आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हकाँग्रेसला 47 जागांवर नुकसान करेल AAP:राजस्थानमध्ये गुजरातसारखी स्थिती राहिल्यास भाजपला फायदा

समीर शर्मा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील काँग्रेस सरकारसाठी पुढील विधानसभा निवडणुका कठीण होणार आहेत. आणि त्याला कारण ठरणार आहे, आम आदमी पार्टी. गुजरातमध्ये 'आप'ने काँग्रेसला ज्या प्रकारे हानी पोहोचवली, तशीच समीकरणे राजस्थानमध्ये तयार होताना दिसत आहेत.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने गुजरातपेक्षा राजस्थानमध्ये चांगली कामगिरी केली होती. हे प्रमाण कायम राहिल्यास पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत 'आप' काँग्रेसला 47 जागांवर नुकसान पोहोचवेल. तसे झाल्यास भाजपला सरकार स्थापन करणे सोपे जाईल.

गुजरातमध्ये 'आप'मुळे काँग्रेसला कसे झाले नुकसान

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या उमेदवारांना 13% मते मिळाली. 35 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार मते मिळवण्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. भाजपने जिंकलेल्या 156 जागांपैकी 33 जागांवर आप आणि काँग्रेसची मिळून मते भाजपच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत.

म्हणजेच 'आप'चा उमेदवार रिंगणात नसला तर काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा होती. 2017 मध्ये काँग्रेसला 41 टक्के मते मिळाली होती, ती आता 28 टक्क्यांवर आली आहे. मतदानाच्या या घटीमुळे काँग्रेसला 60 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या या 13 टक्के मतांमध्ये 'आप'ने मुसंडी मारल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील 51 जागांवरही आप काँग्रेसला अडचणीत आणू शकते.

'आप' फक्त काँग्रेसचेच नुकसान करेल, भाजपचे नाही, ते कसे...?

त्यासाठी काँग्रेसच्या मतदाराकडे पहावे लागेल… गुजरात आणि राजस्थानच्या संदर्भात. काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांमध्ये मुस्लिम, एससी आणि एसटी प्रवर्गातील लोक जास्त आहेत. अता आम आदमी पक्ष मोफत आणि सवलतींच्या घोषणा करून समाजातील कमी उत्पन्न असलेल्या वर्गाना आकर्षित करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. या वर्गाची सर्वाधिक मते आजवर काँग्रेसलाच पडत आली आहेत.

शहरी लोकसंख्येचा एक भागही 'आप'कडे वळला आहे. मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे दिल्ली मॉडेल दाखवून शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्यावरही आपचा भर आहे. काँग्रेसऐवजी 'आप' अधिक आक्रमक हिंदुत्ववादी मार्गाचा अवलंब करून या वर्गातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यसाचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेससाठी मोठा धोका, कारण… 5 वर्षांपूर्वी राजस्थानमधील कामगिरी गुजरातपेक्षा चांगली

गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची कामगिरी चांगली नव्हती. गुजरातपेक्षा राजस्थानमध्ये 'आप'ला जास्त मते मिळाली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, AAP ला राजस्थानमध्ये 0.4 टक्के मते मिळाली होती, तर गुजरातमध्ये 2017 च्या निवडणुकीत त्यांना फक्त 0.1 टक्के मते मिळाली होती.

तेव्हा आम आदमी पक्षाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही आणि त्यांचे उमेदवारही ओळख करुन देण्यातच व्यस्त होते. पंजाब आणि गुजरातमधील यशानंतर राजस्थानमध्ये आम आदमी पक्षाबाबतची धारणा झपाट्याने बदलली आहे.

राजस्थानमध्ये 47 जागांवर काँग्रेसला फटका बसणार

या 47 जागांवर तीन प्रकारच्या युतीमुळे काँग्रेसचे नुकसान होताना दिसत आहे-

पंजाबजवळील 18 जागा: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. राजस्थानच्या हनुमानगड आणि श्रीगंगानगरची पंजाबला लागून सीमा आहे, त्यांच्या सरकारचा फायदा घेऊन आम आदमी पक्ष या दोन जिल्ह्यांमध्ये तसेच त्यांच्या लगतच्या बिकानेर जिल्ह्यात आक्रमकपणे काम करेल. आम आदमी पक्षाचा या तीन जिल्ह्यांतील 18 विधानसभा जागांवर डोळा असून, पक्षाने येथे अंतर्गत सर्वेक्षणही केले आहे.

दिल्ली मॉडेलद्वारे 17 आदिवासी जागांवर विजय : आम आदमी पक्ष गुजरातच्या धर्तीवर आदिवासी आणि अनुसूचित जातीच्या भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. इथे प्रत्येक गावात त्यांचे स्वयंसेवक तयार केले जात आहेत. बांसवाडामधील 5, सिरोहीमधील 3, डुंगरपूरमधील 4 आणि उदयपूरमधील 5 जागांवर त्याचा परिणाम होईल, ज्याचा थेट फटका काँग्रेसला बसेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रदेशांतील तीन चतुर्थांश जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. 'आप' काँग्रेससाठी येथे 10 जागांवर थेट तर उर्वरित काही ठिकाणी अल्प प्रमाणात अडचणी निर्माण करेल. हे सर्व भाग गुजरातला लागून आहेत.

