आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरकाँग्रेस अध्यक्षपदाच्या सर्वाधिक चर्चेतील निवडणुका:गांधींच्या आग्रहामुळे नेहरुंसाठी पटेल यांनी घेतली माघार, वाचा सविस्तर...

लेखक: अभिषेक पाण्डेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही 1946 सालची गोष्ट आहे. देश स्वतंत्र होणार होता आणि काँग्रेसचे अध्यक्ष देशाचे पहिले पंतप्रधान होणार हे निश्चित झाले होते. काँग्रेसच्या 15 पैकी 12 राज्य समित्या सरदार पटेल यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याच्या बाजूने होत्या, पण गांधींच्या सांगण्यावरून पटेल यांनी शर्यतीतून माघार घेतली आणि जवाहरलाल नेहरू अध्यक्ष झाले.

हा किस्सा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित सर्वात वादग्रस्त आणि चर्चित किश्यांपैकी एक आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा नेहमीच राजकारण आणि वादांचा मंच राहिला आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे आमनेसामने आहेत.

दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये, आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित 4 सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. सुभाषचंद्र बोस यांनी गांधींच्या उमेदवाराचा पराभव केला, नंतर राजीनामा दिला, पक्ष सोडला

1938 मध्ये हरिपूर येथे झालेल्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बोस आणि महात्मा गांधी यांच्यात स्वातंत्र्य चळवळीच्या दिशेबाबत अनेक मुद्द्यांवर वैचारिक मतभेद होते.

1939 मध्ये बोस यांनी दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी सादर केली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी महात्मा गांधींची पहिली पसंती अबुल कलाम आझाद होती, पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला.

गांधीजींनी जवाहरलाल नेहरूंना अध्यक्ष होण्यास सांगितले, पण आधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या नेहरूंनी त्यात रस दाखवला नाही. अखेरीस गांधींनी आंध्र प्रदेशातील काँग्रेस नेते पट्टाभी सीतारमैय्या यांना निवडणूक लढवण्यास राजी केले.

रुद्रांग्शू मुखर्जींनी त्यांचे पुस्तक 'नेहरू अँड बोस: पॅरालल लाईव्ह्स' मध्ये लिहिले आहे, निवडणुकीपूर्वीच काँग्रेस वर्किंग कमिटीने सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याची आणि पट्टाभि सीतारमैयांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली होती.
रुद्रांग्शू मुखर्जींनी त्यांचे पुस्तक 'नेहरू अँड बोस: पॅरालल लाईव्ह्स' मध्ये लिहिले आहे, निवडणुकीपूर्वीच काँग्रेस वर्किंग कमिटीने सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याची आणि पट्टाभि सीतारमैयांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली होती.

29 जानेवारी 1939 रोजी मध्य प्रदेशातील त्रिपुरी येथे झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोस यांना 1580 आणि सीतारामय्या यांना 1377 मते मिळाली. बोस यांच्या विजयानंतर गांधीजी म्हणाले होते, "मी त्यांच्या (बोस) विजयाने खूश आहे... आणि पट्टाभी यांनी माझ्यामुळे अध्यक्षपदावरून माघार घेतली नसल्यामुळे हा पराभव त्यांच्यापेक्षा माझा जास्त आहे...'

बोस यांच्या विजयानंतर गांधीजी म्हणाले की त्यांनी स्वतःची कार्य समिती स्थापन करावी. गांधीसमर्थक काँग्रेस कार्यकारिणी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि काँग्रेसच्या कार्यशैलीवरून आधीच असलेले मतभेद अधिकच तीव्र होत गेले.

8 फेब्रुवारी 1939 रोजी सरदार पटेल यांनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 'त्यांच्यासोबत (सुभाषचंद्र बोस) काम करणे अवघड आहे कारण त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे'.

22 फेब्रुवारी 1939 रोजी, गांधी समर्थक समजल्या जाणार्‍या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या 15 पैकी 13 सदस्यांनी वर्धा येथे CWC बैठकीत राजीनामा दिला. 10-12 मार्च दरम्यान त्रिपुरी येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषचंद्र बोस आजारी असतानाही स्ट्रेचरवरून आले, परंतु गांधीजींनी या बैठकीत भाग घेतला नाही. राजीनामे दिलेले काँग्रेस कार्यकारिणीचे इतर सर्व सदस्य या बैठकीत उपस्थित होते.

