणूची लागण कशी झाली हे माहित नाही. हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत आला आहे. यासह, या व्हायरसची उत्पत्ती प्रयोगशाळेत होण्याची शक्यताही नगण्य आहे. WHO वर चीनच्या दबावात रिपोर्ट तयार करण्यात आल्याचा आरोपली लागला.

प्राण्यांपासून मानवांमध्ये कोरोना पसरवण्याच्या सिद्धांताचे समर्थन करणा-यांचे काय म्हणणे आहे? ब-याच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या विषाणूची उत्पत्ती एखाद्या प्रयोगशाळेपेक्षा नैसर्गिकरित्या होण्याची शक्यता अधिक आहे. कोरोना विषाणूवर काम करणारे स्क्रीप्स रिसर्चचे शास्त्रज्ञ क्रिस्टन जी. अँडरसन यांचे म्हणणे आहे की, इबोला आणि इतर रोगजनक विषाणू प्राण्यांपासून मनुष्यांत आले. या विषाणूंच्या जिनोम सीक्वेन्समधून कोरोना पसरण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...