आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:भारताला करावा लागू शकतो वीज संकटाचा सामना; चीन-युरोपमधील वीज तर ब्रिटनमध्ये मिळत नाहीये पेट्रोल आणि डिझेल, या सगळ्याचे कारण काय?

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

भारतातील वीज कंपन्या कोळशाच्या कमी पुरवठ्याने त्रस्त आहेत. उद्योगांकडून विजेची मागणी वाढली आहे, परंतु जगभरात कोळशाचे दर गगनाला भिडत आहेत. हे आयात घटल्यामुळे आहे. हिवाळा येण्यापूर्वीच युरोपमध्ये विजेचे दर वाढू लागले आहेत. चीनने वीज कंपन्यांना देशाची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच चीनमध्ये विजेच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या कमतरतेमुळे लोक चिंतेत आहेत. येथील 90% पेट्रोल पंप कोरडे झाले आहेत. भारतातही पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या किंमती जगभरात वाढत आहेत.

अखेर, संपूर्ण जगात अचानक वीज आणि तेलाचा तुटवडा का निर्माण झाला? कोणत्या देशात सध्या परिस्थिती कशी आहे? या मागे काय कारणे आहेत? चला समजून घेऊ…

कोळशाची कमतरता विजेचे संकट वाढवू शकते
भारतातील कोळशाच्या कमतरतेमुळे आगामी काळात वीज संकट येऊ शकते. देशातील वीज क्षेत्रातील कोळशावर आधारित वीज प्रकल्पांचा वाटा 70 टक्के आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, 29 सप्टेंबर रोजी देशातील 135 कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांपैकी 16 कोळशा प्लांट्सचा साठा संपला होता. अर्ध्याहून अधिक प्लांट्समध्ये 3 दिवसांपेक्षा कमी स्टॉक शिल्लक होता, तर 80% प्लांट्समध्ये एका आठवड्यापेक्षा कमी स्टॉक शिल्लक होता.

कोळशाच्या या कमतरतेचे कारण काय?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील औद्योगिक क्षेत्रात विजेची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर विक्रमी पातळीवर आहेत. देशात किंमती खूप कमी आहेत. या फरकामुळे आयातीच्या अडचणी वाढल्या आहेत. देशातील कोळसा उत्पादनात 80% वाटा असलेल्या कोल इंडियाचे म्हणणे आहे की, जागतिक कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आपल्याला देशांतर्गत कोळसा उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. मागणी आणि पुरवठा यातील दरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतात पेट्रोलियम किंमती वाढण्याचे कारण काय?
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. IOC नुसार, दिल्लीत पेट्रोल 101.89 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 90.17 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 107.95 रुपये आणि डिझेल 97.84 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तीन आठवडे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ हे त्याचे कारण असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.

ओपेक देशांच्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजेच सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

चीनमधील संकट काय आहे?
बीजिंगच्या कोळसा खाणींमध्ये सध्या सुरक्षा तपासणी सुरू आहे. यामुळे येथील खाणींचे उत्पादन कमी झाले आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे विजेचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे बीजिंगच्या ज्या कंपन्यांमध्ये वीजेशिवाय काम होऊ शकत नाही, तिथे विजेचे रेशनिंग सुरू झाले आहे.

कोळशाचे उत्पादन कमी झाल्यामुळे स्थानिक औष्णिक कोळशाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या किमती विक्रमी 80% वाढल्या आहेत.

विजेचे दर बीजिंगनेच ठरवले आहेत. औष्णिक कोळशाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे अनेक वीजनिर्मिती केंद्रे बंद करावी लागली. यामुळे येथे विजेचे संकट उभे झाले आहे.