सभेत ठराव मांडताना गांधींच्या धोरणांवर काँग्रेसची निष्ठा व्यक्त करण्यात आली आणि नवीन अध्यक्षांनी गांधींच्या इच्छेनुसार कार्य करून नवीन कार्यसमिती स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रस्तावानंतर सुभाषचंद्र बोस यांच्याकडे गांधींची इच्छा मान्य करण्याशिवाय पर्याय उरला नाही, तेही अशा वेळी जेव्हा गांधींनी सीतारमैय्या यांचा पराभव आपला वैयक्तिक पराभव म्हणून घेतला.

सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले होते, पण त्यांची कार्यकारिणी नव्हती. अखेरीस, सुभाषचंद्र बोस यांनी कार्यसमिती तयार करण्यास असमर्थता दर्शवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस सोडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा नवीन पक्ष स्थापन केला.

नेहरूंच्या पाठिंब्याने 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर पट्टाभी सीतारमैय्या काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

2. पटेल विरुद्ध नेहरू वादात गांधींनी नेहरूंची बाजू घेतली

मौलाना अबुल कलाम आझाद यांची 1940 मध्ये रामगढ अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. एप्रिल 1946 पर्यंत ते या पदावर राहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताचे स्वातंत्र्य फार दूर नाही हे जवळपास निश्चित झाले होते. देशाचा सर्वात मोठा आणि प्रमुख पक्ष असल्याने काँग्रेसचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होतील, हेही त्यावेळी निश्चित होते.

मौलाना आझाद यांच्या 'इंडिया विन्स फ्रीडम' या आत्मचरित्रानुसार, 1946 मध्ये मौलाना आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु 20 एप्रिल 1946 रोजी महात्मा गांधींनी अध्यक्षपदासाठी जवाहरलाल नेहरूंना पसंती असल्याचे जाहीर केले.

दुसरीकडे, गांधीजींचा पाठिंबा असूनही, काँग्रेस पक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांना अध्यक्ष आणि पहिले पंतप्रधान बनवण्याच्या समर्थनात होता. तोपर्यंत केवळ प्रदेश काँग्रेस समित्याच काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती आणि निवड करू शकत होत्या.

काँग्रेसच्या 15 पैकी 12 प्रदेश समित्यांनी सरदार पटेल यांची निवड केली. एकाही प्रदेश काँग्रेस समितीने नेहरूंना नामनिर्देशित केले नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या काही सदस्यांनी नेहरूंच्या नावाचा प्रस्ताव मांडला असला तरी त्यांना तसे करण्याचा अधिकार नव्हता.

गांधी नेहरूंशी बोलले, पण जेव्हा त्यांना कळले की नेहरू दुसऱ्या क्रमांकावर जाण्यास इच्छुक नाहीत तेव्हा त्यांनी पटेल यांना त्यांचे नाव मागे घेण्यास सांगितले.

नेहरुंची आत्मकथा, अ पॉलिटिकल बायोग्राफी लिहिणाऱ्या मायकल ब्रेचर यांनी लिहिले आहे, "पटेल प्रदेश समितींची पसंती होते. नेहरूंची निवड गांधींच्या हस्तक्षेपामुळे झाली होती. पटेल यांना पद सोडण्यासाठी तयार करण्यात आले"
नेहरुंची आत्मकथा, अ पॉलिटिकल बायोग्राफी लिहिणाऱ्या मायकल ब्रेचर यांनी लिहिले आहे, "पटेल प्रदेश समितींची पसंती होते. नेहरूंची निवड गांधींच्या हस्तक्षेपामुळे झाली होती. पटेल यांना पद सोडण्यासाठी तयार करण्यात आले"

पटेल यांनी माघार घेतल्याने नेहरूंचा काँग्रेस अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. मे 1946 मध्ये नेहरू अध्यक्ष झाले. एका महिन्यानंतर, व्हाईसरॉयने नेहरूंना काँग्रेस अध्यक्ष म्हणून अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले.

ब्रेकर यांनी लिहिले आहे, 'गांधींनी हस्तक्षेप केला नसता तर पटेल हे 1946-47 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते.... सरदारांकडून हा पुरस्कार हिसकावून घेण्यात आला.'

मौलाना अबुल कलाम यांनी त्यांच्या इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्रात लिहिले आहे- "... कदाचित ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती... मी सरदार पटेलांना पाठिंबा दिला नाही... त्यांनी जवाहरलाल सारखी चूक कधीच केली नसती. या विचाराने मी स्वतःला कधीही क्षमा करु शकत नाही की जर मी या चुका केल्या नसत्या तर कदाचित गेल्या दहा वर्षांचा इतिहास वेगळा असता."

