आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Congress Govt Map 1967 Vs 2022; Arvind Kejriwal Aam Aadmi Party Punjab Election Results | Congress Ruled States

दिव्य मराठी इंडेप्थ:एकेकाळी 21 राज्यांमध्ये सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला कशी लागली ओहोटी? 'आप'सारख्या नवख्या पक्षांनी असा केला काँग्रेसचा गेम!

लेखक: अनुराग आनंद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पक्षाने पंजाबमध्येही काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आहे. निवडणुकीत 92 जागा जिंकून केजरीवाल यांनी काँग्रेसची शिकार करूनच आपली राजकीय भूक भागवणार असल्याचे सिद्ध केले आहे. 'आप'ने काँग्रेसकडून सत्ता हिसकावण्याची ही दुसरी वेळ आहे. दिल्लीत पानिपत झाल्यानंतर काँग्रेसला पुन्हा राजधानीत पाऊल ठेवता आलेले नाही. तथापि, काँग्रेसला अस्तित्वासाठी छोट्या आणि प्रादेशिक पक्षांशी संघर्ष करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्वातंत्र्यानंतर अशी अनेक राज्ये आहेत जिथे एकेकाळी सत्तेतून गेलेली काँग्रेस स्वबळावर परत येऊ शकली नाही.

आजच्या दिव्य मराठी इंडेप्थमध्ये जाणून घेऊयात की, स्वातंत्र्यानंतर देशातील अम्ब्रेला पार्टी कशी राज्यांतून संकुचित होत-होत केवळ दोनच राज्यांत सत्तेवर आहे? गेल्या 10 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे?

1952 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 21 राज्यांत बनले काँग्रेसचे सरकार

1952 मध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 21 राज्यांमध्ये आपले सरकार स्थापन केले होते, जे आता फक्त दोन राज्यांत अस्तित्वा आहे. काँग्रेससमोर पहिले मोठे आव्हान दक्षिण भारतातील केरळमधून आले. 1956 मध्ये भाषेच्या आधारे अनेक क्षेत्र एकत्र करून केरळची निर्मिती झाली. त्यानंतर लगेचच, 1957च्या विधानसभा निवडणुकीत, ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांनी सरकार स्थापन केले, ज्यामुळे सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

या विजयाकडे भारतात डाव्यांची सुरुवात म्हणून पाहिले जात होते. तथापि, तीन वर्षांतच सरकार पडले आणि 1960 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा परतली,पण एकवेळच्या सत्ताबदलाने कम्युनिस्ट पक्षाला नवी आशा दिली.

परिणामी, केरळमध्ये पुन्हा 1967 मध्ये सात पक्षांनी युती करून काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकले. यानंतर कधी काँग्रेसच्या, तर कधी डाव्यांच्या हातात सत्ता आली आहे. मात्र, 2021च्या निवडणुकीच्या निकालात कम्युनिस्ट पक्षाला पुन्हा सत्ता मिळाल्याने केरळमध्ये काँग्रेसची अवस्था दिल्लीसारखी होईल, असे अंदाज बांधले जात आहेत.

1952 मध्ये कोणत्या राज्यांत काँग्रेस सरकार होते

1967चा तो काळ जेव्हा काँग्रेसला प्रादेशिक पक्षांकडून कडवी झुंज मिळाली

1967 मध्ये देशाचे दोन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर निवडणुका झाल्या. या वर्षी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 11 राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश आले. अन्नधान्याचा तुटवडा हे त्याचे प्रमुख कारण होते. देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे महागाई दिवसेंदिवस वाढत होती. सर्वसामान्य जनता काँग्रेसवर नाराज होती.

अशा परिस्थितीत 20 वर्षे काँग्रेस सरकारमध्ये लोक भरडले गेले आणि आता त्यांना नवीन पक्ष आजमावायचे होते. 1965 च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला साथ दिली होती आणि रशियाची भारताप्रति असलेली उदासीनताही समोर आली होती. अशा स्थितीत काँग्रेस सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत लोकांमध्ये नाराजी होती.

काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव तमिळनाडूत म्हणजेच तत्कालीन मद्रासमध्ये झाला. येथे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) ने विधानसभेच्या 234 पैकी 138 जागा जिंकल्या होत्या. येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मद्रासचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचाही पराभव झाला. त्याचप्रमाणे बंगाल आणि ओडिशातही काँग्रेसचा पराभव झाला. यूपीमध्ये पहिल्यांदाच चौधरी चरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. त्यांचा नवीन पक्ष भारतीय क्रांती दलाने इतर लहान पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले.

आता ग्राफिक्समध्ये पाहा, 1967 मध्ये कोणत्या राज्यात काँग्रेसचे सरकार होते

1980 मध्ये पाच राज्यांमध्ये काँग्रेसची प्रादेशिक पक्षांशी थेट स्पर्धा होती
1971 मध्ये इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाची देशातील 17 राज्यांमध्ये सरकारे होती. हा तो काळ होता जेव्हा पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होते. बांग्लादेश मुक्त करण्यात इंदिरा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अशा स्थितीत देशात काँग्रेस पुन्हा एकदा जोरदारपणे उदयास येत होती. त्यानंतर 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. यानंतर इंदिराजींच्या विरोधात लोकांच्या मनात राग भरला. 1977 मध्ये जनता पक्षाच्या हातून काँग्रेसचा पराभव झाला असला तरी 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसने 529 पैकी 353 जागा जिंकून केंद्रात पुनरागमन केले. तथापि, 1980 मध्ये 15 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा इंदिराजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या राज्यांमध्ये धक्का बसला.

त्याचबरोबर या निवडणुकीत केरळमध्ये सीपीआय आणि सीपीएमव्यतिरिक्त मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस जेकब पार्टीने काँग्रेसला टक्कर दिली. तसंच तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम, पंजाबमध्ये अकाली दल आणि अरुणाचलमध्ये पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल यांनी काँग्रेसला आपली ताकद दाखवून दिली.

आता बघा 1985 मध्ये किती राज्यांत काँग्रेसचे सरकार होते

1990 नंतर अनेक राज्यांत काँग्रेस स्वबळावर परतली नाही

1990 नंतर काँग्रेसला बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये स्वबळावर पुनरागमन करता आलेले नाही. एकेकाळी या राज्यांमध्ये 80% पेक्षा जास्त जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष आता या राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय आपल्या भविष्याचा विचारही करू शकत नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तामिळनाडूमध्ये गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसला स्वबळावर सरकार बनवता आलेले नाही. येथे सरकार स्थापनेत प्रादेशिक पक्षांपेक्षा काँग्रेसची भूमिका छोटी आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1990 मध्ये लालू यादवांच्या जनता दलाने बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव केला, नंतर त्याच जनता दलाला आपली जमीन वाचवण्यासाठी काँग्रेसशी हस्तांदोलन करावे लागले. यानंतर बिहारमध्ये काँग्रेसची ताकद इतकी कमी राहिलीय की, आरजेडी आघाडी वेळोवेळी असे म्हणून टोमणा मारते की, काँग्रेसला 2020च्या निवडणुकीत क्षमतेपेक्षा 70 जागा जास्त दिल्या होत्या.

मागच्या 10 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपच नव्हे, तर प्रादेशिक पक्षही काँग्रेससाठी ठरले डोकेदुखी

2021 मध्ये बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आसाम या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्याचप्रमाणे 2022 मध्ये यूपी, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. या 10 राज्यांमध्ये पाहिले, तर उत्तराखंड हे एकच राज्य आहे, जिथे भाजपशी काँग्रेसची थेट लढत आहे आणि मध्यभागी कोणताही प्रादेशिक पक्ष मजबूत नाही. याशिवाय 9 राज्यांमध्ये काँग्रेसची लढत केवळ भाजपविरुद्धच नाही तर प्रादेशिक पक्षांविरुद्धही आहे. अशा स्थितीत भाजपपेक्षा प्रादेशिक पक्ष आता काँग्रेससाठी मोठी समस्या बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर, यूपीमध्ये प्रादेशिक पक्ष सपा आणि आरएलडीच्या जोडीला 125 आणि काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या. त्याचवेळी पंजाबमध्ये 'आप'ला 92, तर काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या. तसेच मणिपूरमध्ये एनपीएफला 5, एनपीपीला 7 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. गोव्यातही आप आणि टीएमसीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आणि काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षाच्या जोडीला 12 जागा मिळाल्या.

बातम्या आणखी आहेत...