हे संकट कधी संपण्याची अपेक्षा आहे?
गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार असे म्हटले आहे की, सुमारे 44% चीनी कंपन्या या संकटामुळे प्रभावित झाल्या आहेत. चायना इलेक्ट्रिसिटी कौन्सिलने अलीकडेच म्हटले आहे की, कोळशावर चालणाऱ्या वीज कंपन्या कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विस्तार करु पाहत आहेत. जेणेकरून हिवाळ्यात होणारी विजेची मागणी पूर्ण करता येईल, परंतु कोळसा व्यापाऱ्यांनी असे म्हटले आहे की, यासाठी नवीन आयात स्रोताचा विचार करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण, रशिया युरोपच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देत आहे. पावसामुळे इंडोनेशियातील उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याच वेळी, मंगोलियामधून आयात देखील ट्रकिंगमुळे खोळंबली आहे.

युरोपीय देशांमध्ये वीज संकट
युरोपियन युनियन (EU) देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्पेनमध्ये दर तिप्पट झाले आहेत. विजेचे दर वाढल्याने युरोपमध्ये येणारा हिवाळा खूप कठीण होऊ शकतो. कारण हिवाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असते. लोकांना त्यांचे घर उबदार ठेवण्यासाठी विजेची गरज आहे.

युरोपच्या वीज संकटाचे कारण काय आहे?
युरोपमधील या वीज संकटामागे अनेक स्थानिक कारणे आहेत. यामध्ये नैसर्गिक वायू साठा आणि परदेशी शिपमेंटमध्ये घट, तसेच प्रदेशातील सौर शेती आणि पवनचक्कींमधून कमी झालेले उत्पादन यांचा समावेश आहे. न्यूक्लिअर जनरेटर आणि इतर प्लांट्ससुद्धा देखरेखीच्या कामासाठी ऑफलाइन करण्यात आले आहेत.

येत्या काही महिन्यांत मागणी वाढणार आहे, परंतु येत्या काही दिवसांमध्ये गोष्टी सोप्या होतील, अशी अपेक्षा आहे, कारण देखरेखीसाठी ऑफलाइन करण्यात आलेले प्लांट्स लवकरच सुरू होतील. यासह रशिया आणि जर्मनी दरम्यान पूर्ण झालेली नॉर्ड स्ट्रीम -2 गॅस पाइपलाइन देखील सुरू होईल.

या संकटादरम्यान, स्पेन, इटली, ग्रीस, ब्रिटनसह सर्व युरोपियन देश वेगवेगळे उपाय करत आहेत. यामध्ये सबसिडी देण्यापासून किंमतींवर अप्पर कॅप लावण्यापर्यंतच्या उपायांचा समावेश आहे. जेणेकरून लोकांच्या समस्या काही प्रमाणात कमी होतील.

यूकेमधील 90% पेट्रोल पंपांवर तेल संपले आहे
गेल्या काही दिवसांपासून यूकेमध्ये पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांच्या दरम्यान, तेथील लोकांनी घाबरून खरेदी सुरू केली. परिणामी, देशातील 90% पेट्रोल पंपांना 'तेल संपले' असा बोर्ड लावावा लागला. पेट्रोल पंपावर हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. सरकारला लोकांना धीर धरण्याचे आवाहन करावे लागले.

सत्य हे आहे की, यूकेमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता नाही. याचे कारण ट्रकवाल्यांचा अभाव आहे. जे पेट्रोलियम उत्पादने रिफायनरी ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत नेतात. ही कपात ब्रिटनच्या EU मधून बाहेर पडण्याचा दुष्परिणाम आहे. कोरोनामुळे ट्रक चालकांचे प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण स्थगित केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली.

या अडचणीवर मात करण्साठी यूके सरकार काय करत आहे?

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने हजारो परदेशी ट्रक चालकांना तात्पुरता व्हिसा दिला आहे. जेणेकरून ते तेल बाजारात पोहोचवता येईल. यासोबतच लष्करालाही मदतीसाठी स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहे. सरकारला आशा आहे की, लवकरच पेट्रोल पंपांवर तेल नेण्याची प्रक्रिया सुरळीत होईल.

बातम्या आणखी आहेत...