आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Congress President Election Candidate Inside Story; Ashok Gehlot Mallikarjun Kharge | Shashi Tharoor

काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगेंच्या दावेदारीची 4 कारणे:पाठबळ नसल्याने दिग्विजय सिंहांची माघार, तर खरगे मजबुरीची पसंती?

लेखक: वैभव पळनीटकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर आणि झारखंडचे केएन त्रिपाठी यांच्यात लढत होणार आहे. नामांकनासाठी वेळ घेणारे दिग्विजय सिंह काही मिनिटांतच शर्यतीतून बाहेर पडले. उमेदवारांमध्ये नव्या नावाची भर पडली मल्लिकार्जुन खरगे यांच्या. दिग्विजय यांच्याशिवाय सुरुवातीला अध्यक्षपदाचे उमेदवार मानले जाणारे अशोक गहलोत हे त्यांचे प्रस्तावक बनले.

दिग्विजय सिंह हे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरल्याचे राजकीय विश्लेषक राशीद किदवई यांचे मत आहे. त्याच वेळी, CSDS मधील प्राध्यापक अभय दुबे म्हणतात – खरगे यांना अध्यक्ष बनवणे हा एक मजबुरीचा सौदा आहे, कारण सोनिया गांधी शशी थरूर यांना अध्यक्ष करू शकत नाहीत. दिग्विजय यांना वाटले की त्यांना अध्यक्ष केले जाणार नाही, त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतली.

नामांकनादरम्यान मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेसचे मोठे नेते प्रस्तावक म्हणून पोहोचले. खरगेंनी म्हटले 17 ऑक्टोबरला पाहू काय निकाल येतो. मी विजयी होण्याची आशा आहे.
नामांकनादरम्यान मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेसचे मोठे नेते प्रस्तावक म्हणून पोहोचले. खरगेंनी म्हटले 17 ऑक्टोबरला पाहू काय निकाल येतो. मी विजयी होण्याची आशा आहे.

आता दोन दिवसांमध्ये झपाट्याने बदललेली परिस्थिती समजून घ्या...

नामांकनाच्या ठिक एक दिवस आधी दिग्विजय सिंह यांना विचारण्यात आले की, तुम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहात, तर तुम्हाला गांधी घराण्याचा पाठिंबा आहे असे समजावे का?

दिग्विजय यांचे उत्तर- गांधी परिवाराची कृपा माझ्यावर नेहमीच राहिली आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक पद, प्रत्येक वेळ त्यांच्यामुळेच मिळाली.

पुढचा प्रश्न- पुढचे पदही गांधी घराण्यामुळे मिळेल का?

दिग्विजय यांचे उत्तर – गांधी परिवाराने निवडणूक खुली सोडली आहे. माझा विश्वास आहे की कोणीही निवडणूक लढवू शकतो.

मग शुक्रवार आला म्हणजे नामांकनाचा शेवटचा दिवस...

सकाळी 10:35 वाजता: काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री म्हणाले की शशी थरूर, दिग्विजय सिंह आणि कदाचित मल्लिकार्जुन खरगे उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी अधिक लोकांना उमेदवारी दाखल करायची आहे, त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. शशी थरूर यांनी रात्री 11.25 पर्यंत आणि दिग्विजय सिंह यांनी 11 ते 11:30 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याविषयी सांगितले होते.

सकाळी 11:30 वाजता: अचानक संपूर्ण दृश्य बदलले. मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पहिल्यांदाच उमेदवारीच्या रेसमध्ये दिसू लागले. दिग्विजय सिंह पुढे आले आणि म्हणाले- मी त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्विजय सिंह, ज्यांना काँग्रेसचे पुढील अध्यक्ष मानले जात होते, त्यांनी स्वतःच माघार घेतली. हे कसे घडले हे राजकीय जाणकारांनाही समजले नाही. आम्ही अनेक काँग्रेस नेत्यांना आॅफ द रेकॉर्ड विचारले की काय झाले? ते म्हणाले की, आम्ही स्वतः आश्चर्यचकित झालो आहोत.

आता खरगे हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. यामागे 4 कारणे आहेत.

1. गहलोत यांच्या नकारानंतर पर्याय म्हणून खरगे यांची निवड करण्यात आली.

अशोक गहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा काँग्रेस हायकमांडचा प्रयत्न होता. निवडून आलेला प्रतिनिधी आणि मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री अध्यक्षपदी विराजमान होईल, असा हेतू होता. तो कठपुतळीसारखा न दिसता खऱ्या नेत्यासारखा दिसला पाहिजे हाही हेतू होता. गहलोत यांच्या बंडखोर वृत्तीने हा प्रयत्न फसला. गहलोत मुख्यमंत्रीपदी कायम राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र ते पक्षाचे अध्यक्ष होणार नाहीत, हे निश्चित झाले आहे.

2. वक्तव्यांमुळे दिग्विजय यांची वाईट प्रतिमा
दिग्विजय सिंह यांनी अनेकवेळा आपल्या वक्तव्यांनी पक्षाच्या प्रतिमेला धक्का दिलेला आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेनला ओसामाजी म्हणणे असो, किंवा यूपीए सरकारबद्दल सांगणे असो की सत्तेची दोन केंद्रे (मनमोहन आणि सोनिया) नीट काम करु शकले नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार जाण्यामागे अनेक तज्ज्ञ दिग्विजय सिंह यांनाच जबाबदार मानतात.

