आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्ताफ..मुफ्ती अन् एन्काउंटर:आई म्हणाली -तो अतिरेकी कधी बनला हे कळले नाही, दीड वर्षांनी आम्हाला त्याचा मृतदेहच मिळाला

संध्या द्विवेदी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक अरुंद, पण अतिशय सुंदर गल्ली. जणू हिरवळीने इथे आपले बस्तानच बसवले आहे. काश्मीरला नंदनवन म्हणणारा कदाचित याच रस्त्यावरुन गेला असेल. वाटेत मुले खेळत होती. पण आम्ही जसाच गल्लीत प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांच्या भेदक नजरा आमच्या येण्याच्या कारणांचा शोध घेत होत्या.

तेव्हा मी मध्येच रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना विचारले -'तुम्हाला कमांडरचे घर माहित आहे का?' या गल्लीतल्या प्रत्येक मुलाला कमांडरची ओळख आहे, का? कारण, तो अतिरेकी होता आणि गेल्या वर्षी पोलीस चकमकीत मारला गेला होता. मुलांनी लगेच माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले - 'होय.' मुलाने एका घराकडे बोट दाखवले.

’घरापर्यंत येशील?’ त्यानंतर 3 मुले आमच्यासोबत सोबत चालू लागले. आकाश, जमीर व आणखी एक मुलगा. सर्वांचे वय 4-6 वर्षांचे होते.

'कमांडर काय करत होता? त्याला पोलिसांनी का मारले?'...एक मुला धडकपणे म्हणाला -'तो काश्मीर टायगर्ससाठी काम करत होता. तो अतिरेकी होता.' मी म्हणाले 'तुम्ही काय होणार?' ते तत्काळ म्हणाले -'पायलट...आयपीएस...'

अखेर, आम्ही अतिरेकी कमांडर मुफ्ती अल्ताफच्या घरी पोहोचलो. तिथे स्मशान शांतता होती. दोन महिला ओट्यावर बसल्या होत्या.

'हे मुफ्तींचे घर आहे का?' आम्ही विचारले. त्यावर संशयास्पद नजरांनी आम्हाला 'हो' असे प्रत्युत्तर दिले.

’आम्ही पत्रकार आहोत. आम्हाला मुफ्तीविषयी चर्चा करायची आहे. त्याची आई किंवा पत्नीशी संवाद साधायचा आहे.’

एका वृद्ध महिलेने आमच्याकडे पाहिले. त्यानंतर बसण्याचा इशारा केला. काश्मिरी भाषेत प्रथम तिने काहीही सांगण्यास नकार दिला. पण, आम्ही तिच्या वेदना जगापुढे मांडण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांच्या भावनांचा बांध फूटला. त्या हूमसून रडत होत्या. त्या म्हणाल्या -’माझा मुलगा नमाज पठण करत होता. तो अतिरेकी नव्हता. तो केव्हा अतिरेकी झाला, हे आम्हाला कळलेही नाही.’

एकेदिवशी तो नमाज पठण करण्यासाठी गेला, त्यानंतर जिवंत परतला नाही.

'अल्लाहची शपथ आम्हाला तो अतिरेकी असल्याचे माहीत नव्हते. तो 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्री नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतला नाही. दीड वर्षांपर्यंत आम्ही त्याचा शोध घेतला.' जवळच बसलेली अल्ताफची बहीण सांगते -'त्याला पत्नी व 2 मुली आहेत. आम्ही सर्वच नातेवाईक व ओळखींच्या व्यक्तींकडे त्याचा शोध घेतला. पण, काहीच कळले नाही. पोलिसांतही तक्रार केली. पण, कोणतेच उत्तर मिळाले नाही.'

दुसरीकडे, आई रडून संपूर्ण घटनाक्रम सांगते, 'आमच्या घरी दररोज पोलिस येत होते. माझ्या छोट्या मुलालाही दोनवेळा उचलून नेले. त्याला अनेक महिने डांबून ठेवले. आम्ही त्यांना आम्हीही अल्ताफचा शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच आढळल्यानंतर लगेच त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगू असेही स्पष्ट केले. पण, पोलिसांनी आमच्यावर कोणताही विश्वास दाखवला नाही.' त्या म्हणाल्या -'अल्ताफ नमाजी होता. तेव्हाही पोलिस त्याला अतिरेकी समजत होते. त्याची अनेकदा चौकशी झाली. ते त्याच्यावर विनाकारण दबाव टाकत होते. तू कुणासाठी काम करतो असे प्रश्न करत होते. काहीवेळा त्यांनी शस्त्रास्त्रांचीही पडताळणी केली. पोलिसांच्या या कृतीमुळे अल्ताफ चिडत होता. याच संतापाने एकेदिवशी त्याचा घात केला.'