कमी फरकाने जीत-पराजीत झालेल्या 12 जागा : फतेहपूर, पोकरण, दातरामगड, खेजडी, बेगू, सांगोद, नावा, पचपदरा, मसुदा, चाकसू, भीम, वल्लभनगर अशा जागा आहेत, जिथे 2018 मध्ये ते 4 हजारांपेक्षा कमी फरकाने पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या आक्रमक प्रचाराचा या जागांच्या निकालावर परिणाम होऊन काँग्रेसचे समीकरण बिघडणार आहे.

काँग्रेस-भाजप नेत्यांच्या परस्पर लढ्याचा फायदा होईल- आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी विनय मिश्रा यांनी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधील लढतीचा फायदा पक्षाला होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की संपूर्ण राजस्थान हे फोकस क्षेत्र असले तरी श्रीगंगानगर, हनुमानगडसह अलवर आणि जयपूरमधील लोकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

राजस्थानच्या राजकारणाचे ज्येष्ठ विश्लेषक सीताराम झालानी आम आदमी पक्षाच्या या दाव्याशी सहमत नाहीत. दिल्ली आणि पंजाबमध्ये केजरीवाल यांचा प्रभाव दिसत असला तरी राजस्थानमध्ये मात्र चर्चा होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मतदान करताना राजस्थानची जनता बघेल की आप पक्षाचा नेता कोण आहे आणि राजस्थानमध्ये त्यांचे काय योगदान आहे, या आघाडीवर तुमच्यासमोर अडचणी उभ्या राहणार आहेत.

काँग्रेसचा युक्तिवाद- राजस्थानमध्ये आप फॅक्टर नाही, नुकसान होणार नाही

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते स्वर्णिम चतुर्वेदी म्हणतात की, गुजरातमध्ये आपमुळे नुकसान निश्चितच झाले आहे, पण राजस्थानमध्ये या पक्षाला जनाधार नाही, तर काँग्रेसकडे गेहलोत-पायलटसारखे नेते आहेत. 'आप'मध्ये नेता म्हणून कोणीही नाही, प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी परिस्थिती असते. त्यामुळे आम आदमी पक्ष येथे जास्त मते घेऊ शकणार नाही.

अशाच आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा...

गुजरात पराभवानंतरही अरविंद केजरीवाल खुश:आता दिल्लीत बंगला, झाडूवर कॉपीराइट; AAP झाला राष्ट्रीय पक्ष

गुरुवारची म्हणजे 8 डिसेंबरची संध्याकाळची वेळ. गुजरात निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले होते. सर्व विक्रम मोडीत काढत भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला केवळ 5 जागांवरच मर्यादीत राहावे लागल्याचे दिसत होते. निराशाजनक निकालादरम्यान, अरविंद केजरीवाल कॅमेरासमोर आले आणि आनंद व्यक्त करू लागले. तुमचा आम आदमी पक्ष आज राष्ट्रीय पक्ष झाला आहे. गुजरातच्या जनतेने आम्हाला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. देशातील मोजक्याच पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, आम आदमी पक्षाने अवघ्या 10 वर्षात हे यश मिळवले आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण या संदर्भात तीन प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेणार आहोत... पूर्ण बातमी वाचा...

गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेणार 'AAP':12% मते मिळवली, त्यामुळे काँग्रेसला 32 वर्षांतील कमी जागा

घटना 27 नोव्हेंबर 2022 ची आहे. खचाखच भरलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी एका कागदावर लिहिले - गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. बरोबर 12 दिवसांनंतर गुरुवारी जेव्हा ईव्हीएममध्ये जमा झालेल्या मतांची मोजणी झाली तेव्हा त्यांच्या पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. असे असूनही 'आप' आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुद्दा चुकीचा ठरल्याचे प्रथमदर्शनी दिसते, पण हे गणितही तितकेसे सोपे नाही. झाडूला मतदान करणाऱ्या गुजरातींची संख्या 0.62% वरून 12.9% झाली आहे. गुजरातमधील एकूण 182 जागांपैकी आम आदमी पार्टी 35 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिंकलेल्या जागा आणि दुसरा क्रमांक एकत्र केल्यास ही संख्या 40 होईल. म्हणजेच गुजरातमधील विधानसभेच्या 22% जागी 'आप'ने आपली छाप सोडली आहे. पूर्ण बातमी वाचा...

पंतप्रधानांच्या गावापासून गांधीनगरपर्यंत निवडणूक शांतच:काँग्रेसने AAP साठी मोकळा केला मार्ग, मतदानाच्या 8 दिवसांपूर्वी RSS सक्रिय

गुजरात निवडणुकीचे वृत्तांकन करण्यासाठी मी 10 नोव्हेंबरला अहमदाबादला पोहोचलो, तेव्हा 20 दिवसांनी इथे निवडणुका होणार आहेत, असे मला वाटत नव्हते. रस्त्यावर कुठेही झेंडे, बॅनर, नेते दिसत नव्हते. चहाच्या टपरीवरही निवडणुकीची चर्चा झाली नाही. अहमदाबादपासून सुरू झालेल्या या प्रवासात एकूण 7 टप्पे होते. यामध्ये वडनगर, मानसा, पिपलिया, द्वारका, जामनगर, गोध्रा आणि मोरबी यांचा समावेश होता. पूर्ण बातमी वाचा..

बातम्या आणखी आहेत...