आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Corona Can Occur Even After Taking Both Doses Of The Vaccine, But The Chances Of Serious Symptoms Are Reduced To 100%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नॉलेज सिरीज:लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो, पण गंभीर लक्षणांची शक्यता 100% पर्यंत कमी; संसर्गाने मृत्यू होणार नाही

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या फक्त 1 ते 1.5% लोकांना दोन्ही डोस दिले आहेत, ७०% लोकांना लस दिल्यास हर्ड इम्युनिटी शक्य

लसीकरणाशी संबंधित विविध संभ्रम आणि प्रश्नांवर ‘दैनिक भास्कर’ चे रवींद्र भजनी यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली. जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ..

लस कोरोनाला पूर्णपणे रोखेल की कोरोना झाल्यावर त्याचा परिणाम कमी करेल?
डॉ. अजय परीख ः कोरोना झाल्यावर लस त्याचा परिणाम कमी करेल. हे कवच आहे.
डॉ. व्ही. पी. पांडे ः लस ८४% किंवा ९१% परिणामकारक आहे, असे सांगितले जाते. म्हणजे त्या ८४% किंवा ९१% लोकांना संसर्ग होणार नाही. म्हणजे उर्वरित १६% किंवा ९% लोकांना संसर्ग होऊ शकतो. संशोधनानुसार, रोगाचे गांभीर्य कमी करण्यात लस १००% परिणामकारक आहे. ती मृत्यूला १००% रोखू शकते.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना होत आहे. असे का?
डॉ. अजय परीख ः लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर हा विषाणू संसर्ग करू शकतो, असा संदेश तो शरीराला देतो. त्यामुळे शरीर त्याच्याशी लढण्याची क्षमता स्वत:च विकसित करते. पहिला डोसही दोन-चार आठवड्यांत काही टक्क्यांपर्यंत अँटिबॉडी तयार करतो. अँटिबॉडी वेगवेगळ्या लसींसाठी ५० ते ७०% पर्यंत असतात.

डॉ. व्ही. पी. पांडे ः लसीची संरचनाच अशी आहे की, ती शरीरात जाऊन अँटिबॉडी रिअॅक्शन सुरू करते. अँटिबॉडी तयार होण्यास वेळ लागतो. लस घेतली आणि संध्याकाळी संसर्ग होणार नाही, असे होत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. पहिला डोस घेतल्यानंतर १५-२० दिवसांनी अँटिबॉडी तयार होऊ लागतात, पण कोरोनाला रोखू शकेल एवढ्या प्रमाणात नसतात. त्यानंतर दुसरा डोस घेतला जातो, त्याला बूस्टर म्हणतात.

काही लोकांना दुसऱ्या डोसनंतरही कोरोना होत आहे. हे कसे शक्य आहे?
डॉ. अजय परीख ः त्याचे आश्चर्य वाटू नये आणि लस प्रभावी नाही, असा विचारही करू नये. विषाणूचा प्रभाव कमी करणे हे लसीचे काम आहे. दुसऱ्या डोसच्या १५ दिवसांनंतर विषाणूची गंभीर लक्षणे निर्माण करण्याची क्षमता शून्य होते.

डॉ. व्ही. पी. पांडे : लोकांनी दोन्ही डोस घेतल्यावर दुर्लक्ष केले तर संसर्गाचा धोका वाढेल. दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी आपण म्हणू शकतो की संसर्ग झाला तरी तो गंभीर असणार नाही. मृत्यूपर्यंत जाणार नाही. भारतात २१ एप्रिलपर्यंत फक्त १ ते १.५% लोकांनाच दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ७०% लोकांनी डोस घेतला तर हर्ड इम्युनिटी शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...