आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:भाऊ-बहिणीच्या रक्षाबंधनात यंदा असेल ‘चिनी कम’, राख्यांची आयात 30% घटली, सणांची ऑर्डरही बंद

कुलदीप सिंगोरिया | भोपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात राख्यांचा एकूण ६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय
  • बदलला ट्रेंड : ग्राहकही आता चीनमध्ये तयार साहित्य टाळताहेत

लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैनिकांसोबत झालेल्या हिंसक सैन्य संघर्षानंतर राखी व तिच्याशी संबंधित वस्तूंच्या आयातीवरही परिणाम झाला आहे. व्यावसायिकांनी वाद होण्याआधी सुमारे ७०% आयात केली होती, मात्र त्यानंतर नव्या ऑर्डर रोखण्यात आल्या आहेत. यामुळे चीनचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भरतिया यांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या सणांमध्येही चीनमधून आयात कमी होईल. दिवाळीत याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळेल. गेल्या वर्षी दिवाळीत ३२०० कोटी रुपयांच्या सामानाची आयात झाली होती, तर सन २०१८ मध्ये ८००० कोटी रुपयांचे साहित्य मागवले होते.

३ ऑगस्टच्या रक्षाबंधनासाठी या वेळी देशी धाग्याच्या राख्यांना जास्त मागणी आहे. यामुळे चीनमधून येणाऱ्या फॅन्सी राख्यांबद्दल चौकशी कमी झाली आहे. बदलत्या ट्रेंडमध्ये ग्राहकही आता चीनमध्ये तयार झालेले साहित्य टाळताहेत. राख्यांमध्ये वापरले जाणारे सजावटीचे साहित्य फोम, स्टोन इत्यादी चीनमधून आयात होते. याची किंमत सुमारे १२०० कोटी रुपयांपर्यंत असते. देशात राख्यांचा व्यवसाय ५ ते ६ हजार कोटी रुपयांचा आहे, जो यंदा कमी होऊन अडीच हजार कोटी रुपयांचा होऊ शकतो. देशात सर्वाधिक राख्या प. बंगालमध्ये तयार होतात. तसेच दिल्ली, मुंबई व गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात राख्या बनतात. बंगालचे राखी उत्पादक रोहित गुप्ता यांनी सांगितले की, राख्यांची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत ५०% कमी आहे. मात्र, कारागिरांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांना गेल्या वर्षाएवढेच काम मिळतेय.

फोनवर नोंदणी, पबजी व अॅव्हेंजर राखी ५ ते १५ रुपयांत

लॉकडाऊन आणि भाडे वाढल्याने राख्यांच्या किमतीत १०-१५% वाढ झाली आहे. दिल्लीच्या सदर बाजारात राखी एक रुपयापासून ७० रुपयांपर्यंत विकली जात आहे. मुलांसाठी पबजी, अॅव्हेंजर राखी ५ ते १५ रुपये आहे. कार्टून ब्रँड मोटू- पतलू राखी ३ ते १० रुपये, मेटॅलिक राखी १८० ते ३०० रुपये डझन व अँटिक राखी ६०० ते ७५० रुपये डझन विकली जात आहे. ऑर्डर फोनवर घेतली जात आहे.