आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज ख्रिसमस डे:कोकाकोला कंपनीची देणगी आहे लाल रंगाच्या पोशाखातील सांताक्लॉज; पूर्वी 25 डिसेंबर नाही तर 6 जानेवारी रोजी साजरा करायचे ख्रिसमस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज ख्रिसमसनिमित्त जाणून घेऊयात या सणाशी संबंधित काही किस्से

तुम्हाला माहीत आहे का? लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या सांताक्लॉजचे सध्याचे रुप एका कोला कंपनीची देण आहे. 1934 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी कोका-कोलाने प्रसिद्धीसाठी सांताक्लॉजला कंपनीच्या लोगोशी जुळता लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि पांढरी दाढी लावली होती. तेव्हापासून सांताक्लॉज अशाचप्रकारे आपल्याला दिसतो आहे. मूळ सांताक्लॉज अतिशय सोप्या पद्धतीने होता. या साध्यापणामुळे ते रात्री मुलांना गुपचूप भेटवस्तू देऊन निघून जात असत.

इतकेच नाही तर सुरुवातीची अनेक शतके येशूचा वाढदिवस 6 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. आता ख्रिसमस 25 डिसेंबरला असो की 6 जानेवारीला, खरं तर हे आहे की, बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कोणत्याही तारखेचा उल्लेख नाही.

सुरुवातीला ख्रिस्त समुदायामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाबद्दल मतभेद होते. 360 इ.स च्या आसपास रोमच्या एका चर्चमध्ये ईसा मसीहच्या वाढदिवसाच्या पहिला उत्सव साजरा केला होता. दीर्घ वाद आणि बऱ्याच चर्चेनंतर चौथ्या शतकात 25 डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून घोषित करण्यात आला. यानंतरही हे प्रचलनात येण्यास वेळ लागला.

बरेच लोक 6 आणि 7 जानेवारीला साजरा करतात ख्रिसमस

1836 मध्ये अमेरिकेत ख्रिसमसला कायदेशीर मान्यता मिळाली आणि 25 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. जगभरातील अनेक देश जसे की, कझाकिस्तान, रशिया, यु्क्रेन, इजिप्त या देशांमध्ये आजही 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जात नाही. अर्मेनियन अॅपोस्टोलिक चर्च 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तर रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला मानणारे 7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.

आज ख्रिसमसनिमित्त जाणून घेऊयात त्याच्याशी संबंधित काही किस्से

सांताक्लॉजच्या घराचा पत्ता देखील आहे

मुले सांताक्लॉजला दरवर्षी अनेक पत्रं लिहीत होते आणि सर्व पोस्ट ऑफिसमध्ये जमा होत होते. कॅनडाच्या एका पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याने मुलांच्या या पत्रांना उत्तर देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून कॅनडात सांताक्लॉजचा पत्ता HOH OHO बनले. या पत्त्यावर जगभरातून पत्रं येतात.

असे दिसायचे खरे सांताक्लॉज

संत निकोलस यांना खरे सांताक्लॉज मानले जाते. त्यांना मुले आणि गरजू लोकांना मदत करणे आवडायचे. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी संत निकोल नेहमीच अर्ध्या रात्री भेटवस्तू द्यायचे.

वृत्तपत्रात छापलेल्या फोटोपासून सुरु झाली ख्रिसमस ट्री ची परंपरा

जर्मनीत मार्टिन ल्यूथर यांनी बर्फाने माखलेल्या झाडापासून प्रेरित होऊन पहिल्यांदा ख्रिसमस ट्री सजवला होता. असेच एक झाड जर्मनीचे राजकुमार अल्बर्ट यांना चांगले वाटले आणि 1846 मध्ये त्यांनी पत्नी (इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया) यांना भेट म्हणून दिले. राजकुमार अल्बर्ट यांच्या पत्नीचा ख्रिसमस ट्री सोबतचा फोटो लंडन न्यूजमध्ये छापला आणि व्हायरस झाला. तेव्हापासून ख्रिसमस ट्रीच्या परंपरेला सुरुवात झाली असे मानले जात आहे.

सुकवण्यासाठी ठेवले होते मोजे, सांताने टाकले सोन्याचे नाणे

एका गरीब माणसाकडे मुलींच्या लग्नासाठी पैसे नव्हते. ख्रिसमसच्या दिवशी मुलीने तिचे मोजे धुवून सुकवण्यासाठी टाकले होते, त्यांच्या मदतीसाठी संत निकोलस पोहोचले आणि मोज्यात सोन्याचे नाणे टाकून निघून गेले. तेव्हापासून भेट वस्तूसाठी मोजे टांगणे एक परंपरा बनली.

पोलंडमध्ये कोळ्याच्या जाळ्यापासून सजवतात ख्रिसमस ट्री

पोलंडमध्ये कोळीला (किटक) संपन्नता आणि चांगल्याचे प्रतिक मानले जाते. येथे ख्रिसमस ट्री वर प्रतिकात्मक कोळी आणि त्याचे जाळे सजवले जाते.

6 ते 8 वर्षांत तयार होते एक ख्रिसमस ट्री

अमेरिकेत 1850 पासून ख्रिसमस ट्री ची विक्रीला सुरुवात झाली होती. चीड आणि फर चे झाड असते ख्रिसमस ट्री. आतापर्यंतचा सर्वात मोठा तरंगता ख्रिसमस ट्री ब्राझीलच्या रियो डि जेनेरियो शहरात आहे. याची उंची 278 फूट आहे. युरोपात दरवर्षी सुमारे 5 कोटी तर अमेरिकेत 3.5 कोटी ख्रिसमस ट्री सजवले जातात.

एक आभार गीत होते जिंगल बेल

जेम्स लॉर्ड पिअरपोंट यांनी चर्चच्या कॉन्सर्टसाठी एक आभार गीत जिंगल बेल लिहिले होते. 1857 मध्ये हे गीत रिपब्लिश केले आणि ख्रिसमसच्या दिवशी गायले जाणारे सर्वात लोकप्रिय गीत बनले.

भारतात ख्रिश्चन लोकांनी केरळमध्ये ठेवले होते पहिले पाऊल

भारतात ख्रिश्चन धर्माची सुरुवात केरळच्या क्रांगानोर येथून झाली होती. येशूचे 12 प्रमुख शिष्यांपैकी एक संत थॉपस इ. स 52 मध्ये केरळच्या कोडुन्गल्लुर येथे आले होते. भारतात आल्यानंतर संत थॉमस यांनी 7 चर्चची स्थापना केली होती.

बातम्या आणखी आहेत...