आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी रिसर्चचीनच्या आक्रमकतेचे कारण पैसा!:चीनचा जपानसोबतचा व्यापार भारताच्या चौपट; भारताचा US सोबत व्यापार वाढल्याने चीन चिडला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारील विस्तारवादी चीन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे… अमेरिकेपासून जपानपर्यंत संपूर्ण जगाला ही गोष्ट माहिती आहे. पण या सर्व देशांमध्ये फक्त भारताच्या सैनिकांसोबत चीनी सैनिकांनी झटापट केली आहे. केवळ भारताविरोधात चीनच्या आक्रमक भूमिकेमागील खरे कारण व्यापारात दडले आहे.

वास्तविक, 2013 मध्ये शी जिनपिंग सत्तेत आल्यापासूनच चीन प्रत्येक आघाडीवर आक्रमक भूमिका दाखवत आहे. अमेरिकेनंतर जगातील दुसरी महासत्ता म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या मिशनमध्ये चीनने दोन आघाड्यांवर आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आहे.

एकीकडे, त्याला संपूर्ण जगाच्या व्यवसायात आणि प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वतःला सर्वात मजबूत बनवायचे आहे. त्याचबरोबर आशियातील सामरिक आणि धोरणात्मक आघाड्यांवर आपली ताकद सिद्ध करायची आहे.

आशियामध्ये प्रामुख्याने तीन सामरिक आघाड्या आहेत ज्या चीनसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली तैवान, दुसरी जपानजवळील सेनकाकू बेट आणि तिसरी भारताला लागून असलेली हिमालयाची सीमा.

हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा गलवानमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत-चीन सीमेवर परिस्थिती गंभीर होती. चीन सातत्याने भारताला सैन्य आघाडीवर चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे.
हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा गलवानमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत-चीन सीमेवर परिस्थिती गंभीर होती. चीन सातत्याने भारताला सैन्य आघाडीवर चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे.

तैवानमध्ये अमेरिकेच्या थेट हस्तक्षेपामुळे चीनने आपली पावले रोखली आहेत. यानंतर, आशियातील आपली सामरिक ताकद सिद्ध करण्यासाठी जपान किंवा भारताला भिडण्याचा पर्याय आहे. येथे चीन भारताला अधिक अनुकूल लक्ष्य मानतो.

याचे थेट कारण व्यापारात दडले आहे. चीन आणि जपानमधील व्यापार भारत-चीन व्यापाराच्या 4 पट आहे. अशा परिस्थितीत चीनला आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जपानशी चांगले संबंध ठेवण्याची जास्त गरज आहे.

दुसरे कारण म्हणजे चीनचा भारतासोबतचा व्यापार भलेही वाढला असेल, पण भारताच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनचा वाटा झपाट्याने कमी झाला आहे आणि अमेरिकेचा वाटा वाढला. अशा स्थितीत भारतासोबतच्या सीमेवरील चकमकी चीनसाठी आर्थिकदृष्ट्या फारशा हानिकारक नाहीत.

जाणून घ्या, भारतासोबतचे बदलते व्यापारी संबंध चीनला कसे अधिक आक्रमक बनवत आहेत आणि जपानशी उघड शत्रूत्व चीन स्वतःसाठी हानिकारक का मानतो.

प्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की चीनचे भारतासोबतचे व्यापारी संबंध कसे बदलत आहेत

आपल्या आयातीत चीनचा वाटा सर्वात जास्त आहे… पण हा वाटा कमी होत आहे

आपल्या एकूण आयातीत चीनचा वाटा सर्वाधिक आहे. भारताने 2021-22 मध्ये चीनकडून एकूण 7.05 लाख कोटी रुपयांची आयात केली. भारताच्या एकूण आयातीत चीनचा वाटा सर्वाधिक 15.42% होता. विशेष बाब म्हणजे या काळात भारताने एकूण 221 देशांमधून आयात केली. मात्र केवळ चीनचा वाटा दुहेरी अंकात आहे.

2022-23 मध्ये देखील एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान चीनमधून 4.76 लाख कोटींची आयात करण्यात आली आहे. एकूण आयातीत चीनचा वाटा 13.77% आहे.

परंतु चीनसाठी अडचण अशी आहे की आयातीचे प्रमाण जास्त असूनही त्याचा वाटा कमी झाला आहे. खरं तर, 2020-21 मध्ये चीनच्या आयातीचा वाटा 16.54% होता, जो 2021-22 मध्ये 15.4% इतका कमी झाला.

