आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये 27 वर्षांपासून कायम सत्तेत असलेल्या भाजपचे 'अंगद पाय' यंदा पुन्हा कोणीही हलवू शकले नाही. भाजपने 156 जागा जिंकून सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी मॅरेथॉन सभा घेतल्या, मोठे रोड शो केले. निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला होता. पण राहुल गांधींनी फक्त 2 सभा घेतल्या.
गुजरातमधील राहुल गांधींबाबत काँग्रेसची निवडणूक रणनीती काय होती, ती कशी अयशस्वी ठरली आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसचे काय नुकसान होऊ शकते, हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत.
सर्व प्रथम हे तीन ग्राफिक्स पाहा...
राहुल गांधी गुजरात निवडणुकीत अनुपस्थित राहिले हे वरील तीन ग्राफिक्सवरुन स्पष्ट होते. गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. गुजरात निवडणुकीदरम्यानच काँग्रेस अध्यक्षपदासाठी गदारोळ झाला होता. यादरम्यान गेहलोत यांचे सचिन पायलटसोबतचे भांडण चव्हाट्यावर आले. असे असतानाही काँग्रेसने अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास ठेवला.
निकाल समोर आहे....
विचारपूर्वक तयार केलेल्या रणनीतीनुसार राहुल गांधी गुजरात निवडणुकीपासून राहिले दूर
अशोक गेहलोत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'राहुल गांधींना गुजरात निवडणूक प्रचारात सहभागी होण्याची गरज नाही. त्यांनी सध्या भारत जोडो यात्रेवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे गुजरातमध्ये उपस्थित राहणे त्यांच्यासाठी शक्य नाही. काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने सुविचारित रणनीती अंतर्गत गुजरात निवडणुकांना वन मॅन शो होऊ दिला नाही. उलट कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना चेहरे बनवण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार अजय झा लिहितात की, यावेळी राहुल गांधींचे संपूर्ण लक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. गुजरातमध्ये मोदी विरुद्ध राहुल असा फायदा भाजपला मिळाला असता. राहुलला ते जाणवलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी दुसऱ्या पराभवाची नामुष्की त्यांना घ्यायची नव्हती.
राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांच्या मते, राहुल गांधी 2024 साठी स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. ते गुजरातमध्ये सामील झाले असते तर पराभवाचे खापर त्यांच्याच माथी घातले गेले असते. त्यामुळेच मुद्दाम स्थानिक नेत्यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवली गेली.
राहुल गांधींशिवाय निवडणूक लढवण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीचे फायदे आणि तोटे
ज्येष्ठ संपादक शेखर गुप्ता लिहितात की, राजकारण खूप क्रूर आहे. हे तुम्हाला आराम करण्याची, जखमी झाल्यास बरे होण्याची किंवा धोरणात्मक कालबाह्य होण्याची संधी देत नाही. तुमच्या विरोधात मोदी आणि केजरीवाल यांच्यासारखे नेते असताना अजिबात नाही. तुम्ही गुजरातच्या निवडणुकीतून ब्रेक घ्या आणि 2024 च्या निवडणुकीत अचानक चमत्कार कराल, असे होऊ शकत नाही.
राजकीय तज्ज्ञ रशीद किडवई यांच्या मते, राहुल गांधींशिवाय राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे नुकसान होऊ शकते, पण त्यामुळे काँग्रेस आपल्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे.
या रणनीतीचे काही फायदेही आहेत, असे रशीद किडवाई सांगतात. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशातही राहुल गांधींनी एकही सभा घेतली नाही. तिथे प्रादेशिक नेत्यांनी लोकांसमोर स्वत:ला मांडले आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळाले. आगामी कर्नाटक निवडणुकीतही काँग्रेस त्याच रणनीतीवर कायम राहणार आहे. राहुल गांधी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.