माझ्या छोट्या मुलगा सुरक्षित राहील ना?

मुफ्तीची आई म्हणते -'दीड वर्षांपर्यंत आम्ही त्याचा दारोदार शोध घेतला. पण, तो सापडला नाही. एकेदिवशी मुफ्ती आढळल्याची बातमी आली. 30 डिसेंबर 2021 ची तारीख मी कशी विसरेल. त्यावेळी पोलिसांनी त्याला चकमकीत ठार मारल्याची दुसरी बातमी आमच्या कनावर आदळली.'

पोलिसांनी सांगितले की अल्ताफ काश्मीर टायगर्स या अतिरेकी संघटनेत भरती झाला होता. त्यामुळे त्याचे एन्काउंटर करण्यात आले. मुफ्तीची आई पुन्हा वेड्यासारखी करू लागते. विचारते -'मुली, आता माझ्या छोट्या मुलाला काही होणार नाही ना? तुझी शपथ अल्ताफ अतिरेकी संघटनेत भरती झाल्याचे आम्हाला ठावूक नव्हते. आम्हाला माहिती असते तर आम्ही त्याला तसे करू दिले नसते.'

अल्लाह...कोणत्याही आईवर मुलाचे पार्थीव पाहण्याची वेळ येऊ नये

एन्काउंटरला जवळपास दीड वर्ष झाले आहे. पण, आईच्या डोळ्यातून अश्रू अजून थांबले नाहीत. त्या सांगतात -'आमचे घर उद्ध्वस्त झाले. अल्ताफ दीड वर्षांपासून बेपत्ता होता. या महिन्यांत त्याचा आवाज माझ्या कानी पडला नाही असा एकही दिवस गेला नाही. कदाचित तो बेपत्ताच राहिला असता तर खूप चांगले झाले असते. एकदिवस तो घरी परतला असता. देवावर माझा पूर्ण विश्वास होता.'

त्या धायमोकलून रडत होत्या. 'एकदा गेला तर जिवंत परतला नाही. देवाने कोणाच्याही आईवर मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आणू नये. तरुण मुलाचे पार्थीव पाहून मेल्याहून मेल्यासारखे होते.'

कोण होता अल्ताफ?

लष्कराच्या माहितीनुसार, अल्ताफ काश्मीर टायगर्स नामक अतिरेकी संघटनेचा म्होरक्या होता. तो आपल्या टीमचा कमांडर होता. श्रीनगरच्या जेवान भागात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात काश्मीर टायगर्सचा हात होता. त्यात 3 जवान शहीद, तर 11 गंभीर जखमी झाले होते. या संघटनेचा खोऱ्यातील अनेक अतिरेकी हल्ल्यांत हात आहे.

अल्ताफने रचला काश्मीर टायगर्सचा पाया

  • काश्मीर टायगर्सची सुरुवात मुफ्ती अल्ताफ उर्फ अबू झारने केली होती.
  • माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याने स्वतः एका व्हिडिओतून ही माहिती दिली होती.
  • प्रथम जैशशी संबंधित असलेला अल्ताफ अतिरेक्यांची मदत करत होता.
  • 13 डिसेंबर 2021 रोजी अल्ताफने भारतीय रिझर्व पोलिसांच्या जवानांवर हल्ला केला.
  • 30 डिसेंबर 2021 रोजी सुरक्षा दलांनी चकमकीत त्याचा खात्मा केला.
  • 2019 नंतर काश्मीरमध्ये 4 नव्या संघटना स्थापन झाल्या -कश्मीर टायगर्स, TRF, PAFF, LEM
  • काश्मीरमध्ये 36 देशांच्या 36 अतिरेकी संघटना सक्रिय आहेत.
  • सुरक्षा दलांनी आतापर्यंत 12 हजारांहून अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
  • पाकिस्तान भाडोत्री अतिरेक्यांना दरमहा 25 ते 50 हजार रुपयांचे वेतन देते.
बातम्या आणखी आहेत...