3. सीताराम केसरी, काँग्रेसचे ते अध्यक्ष ज्यांना खोलीत बंद केले होते

1996 मध्ये बिहारचे सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1997 मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला. केसरी हे स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसशी जोडले गेले होते आणि स्वातंत्र्यासाठी ते अनेकदा तुरुंगात गेले होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते.

1998 मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या. काँग्रेस अध्यक्ष केसरी यांच्या जागी सोनिया गांधी पक्षाच्या मुख्य प्रचारक झाल्या. सोनियांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, पण काँग्रेस 141 जागा जिंकू शकली आणि बहुमत आणि सत्ता या दोन्हीपासून दूर राहिली.

काँग्रेसच्या पराभवाचे खापर पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्यावर फोडण्यात आले. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार, जितेंद्र प्रसाद, एके अँटनी आणि प्रणव मुखर्जी यांसारख्या नेत्यांनी 5 मार्च 1998 रोजी बैठक घेतली आणि या नेत्यांनी सोनियांना अध्यक्ष होण्याचे आवाहन केले.

9 मार्च 1998 रोजी सीताराम केसरी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपले पद सोडू असे सांगून त्यांनी राजीनामा मागे घेतला. यानंतर केसरी जास्त काळ अध्यक्षपदावर राहू शकले नाही.

14 मार्च 1998 रोजी सकाळी केसरी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीतील पक्षाच्या 24, अकबर रोड येथील मुख्यालयात पोहोचले. येथे प्रणव मुखर्जी यांच्या घरी झालेल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले - पहिला केसरी यांना पदावरून हटवण्याचा आणि दुसरा सोनियांना अध्यक्ष करण्याचा.

CWC बैठकीसाठी केसरी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले तेव्हा तारिक अन्वर वगळता कोणीही काँग्रेस नेता केसरींच्या स्वागतासाठी उभा राहिला नाही. केसरी यांच्या सेवेबद्दल आभार मानत प्रणव मुखर्जी यांनी सोनियांना अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव ठेवल्यावर केसरी रागाने बैठक सोडून त्यांच्या कार्यालयात गेले.

मनमोहन सिंग यांच्यासह काही काँग्रेस नेते केसरींचे मन वळवण्यासाठी त्यांच्या मागे गेले, पण त्यांनी परत येण्यास नकार दिला. केसरींना सोनिया अध्यक्ष होईपर्यंत पुढचे काही तास त्यांच्या खोलीत बंद करण्यात आले. त्याच दिवशी केसरी घरी जाण्यासाठी कारकडे जात असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांचे धोतर ओढण्याचा प्रयत्न केला.

या घटनेच्या एका वर्षानंतर, 20 मे 1999 रोजी, सोनियांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याबद्दल शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत आलेल्या केसरी यांच्यासोबत धक्काबुक्की झाली.

सोनिया अध्यक्ष झाल्यानंतर सीताराम केसरी काँग्रेसमध्ये लो-प्रोफाईल नेते राहिले. एप्रिल 2000 मध्ये राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.
सोनिया अध्यक्ष झाल्यानंतर सीताराम केसरी काँग्रेसमध्ये लो-प्रोफाईल नेते राहिले. एप्रिल 2000 मध्ये राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.

पंतप्रधान झाल्यानंतर छत्तीसगडमधील भाषणादरम्यान सीताराम केसरींसोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'सीताराम केसरींना काँग्रेस अध्यक्षपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु देण्यात आला नाही हे देशाला माहीत आहे. पक्षप्रमुख म्हणून सोनिया गांधी यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांना कार्यालयाबाहेरील फुटपाथवर फेकण्यात आले होते.'

4. अध्यक्षपदासाठी नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्याला आव्हान देणारे जितेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले काँग्रेसी

1999 मध्ये काँग्रेसने तीन ज्येष्ठ नेते शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांची सोनियांविरोधात बंड केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्या आली. या तिन्ही नेत्यांनी सोनिया इटालियन वंशाच्या आणि अननुभवी असल्यामुळे भारताच्या पंतप्रधान होण्यास योग्य नसल्याचे सांगत त्यांना विरोध केला होता. या तिन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही सोनियांच्या नेतृत्वाविरोधातील आंदोलन थांबलेले नव्हते. आता विरोधाची धुरा राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या हाती गेली होती.

