आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Common Cold And Cold Vaccine Will Also Save You 58% From Reaching The Emergency Ward In Case Of Corona, Know What Other Benefits

लस एक फायदे अनेक:सामान्य सर्दी आणि खोकल्याची लस कोरोना झाल्यास तुम्हाला 58% इमरजन्सी वार्डात जाण्यापासून वाचवेल, जाणून घ्या इनफ्लुएन्झा लसीचे काय आहेत फायदे

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर..

जगभरात कोरोना विषाणूची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. दरम्यान, एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की फ्लू (इनफ्लुएन्झा) ची लस कोरोना संसर्गाचा प्रसार रोखू शकते. एवढेच नाही तर फ्लूची लस स्ट्रोक, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणजेच रक्त गोठणे आणि सेप्सिसचा धोका देखील कमी करते. अमेरिकेतील मियामी मिलर स्कूल ऑफ मेडिसिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात की, 'संशोधनादरम्यान समोर आले आहे की, ज्या लोकांना 6 महिन्यांपूर्वी फ्लू म्हणजेच इन्फ्लूएंझाची लस मिळाली होती, त्यांना कोरोनामुळे इमरजन्सी आणि आयसीयूमध्ये दाखल होण्याचा धोका कमी झाला.'

अनेक मोठ्या देशांत 75 हजार कोरोना संक्रमित लोकांवर झाले संशोधन
शास्त्रज्ञांनी सुमारे 75 हजार कोरोना बाधितांच्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. ते म्हणतात की, दरवर्षी फ्लूची लस घेणाऱ्या कोरोना पीडितांना स्ट्रोक, सेप्सिस आणि रक्ताच्या
गुठळ्या होण्याचा धोका 40% कमी असल्याचे आढळले आहे. फ्लूची लस घेतलेल्या कोरोना रुग्णांना ICU मध्ये दाखल करण्याची गरज देखील कमी पडल्याचे दिसून आले आहे.

 • या संशोधनात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, इटली, इस्रायल आणि सिंगापूर येथील रुग्णांचा समावेश होता. संशोधकांनी 75 हजार कोविड रुग्णांना 37,000 रुग्णांच्या दोन गटांमध्ये विभागले.
 • एका गटात 37 हजार रुग्ण होते ज्यांना कोरोना संसर्गापूर्वी फ्लूची लस मिळाली होती. त्याच वेळी, दुसऱ्या गटात कोविडचे असे रुग्ण होते ज्यांना फ्लूची लस मिळाली नव्हती.
 • निकालांमध्ये दिसले की, ज्यांना फ्लूची लस मिळाली नाही त्यांना ICU मध्ये दाखल करण्याची शक्यता 20% अधिक होती. आपत्कालीन परिस्थितीत दाखल होण्याचा धोका 58%, सेप्सिसचा धोका 45% आणि स्ट्रोकचा धोका 58%पर्यंत होता.

हे संशोधन त्या देशांना दिलासा देऊ शकते जिथे अद्याप कोरोनाची लस पोहोचलेली नाही

 • जगात 85 पेक्षा जास्त देश असे आहेत जिथे 2023 पर्यंत कोरोनाची लस पोहोचणार नाही किंवा पोहोचण्याचा दर खूपच मंद असेल. अशा परिस्थितीत हे संशोधन त्या देशांसाठी दिलासादायक ठरू शकते जिथे लस पोहोचलेली नाही, किंवा लसीकरणाची गती अतिशय मंद आहे.

भारतात लसीकरणाची गती मंदावली आहे

 • जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे विकसित देशांच्या तुलनेत लसीकरण खूपच संथ गतीने सुरु आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या मते, देशात सध्या 57,518 व्हेंटिलेटर आहेत.

कोरोना संसर्गामुळे देशात आतापर्यंत 4.27 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी अनेक लोकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. जर आपण लसीकरणाबद्दल बोललो तर आतापर्यंत केवळ 8.3% भारतीयांचे पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे, म्हणजेच त्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर 29.0% लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अशावेळी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मियामी मिलर स्कूल ऑफ मेडिसिनचे संशोधक म्हणतात, 'आतापर्यंत जगभरातील केवळ थोड्याच लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळालेआहेत. अशा परिस्थितीत, या महामारीत होणा-या मृत्यू आणि रोगांची संख्या कमी करण्याची गरज आहे. कोरोना महामारीच्या काळात अभ्यासाचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला हा अभ्यास जगभरातील रोगाचा वाढता दबाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.'

फ्लू लस कोरोना लसीला पर्याय नाही

 • तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, फ्लूची लस उपयुक्त ठरू शकते, परंतु कोरोना लसीसाठी पर्याय असू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर लोकांना कोरोनाची लस मिळणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...