2014 ते 2017 पर्यंत चीन भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार होता… 2018 पासून व्यापारात घट होऊ लागली

2013-14 ते 2017-18 पर्यंत भारताचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी चीन होता. मात्र आता ही जागा अमेरिकेने घेतली आहे. भारत-अमेरिकेतील वाढता व्यापार चीन स्वतःच्या विरोधात मानतो.
2013-14 ते 2017-18 पर्यंत भारताचा सर्वात मोठा व्यापारी सहकारी चीन होता. मात्र आता ही जागा अमेरिकेने घेतली आहे. भारत-अमेरिकेतील वाढता व्यापार चीन स्वतःच्या विरोधात मानतो.

वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी दर्शवते की 2012-13 मध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका होता. 2013-14 मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आला होता.

2013-14 ते 2017-18 या काळात चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला. पण 2018-19 मध्ये चीन दुसऱ्या स्थानावर घसरला आणि तेव्हापासून 2020-21 वगळता दरवर्षी दुसऱ्या स्थानावर आहे.

2020-21 मध्ये कोव्हिडमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती खूपच विस्कळीत झाली होती. त्यामुळे अमेरिकेसोबतच्या व्यापारावर परिणाम झाला. या कारणास्तव चीनशी व्यापार अधिक होता. म्हणजेच 2018-19 पासून भारताने व्यापाराच्या बाबतीत चीनपेक्षा अमेरिकेला अधिक महत्त्व दिले आहे.

हे देखील चीनच्या चिंतेचे आणि कठोरतेचे कारण बनले आहे. एकीकडे भारताकडून मिळणारे फायदे कमी झाले आहेत आणि दुसरीकडे भारताने अमेरिकेशी व्यापार वाढवला आहे ज्याला चीन आपला थेट प्रतिस्पर्धी मानतो.

आता समजून घ्या, चीनसाठी जपानशी संबंध अधिक महत्त्वाचे का आहेत

चीनचा भारतासोबत 8.63 लाख कोटींचा व्यापार… जपानसोबत 32 लाख कोटींचा व्यापार

2021-22 मध्ये भारत आणि चीनमध्ये एकूण 8.63 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. अमेरिकेसोबतच्या (8.91 लाख कोटी रुपये) व्यापारानंतर तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या संदर्भात चीन हा आपल्यासाठी महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे.

मात्र चीनसाठी भारतापेक्षा जपान हा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. 2021-22 मध्ये चीन आणि जपानमध्ये एकूण 32.30 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. दोन्ही देशांमधील हा 10 वर्षांतील सर्वाधिक व्यापार होता.

या संदर्भात, जपानसोबतचा व्यापार चीनसाठी अधिक फायदेशीर आणि आवश्यक आहे.

90% जपानी लोकांचे चीनबद्दल चांगले मत नाही... तरीही सामरिक आघाडीवर कठोरता कमी

हा फोटो 17 नवंबर, 2022 चा आहे. बँकॉकमध्ये झालेल्या एपेक शिखर चर्चेदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान किशीदा फुमियोंची पहिली भेट झाली होती.
हा फोटो 17 नवंबर, 2022 चा आहे. बँकॉकमध्ये झालेल्या एपेक शिखर चर्चेदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान किशीदा फुमियोंची पहिली भेट झाली होती.

द इकॉनॉमिस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, 90% जपानी चीनला आपला शत्रू मानतात. 60% चिनी लोकांचेही जपानबद्दल असेच मत आहे.

सार्वजनिक मंचांवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांच्यातही फारसा संवाद होत नाही. दोन्ही नेत्यांतील ही उदासीनता अनेकदा दिसून आली आहे. असे असूनही, दोघांपैकी कोणीही धोरणात्मक आघाड्यांवर फारशी आक्रमकता दाखवत नाही.

नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीदरम्यान, चीनने लष्करी सराव केला, ज्यामध्ये जपानच्या आर्थिक क्षेत्रात 5 क्षेपणास्त्रे पडली. इतकंच नाही तर 17 नोव्हेंबर रोजी शी जिनपिंग आणि किशिदा फुमियो या दोघांच्या भेटीनंतर काही दिवसांतच चिनी तटरक्षक जहाजांनी सेनकाकू बेटांजवळील जपानच्या प्रादेशिक पाण्यात प्रवेश केला.

चीन आणि जपान या दोन्ही देशांनी या दोन्ही घटना सामान्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जपानने संरक्षण बजेट वाढवण्याची घोषणा केली असली, तरी चीनसोबतच्या धोरणात्मक आघाड्यांवर त्यांनी थेट आक्रमकता दाखवलेली नाही.

चिनी प्रसारमाध्यमांनी सेनकाकू आणि तैवानच्या घटनाही सामान्य केल्या आहेत आणि जपानला आव्हान देण्याचा चीनचा कोणताही हेतू नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...