त्यांचे म्हणणे आहे की दिग्विजय आपल्या राज्यातील सरकार वाचवू शकले नाहीत, तर राष्ट्रीय पातळीवर पक्षाला कसे वाचवणार. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन दिग्विजय सिंह यांना मुख्य उमेदवार बनवू नये, असे सांगितले होते. त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल. यानंतर दिग्विजय यांना हटवून खरगे यांचे नाव पुढे करण्यात आले.

3. खरगे हे गांधी घराण्याचे विश्वासू आणि 'यस मॅन' आहेत

८० वर्षीय मल्लिकार्जुन खरगे हे मूळचे कर्नाटकचे आहेत. पक्षात तळापासून वर आलेले ते नेते आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर ते भावूक झाले. मी इयत्ता सहावीत शिकायचो, तेव्हा काँग्रेसची पत्रके वाटायचो, भिंतींवर लिहून प्रचार करायचो असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसला जवळून ओळखणारे सांगतात की ते नेहमीच गांधी घराण्याचे निकटवर्तीय राहिले आणि त्यांचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानत राहिले. अशा स्थितीत खरगे अध्यक्ष झाले तर काहीही झाले तरी ते पक्ष हायकमांडला आव्हान देणार नाहीत हे निश्चित आहे. इतर नेत्यांच्या बाबतीत हे आत्मविश्वासाने सांगता येत नाही. गहलोत यांचे उदाहरण या बाबतीत अगदी ताजे आहे.

4. खरगे राहुल यांचे निकटवर्तीय
विजय चौकात निदर्शनादरम्यान राहुल गांधी अचानक रस्त्यावर बसले. यानंतर काँग्रेसचे इतर दिग्गज नेतेही रस्त्यावर बसू लागले. मल्लिकार्जुन खरगे यांना वयामुळे बसण्यास त्रास होत होता. हे राहुल गांधींना समजले.

त्यांनी खरगेंना रिलॅक्स राहण्याचा इशारा केला आणि पाण्याची बाटली त्यांना दिली. राहुल आणि खरगे यांच्या निकटतेचे असे अनेक किस्से आहेत. खरगे यांचे नाव निश्चित करण्यापूर्वी राहुल यांनी दिग्विजय यांच्यापेक्षा खरगे यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

खरगे यांच्या उमेदवारीवर अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार शशी थरूर काय म्हणाले तेही वाचा

दिग्विजय हे अंतर्गत राजकारणाचे बळी, खरगे मजबुरीची पसंत
राजकीय विश्लेषक राशीद किदवई म्हणतात की दिग्विजय सिंह हे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले आहेत. दिग्विजय सिंह यांची राजकीय पत चांगली आहे आणि त्यांना काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीचीही चांगली जाण आहे.

दिग्विजय सिंह यांनी स्वतःच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असावा, असे म्हणणे अतिशय कठीण आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्यांना हा इशारा कुठून मिळाला?

दुसरीकडे, खरगे ही मजबुरीतील निवड आहे. त्यांचा सामाजिक आधार, राजकीय उंची आणि निष्ठा एवढी होती, तर अशोक गहलोत यांच्या तुलनेत त्यांची उपेक्षा का झाली? गहलोत यांनी सहमती दर्शवली असती तर आज ते प्रबळ दावेदार झाले असते आणि खरगे त्यांना साथ देत राहिले असते. पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या धामधुमीत त्यांची भूमिका होती, नंतर काय हाल झाले हे सर्वांनीच पाहिले. गेल्या काही दिवसांत ते राजस्थानमध्येही पर्यवेक्षक म्हणून गेले होते, पण रिकाम्या हातांनी परतले.

काँग्रेसने स्वतःचे नुकसान केले आहे, अंतर्गत लोकशाही ही केवळ बोलण्यापुरतीच
सीएसडीएसमधील प्राध्यापक अभय दुबे म्हणतात की, नामांकनाच्या दिवशी सकाळी जे काही घडले, त्यात काँग्रेसचेच नुकसान झाले आहे. काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेतून जो फायदा मिळायला हवा होता तो आता मिळणार नाही. अशोक गहलोत यांना राजस्थानचे सिंहासन सुरक्षित ठेवायचे असून तेच त्यांचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सूचित केले.

खरगे यांना अध्यक्षपदाचा उमेदवार बनवणे हा मजबुरीचा सौदा आहे. सोनिया गांधी शशी थरूर यांना अध्यक्ष करू शकत नाहीत, कारण थरूर हे काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.

22 वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे, काँग्रेसला लोकशाहीची काळजी असती तर 22 वर्षांनी निवडणुका झाल्या असत्या? मध्ये अनेकदा निवडणुका व्हायला हव्या होत्या. कोणत्याही पक्षात लोकशाही नाही, तर ही पक्ष चालवण्याची एक व्यवस्था असते. यामध्ये बड्या नेत्यांच्या वतीने असा नेता निवडला जातो, जो पक्षाचे संघटनात्मक काम पाहतो.

जे काही झाले त्यात अशोक गहलोत यशस्वी झाले. पायलट यांना हायकमांडच्या माध्यमातून मुख्यमंत्री व्हायचे होते, गहलोत यांनी ती शक्यता दूर केली. सचिन पायलटच्या समर्थकांना बंड करावा लागत आहे, अशी परिस्थिती आहे. राजस्थानमध्ये त्यांना कोणीही हरवू शकत नाही हे गहलोत यांनी दाखवून दिले आहे.

आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांचे विधान वाचा.

बातम्या आणखी आहेत...