आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग आता वाढला आहे. म्हणजेच पृथ्वी आता 24 तासांपेक्षा कमी कालावधीत एक परिभ्रमण पूर्ण करत आहे.
यामुळे आता दिवसांचा कालावधी कमी झाला आहे. संगणक, मोबाइल यांसारख्या गॅझेटमधील वेळेची भरपाई करण्यासाठी निगेटिव्ह लीप सेकंद आणले गेले तर ही गॅझेट्स क्रॅश होऊ शकतात.
अशा स्थितीत आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पृथ्वी इतक्या वेगाने का परिभ्रमण करत आहे? याचे कारण काय? त्याचा फायदा होईल की तोटा? याबद्दल जाणून घ्या..
प्रश्न 1: लीप सेकंद म्हणजे काय?
लीप इयरबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच. प्रत्येक 4 वर्षांत 1 दिवस जोडला जातो. त्याचप्रमाणे, कधीकधी 1 सेकंद जोडण्याची आवश्यकता भासते. लीप इयर प्रमाणे याला लीप सेकंद म्हणतात.
पृथ्वीला 360 अंश परिभ्रमणासाठी 86,400 सेकंद म्हणजेच 24 तास लागतात. परंतु त्याच्या अक्षावर, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी डळमळते, ज्यामुळे पृथ्वीला परिभ्रमणासाठी एक सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. जर ही वेळ अचूकपणे मोजली, तर प्रत्यक्षात ती 86,400.002 सेकंद इतकी आहे.
दररोज हे 0.002 सेकंद जमा होत राहतात आणि एका वर्षात सुमारे 2 मिलीसेकंद जोडले जातात. अशा प्रकारे एक संपूर्ण सेकंद सुमारे 3 वर्षात तयार होतो. पण हा काळ इतका कमी असतो की कधी कधी तो पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो.
त्याचा परिणाम म्हणजे इंटरनॅशनल अॅटोमिक टाइम (IAT) सोबतचा समन्वय बिघडतो.हे सुधरवण्यासाठी घड्याळांच्या वेळेत अनेक वेळा 1 सेकंद जोडून सुधारणा केली जाते.
प्रश्न 2: पृथ्वी किती वेगाने परिभ्रमण करत आहे?
29 जून हा दिवस 24 तासांपेक्षा कमी म्हणजेच आतापर्यंतचा सर्वात लहान दिवस होता. या दिवशी, पृथ्वीने आपल्या अक्षावर 24 तासांपेक्षा कमी म्हणजे 1.59 मिलिसेकंद (सेकंदाच्या हजारव्या भागापेक्षा थोडे जास्त) आधीच परिभ्रमण पूर्ण केले. त्याचवेळी, 26 जुलै रोजी, पृथ्वीने 1.50 मिलिसेकंदांपूर्वी आपले परिभ्रमण पूर्ण केले होते.
प्रश्न 3: पृथ्वीच्या वेगाने परिभ्रमण करण्याचे कारण काय आहे?
दीर्घ कालावधीत पाहिल्यास पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक शतकात पृथ्वीला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी काही मिलिसेकंद अधिक वेळ लागतो.
पृथ्वीचा परिभ्रमणाचा वेग वाढण्यामागे सध्या कोणतेही स्पष्ट कारण नाही. परंतु काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, पृथ्वीच्या आतील किंवा बाहेरील थरातील बदल, महासागर, हवामानातील बदल हे याचे कारण असू शकतात.
काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे चांडलर वोबलमुळे असू शकते, जे पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या अक्षातील एक लहान विचलन आहे.
प्रश्न 4: त्याचा काही फायदा होऊ शकतो का नुकसान होईल?
अहवालानुसार, जर पृथ्वी वेगाने फिरत राहिली तर नवीन निगेटिव्ह लीप सेकंदाची आवश्यकता भासू शकते जेणेकरून घड्याळांचा वेग सूर्यानुसार समायोजित करता येईल.
निगेटिव्ह लीप सेकंडमुळेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि इतर कम्युनिकेशन सिस्टीमच्या घड्याळांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. मेटा ब्लॉगच्या अहवालात असे म्हटले आहे की, लीप सेकंद शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु ही अशी बाब आहे ज्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत.
कारण 23:59:59 नंतर घड्याळे 23:59:60 वर जातात आणि नंतर पुन्हा 00:00:00 पासून सुरू होतात. वेळेतील हा बदल कॉम्प्युटर प्रोग्राम क्रॅश करू शकतो आणि डेटा देखील करप्ट होऊ शकतो कारण हा डेटा टाइम स्टॅम्पसह सेव्ह केला जातो.
मेटा ने अहवाल दिला की, जर निगेटिव्ह लीप सेकंद जोडला गेला तर, घड्याळे 23:59:58 नंतर सरळ 00:00:00 वर जातील आणि याचे घातक परिणाम होऊ शकतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी इंटरनॅशनल टाइमरला ड्रॉप सेकंद जोडणे आवश्यक आहे.
गुगल, अॅमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसारख्या अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांनी याला धोकादायक ठरवत लीप सेकंड संपवण्याची मागणी केली आहे.
प्रश्न 5: आत्तापर्यंत लीप सेकंद किती वेळा जोडला गेला आहे?
सौर वेळ आणि अणुवेळ यातील फरक दूर करण्यासाठी कॉर्डीनेटेड युनिव्हर्सल टाइम (UTC) तयार करण्यात आला आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न 1972 पासून सुरू आहेत.यापूर्वी सूर्य आणि चंद्राच्या गतीच्या आधारे वेळ ठरवली जायची.
लीप सेकंद जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. जगभरातील घड्याळांवर आधारित UTC 27 वेळा लीप सेकंदांनी बदलण्यात आले आहे. खरे तर काही वर्षांपूर्वीपर्यंत असे मानले जात होते की, पृथ्वीची अक्षावर परिभ्रमण वेग कमी होत आहे.अणु घड्याळाच्या गणनेनंतर 1973 पर्यंत असे मानले गेले. यानंतर, इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अँड रेफरन्स सिस्टम सर्व्हिस (IERS) ने लीप सेकंद जोडण्यास सुरुवात केली. 31 डिसेंबर 2016 रोजी 27 व्यांदा लीप सेकंद जोडण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.