जितेंद्र प्रसाद हे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबातून आले होते, ज्यांचे पश्चिम बंगालमधील टागोर आणि पंजाबमधील कपूरथला स्टेटशी कौटुंबिक संबंध होते. 1985 मध्ये, राजीव गांधींनी त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे सरचिटणीस आणि नंतर आपले राजकीय सचिव बनवले होते. 1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान आणि नंतर काँग्रेस अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी जितेंद्र प्रसाद यांना त्यांचे राजकीय सचिव बनवले.

सोनियांविरोधात निवडणूक लढण्याविषयी जितेंद्र प्रसाद म्हणाले होते, 'माझा सोनियांना वैयक्तिक विरोध नाही, पण मला पक्ष कार्यकर्त्यांची मान्यता हवी आहे. मी असहमती आणि अंतर्गत लोकशाहीचा अधिकार कायम ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे.'
सोनियांविरोधात निवडणूक लढण्याविषयी जितेंद्र प्रसाद म्हणाले होते, 'माझा सोनियांना वैयक्तिक विरोध नाही, पण मला पक्ष कार्यकर्त्यांची मान्यता हवी आहे. मी असहमती आणि अंतर्गत लोकशाहीचा अधिकार कायम ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे.'

वर्ष 2000 मध्ये जितेंद्र प्रसाद आणि राजेश पायलट यांनी सोनियांकडून पक्षाचे नेतृत्व काबिज करण्यासाठी मोहीम सुरु करत अनेक रॅली काढल्या. तेव्हा अचानक 11 जून रोजी 55 वर्षीय राजेश पायलट यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

पायलट यांनी कधीही अधिकृतपणे सोनियांविरोधात लढण्याची घोषणा केली नव्हती, परंतु 62 वर्षीय जितेंद्र प्रसाद यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोनियांविरोधात दावा केला होता. नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्याला अध्यक्षपदासाठी आव्हान देणारे प्रसाद हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले काँग्रेस नेते होते.

सोनियांना आव्हान देताना जितेंद्र काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते आणि काँग्रेसचे उपाध्यक्षही राहिले होते. त्याच वेळी, यूपीसह इतर काही राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये त्यांचे वर्चस्व होते, परंतु सोनियांचा पराभव करण्यासाठी या गोष्टी अपुर्‍या ठरल्या.

जितेंद्र प्रसाद यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी देशभर दौरे केले, परंतु त्यांना काँग्रेस शाखांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. जेव्हा प्रसाद लखनौमधील काँग्रेस कार्यालयात पाठिंबा मिळवण्यासाठी पोहोचले तेव्हा ते कार्यालय बंद होते आणि तेथे कोणीही नव्हते. काँग्रेसच्या एकाही नेत्याला त्यांच्यासोबत दिसावे असे वाटत नव्हते.

ज्येष्ठ पत्रकार इफ्तिकार गिलानी यांनी लिहिलं आहे की, 'कदाचित ही सोनियांची सूचना नसावी, पण काँग्रेस कशी काम करते हे यावरून दिसून येतं.'

9 नोव्हेंबर 2000 रोजी जितेंद्र प्रसाद यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोनिया गांधींकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. 7542 मतांपैकी सोनियांना 7448 आणि प्रसाद यांना केवळ 94 मते मिळाली.

पराभवानंतर डिसेंबर 2000 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र प्रसाद म्हणाले होते, "माझा पराभव केल्यानंतर, माझे दिसणे कदाचित त्यांना आश्वस्त करत असावे. माझ्या पाठीमागे सामना फिक्स होता, पण मी हा दावा करत नाही की त्या कदाचित सरळ खेळल्या असत्या तर मी जिंकलो असतो."

जानेवारी 2001 मध्ये जितेंद्र प्रसाद यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांचा मुलगा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाला असून योगी सरकारमध्ये मंत्री आहे.

अधिक वाचनासाठी संदर्भ:

Nehru & Bose: Parallel Lives’ by Rudrangshu Mukherjee

Maulan Abul Kalam Azad, 1957 India Win Freedom.

Rajmohan Gandhi, 1991, Patel: A Life, Ahmedabad

Durgadas, 1969, India from Curzon to Nehru and After, New Delhi

M. Brecher, Nehru: A Political Biography

बातम्या आणखी आहेत...