आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • China India; Sinopharm Vaccine Vs Bharat Biotech COVAXIN Detailed Comparison | When China Vaccine Come To Bharat

एक्सप्लेनर:चीनच्या सिनोफार्मला WHO ची मान्यता, पण आपली स्वदेशी लस 'कोव्हॅक्सिन' त्याहून अधिक चांगली, जाणून घ्या त्याबद्दल बरंच काही

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे?, जाणून घ्या यासह बरंच काही...

चीनची औषध निर्माता कंपनी सिनोफार्मने विकसित केलेल्या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने गेल्या आठवड्यात आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता संयुक्त राष्ट्र समर्थित कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत गरजू देशांपर्यंत कोट्यवधी डोस पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चायना नॅशनल बायोटेक ग्रुप (CNBG) ची सहाय्यक कंपनी बीजिंग बायो-इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट कंपनी लिमिटेडने ही लस विकसित केली आहे.

खास गोष्ट अशी की, सिनोफार्मची ही लस भारतात बनवल्या जाणार्‍या 'कोव्हॅक्सिन' सारखीच आहे. या दोन्ही लस इनअ‍ॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. चांगली गोष्ट अशी की, कोव्हॅक्सिन कोरोनाच्या बर्‍याच प्रकारांवर प्रभावी आहे, परंतु सिनोफॉर्मच्या व्हॅक्सिन व्हेरिएंट्सच्या प्रभावीतेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सिनोफार्म ही पाश्चात्य देशांव्यतिरिक्त अशी पहिली लस आहे ज्यास डब्ल्यूएचओने पाठिंबा दर्शविला आहे. या कोव्हॅक्स कार्यक्रमाचा एक भाग बनवले जाऊ शकते, ज्या अंतर्गत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना लस पुरविली जात आहे. भारताने कोव्हॅक्स प्रोग्रामअंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे तयार होत असलेली कोविशिल्ड ही लस अनेक देशांत पाठविली आहे. परंतु फेब्रुवारीपासून दुसर्‍या लाटेमुळे निर्यात थांबविण्यात आली. याचा फायदा चिनी लसीला झाला आणि आता 50 हून अधिक देशांमध्ये ती वापरली जात आहे.

चला तर मग चीनमध्ये तयार झालेल्या आणि डब्ल्यूएचओने संपूर्ण जगासाठी मंजूर केलेल्या या कोरोना लसीबद्दल सर्व काही जाणून घेऊया…

ही लस कशी कार्य करते?

 • सिनोफार्म लस इनअ‍ॅक्टिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर बनविली जाते. म्हणजेच भारतात बनत असलेल्या कोव्हॅक्सिनप्रमाणे ही लस आहे. भारत बायोटेकने आयसीएमआर आणि एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) यांच्यासह मिळून याच प्लॅटफॉर्मवर कोव्हॅक्सिन तयार केली आहे.
 • इनअ‍ॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिनमध्ये (या प्रकरणात SARS-CoV-2 म्हणजेच कोरोना व्हायरस) उष्णता, रसायने किंवा रेडिएशनच्या मदतीने व्हायरस कमकुवत करतात. अशी लस तयार करण्यास वेळ लागतो. यासाठी या लसीचे दोन ते तीन डोस लागू शकतात. पोलिओ आणि फ्लूच्या लस याच धर्तीवर तयार करण्यात आल्या आहेत.
 • सिनोफॉर्म व्यतिरिक्त, जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जाणा-या लसींपैकी कोव्हॅक्सिन आणि सिनोेव्हॅक (चीनमध्ये विकसित केलेली आणखी एक लस) मध्ये इनअॅक्टिव्हेटेड व्हायरसचा वापर केला गेला आहे. फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्नाची लस mRNA प्लॅटफॉर्मवर बनविली जाते, तर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (कोविशिल्ड), स्पुतनिक V आणि जॉनसन अँड जॉनसनची लस व्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे?

 • चीनसह सिनोफार्म लसीच्या फेज- 3 च्या क्लिनिकल चाचण्या चीनसह 5 अरब देशांमध्ये झाल्या. डब्ल्यूएचओच्या मते ही लस 79% प्रभावी आहे. परंतु क्लिनिकल चाचण्यांच्या वेळी व्हॉलंटियर्समध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या कमी होती, यामुळे, 60+ वर या लसीचा कसा परिणाम होईल, याविषयी दाव्याने काही सांगता येणार नाही.
 • तरीही, डब्ल्यूएचओने या लसीच्या वापरासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा निश्चित केली नाही. क्लिनिकल चाचण्यांमधील प्राथमिक डेटा आणि सहाय्यक इम्युनोलॉजिकल डेटा सूचित करतात की, ही लस वृद्ध लोकांमध्ये देखील प्रभावी आहे.
 • डब्ल्यूएचओने 18+ साठी ही लस मंजूर केली आहे. या लसीचे दोन डोस तीन ते चार आठवड्यांच्या कालावधीत घेतले जाऊ शकतात. सिनोफॉर्म लसीच्या फेज - 2 आणि फेज-3 च्या क्लिनिकल ट्रायल्सच्या आकडेवारीच्या आधारे ही मान्यता देण्यात आली आहे. सुरक्षा, एफिकेसी, गुणवत्ता आणि जोखीम व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे.
 • चिनी लस BBIBP-CorV इम्यून सिस्टमला SARS-CoV-2 विरूद्ध अँटीबॉडी बनविण्यास शिकवते. हे अँटीबॉडी व्हायरसच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या स्पाइक प्रोटीनशी जोडले जातात आणि त्यांना नष्ट करतात. कोरोना विषाणूची वाढ होण्यापासून रोखण्यासाठी ही लस प्रभावी आहे, परंतु हा परिणाम किती काळ टिकेल हे माहित नाही.
गेल्या आठवड्यात बांग्लादेशातील चीनचे राजदूत ली जिमिंग यांनी बांग्लादेशचे आरोग्यमंत्री जाहिद मलिक यांना सिनोफार्म लसीचे 5 लाख डोस दिले.
गेल्या आठवड्यात बांग्लादेशातील चीनचे राजदूत ली जिमिंग यांनी बांग्लादेशचे आरोग्यमंत्री जाहिद मलिक यांना सिनोफार्म लसीचे 5 लाख डोस दिले.

