आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा9 डिसेंबर 2022. अरुणाचल प्रदेशच्या तवांगचा यंगस्टे. चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा LAC वर भारतात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे सांगत चीन सातत्याने यावर आपला दावा सांगत आला आहे. चीनने गेल्या वर्षीच अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावे बदलली होती. म्हणजेच चीनच्या जमीन बळकावण्याच्या धोरणाचा पुढचा केंद्रबिंदू भारत आहे.
रशिया आणि कॅनडा खालोखाल चीन हा सर्वात मोठा देश आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 97 लाख 6 हजार 961 चौरस किलोमीटर आहे. यातील 43 टक्के जमीन इतरांकडून बळकावण्यात आली आहे. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आम्ही चीनने कब्जा केलेल्या भागांबद्दलच सांगणार आहोत...
चीन ने पूर्व तुर्कस्तानवर 1949 मध्ये कब्जा केला होता. चीन याला शिन्जियांग प्रांत संबोधतो. याचे एकूण क्षेत्रफळ इराणइतक्या मोठ्या देशाईतके आहे. इथल्या एकूण लोकसंख्येपैकी 45% उईगूर मुस्लीम आहेत. तर 40% हान चीनी आहेत. उईगूर मुस्लीम तुर्किक वंशाचे मानले जातात. चीनने शिन्जियांगला स्वायत्त क्षेत्र घोषित केलेले आहे.
23 मे 1950 रोजी हजारो चिनी सैनिकांनी तिबेटवर हल्ला करून कब्जा केला. पूर्व तुर्कस्ताननंतर तिबेट हा चीनचा दुसरा सर्वात मोठा प्रांत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ दक्षिण आफ्रिकेसारख्या देशाइतके मोठे आहे. येथील 78% लोकसंख्या बौद्ध आहे.
1959 मध्ये चीनने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना अंगरक्षकांशिवाय बीजिंगला भेट देण्याचे निमंत्रण दिले, परंतु चीनने त्यांना अटक करू नये म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांना घेरले होते. पुढे दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला. 1962 मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धामागे हे देखील एक कारण होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर चीनने इनर मंगोलियावर कब्जा केला. 1947 मध्ये चीनने त्याला स्वायत्त घोषित केले. इनर मंगोलिया हा चीनचा क्षेत्रफळानुसार तिसरा सर्वात मोठा उपविभाग आहे. त्याचे क्षेत्रफळ कोलंबियाएवढ्या मोठ्या देशाएवढे आहे.
हाँगकाँग पूर्वी चीनचा भाग होता, परंतु 1842 मध्ये ब्रिटिशांशी झालेल्या युद्धात चीनला तो गमवावा लागला. 1997 मध्ये ब्रिटनने हाँगकाँग चीनला परत केले, पण त्यासोबत 'एक देश, दोन प्रणाली' करार झाला. ज्या अंतर्गत चीनने हाँगकाँगला पुढील 50 वर्षांसाठी राजकीय स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. हाँगकाँगच्या लोकांना विशेष अधिकार मिळाले आहेत जे चीनच्या लोकांना नाहीत.
चीन तैवानलाही आपला भाग मानतो
1911 मध्ये चीनमध्ये कॉमिंगतांगचे सरकार स्थापन झाले. 1949 मध्ये येथे गृहयुद्ध सुरू झाले आणि माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी कॉमिंगतांग यांच्या पक्षाचा पराभव केला. पराभवानंतर कॉमिंगतांग तैवानला गेले. 1949 मध्ये चीनचे 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' आणि तैवानचे 'रिपब्लिक ऑफ चायना' असे नामकरण करण्यात आले. दोन्ही देश एकमेकांना मान्यता देत नाही. पण, तैवानही आपलाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे.
भारताच्या 43 हजार चौरस किमी भूभागावर चीनचा कब्जा
11 मार्च 2020 रोजी लोकसभेत दिलेल्या उत्तरात तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले होते की, लडाखचा सुमारे 38 हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय 2 मार्च 1963 रोजी चीन आणि पाकिस्तानमधील करारानुसार पाकिस्तानने पीओकेचा 5 हजार 180 चौरस किमी भाग चीनला दिला होता.
सध्या भारताच्या जितक्या भागावर चीनच्या ताबा आहे, तेवढे क्षेत्रफळ स्वीत्झर्लंडचेही नाही. एकूणच, चीनने भारताच्या 43 हजार 180 चौरस किमी क्षेत्रावर कब्जा केलेला आहे, तर स्वित्झर्लंडचे क्षेत्रफळ 41 हजार 285 चौरस किमी आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या 90 हजार चौरस किमी क्षेत्रावर चीनचा दावा आहे.
केवळ देश किंवा जमीनच नाही तर चीन समुद्रावरही आपला हक्क सांगतो
1949 मध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाल्यापासून चीन इतर देश आणि प्रदेशांवर कब्जा करत आहे. चीनची सीमा 14 देशांना लागून आहे, परंतु एका अहवालात असे म्हटले आहे की चीन 23 देशांच्या भूभागावर दावा करतो.
चीन दक्षिण चीन समुद्रावरही आपला हक्क सांगत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये असलेला हा समुद्र 3.5 दशलक्ष चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. हा समुद्र इंडोनेशिया, चीन, फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेईने वेढलेला आहे. परंतु, इंडोनेशिया वगळता इतर सर्व 6 देश या समुद्रावर आपला दावा करतात.
काही वर्षांपूर्वीपर्यंत या महासागराविषयी कोणताही वाद नव्हता. पण, सुमारे 5 वर्षांपूर्वी, चीनची समुद्रात खोदकाम करणार जहाजे विटा आणि वाळू घेऊन दक्षिण चीन समुद्रात पोहोचली. सुरुवातीला येथे एका छोट्या सागरी पट्टीवर बंदर बांधले गेले. त्यानंतर विमानांच्या लँडिंगसाठी हवाई पट्टी. आणि मग काही वेळातच चीनने कृत्रिम बेट बनवून इथे लष्करी तळ बनवला.
चीनच्या या कामावर जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा चीनने दावा केला की दक्षिण चीन समुद्राशी त्याचा संबंध 2 हजार वर्षांहून जुना आहे. हा समुद्र पूर्वी जपानच्या ताब्यात होता, पण दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लगेचच चीनने त्यावर आपला हक्क सांगितला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.