WHO च्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीचे महत्त्व काय आहे?

 • WHO ची इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये महामारी सारख्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य उत्पादनाची सुरक्षा आणि प्रभावीपणा तपासला जातो. डब्ल्यूएचओने 31 डिसेंबर 2020 रोजी फाइजरच्या लसला मान्यता दिला. तर ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीला 15 फेब्रुवारी 2021 रोजी आणि जॉनसन अँड जॉनसन लसीला 12 मार्च रोजी आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली.
 • WHO च्या मते, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता औषधी, लसी आणि निदान साधने शक्य तितक्या लवकर विकसित करणे आणि त्यास मान्यता देणे अत्यावश्यक आहे. तेदेखील सुरक्षितता, एफिकेसी आणि गुणवत्ता या मानकांवर अंवलंबून असते.

ही लस किती देशांमध्ये दिली जात आहे?

 • चीनमध्ये तयार झालेल्या सिनोफार्म लसीव्यतिरिक्त सिनोव्हॅक लस पाकिस्तान, बांग्लादेशसह 60 हून अधिक देशांद्वारे वापरली जात आहे. चीनने आतापर्यंत अडीच कोटी लोकांना लस दिली आहे. परंतु डब्ल्यूएचओ ही पहिलीच कठोर नियामक संस्था आहे जिने चिनी लसींच्या चाचणीविषयी डेटा विश्लेषण केला आहे.
 • अशा परिस्थितीत डब्ल्यूएचओची मान्यता महत्त्वाची ठरते. ग्लोबल टाइम्सने कंपनीच्या अधिका-यांच्या हवाल्याने सांगितले की, सिनोफॉर्म लसच्या फेज -3 क्लिनिकल चाचण्या 2020 च्या उन्हाळ्यात झाल्या. यामध्ये 18+ व्हॉलंटियर्स सहभागी झाले होते. चाचण्यांमध्ये ही लस 78.89% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
 • परंतु सेशेल्सच्या आकडेवारीवरून समस्या उघडकीस आली आहे. एक लाख लोकसंख्या असलेल्या या देशात बहुतेक लोकांना चिनी लस दिली गेली. परंतु काही काळाने कोरोनाची नवीन प्रकरणे इतक्या वेगाने वाढली की तेथील शाळा बंद कराव्या लागल्या आणि लॉकडाउन सारख्या उपाययोजना कराव्या लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन प्रकरणात 37% लोक असे आहेत ज्यांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. तेथे यामागची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू झाला आहे.
सेशल्स हा त्या देशांपैकी एक आहे ज्याने आपल्या नागरिकांना चिनी लस देण्यास सुरुवात केली. परंतु येथे दररोज नवीन प्रकरणे वाढत आहेत. 37% नवीन प्रकरणांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.
सेशल्स हा त्या देशांपैकी एक आहे ज्याने आपल्या नागरिकांना चिनी लस देण्यास सुरुवात केली. परंतु येथे दररोज नवीन प्रकरणे वाढत आहेत. 37% नवीन प्रकरणांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.

ही लस कुणाला मिळू शकेल?

 • WHO च्या मते, ज्या लोकांना पूर्वी कोरोना संसर्ग झाला होता, अशा लोकांना सिनोफॉर्म लस दिली जाऊ शकते. त्याचे मूल्यांकन असेही सांगते की, लक्षणे असलेले रिइन्फेक्शन खूप सामान्य नाही.
 • WHO असेही सांगते की, हे गर्भवती महिला तसेच स्तनपान करणा-या महिलांनाही दिले जाऊ शकते. त्याचा इफेक्टिव्हनेस इतर प्रौढांप्रमाणेच राहील. परंतु ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डोस घ्यावा. तर भारतात मात्र कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नियम थोडे वेगळे आहेत. स्तनपान करणा-या माता आणि गर्भवती महिलांना ही लस घेण्यास मनाई आहे. तर अ‍ॅलर्जी संबंधित नियम सर्व लसींसाठी समान आहेत.

भारत सिनोफॉर्म लस आयात करेल का?

 • नाही.. सध्या तरी हे चित्र दिसत नाही. लस डोसच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भारताचे लक्ष संपूर्ण जगाकडे आहे, परंतु आतापर्यंत चीनची लस येईल की नाही यावर सरकारी अधिका्याने काहीही सांगितले नाही.
 • दुसरीकडे एप्रिलमध्ये भारत सरकारने आयात केलेल्या लसींना मान्यता देण्याचे नियम बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. जी लस अमेरिका, ब्रिटन, युरोप, जपान आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेली आहे, त्याचा वापर भारतात केला जाऊ शकेल, असा हा निर्णय आहे. आता डब्ल्यूएचओने सिनोफार्म लसीला मान्यता दिली आहे, त्यामुळे ही लस भारतात येण्यातील अडथळा दूर झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...