आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Corona Cases Increasing In Countries That Have Vaccinated Half The Population; We Got Only 5% Of The Doses Here And People Became Careless.

एक्सप्लेनर:अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण झालेल्या देशात वाढत आहेत कोरोनाची प्रकरणे; भारतात फक्त झाले 5% लसीकरण आणि लोक निष्काळजीपणे वागू लागले

आबिद खान10 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • परदेशात लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणे कशी व का वाढत आहेत ते जाणून घेऊयात...

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. विशेष म्हणजे या देशांत निम्म्याहून अधिक लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. काही देशांनी तर अनलॉकचा निर्णय मागे घेत पुन्हा कठोर निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. फायझर, मॉडर्ना या लस कंपन्या देखील दोन डोसनंतर आता बूस्टर डोसची तयारी करत आहेत. दुसरीकडे, भारतात लोकसंख्येच्या फक्त 5% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, परंतु त्याच बरोबरीने निष्काळजीपणा देखील अनेक पटींनी वाढला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलच्या अनेक हिल स्टेशनला गर्दी जमल्यानंतर कडक उपाययोजना करावी लागली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोविड -19 ला रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास आणि गर्दी अशाच प्रकारे वाढत राहिल्यास कोरोनाची तिसरी लाट वेळेआधीच येऊ शकते.

परदेशात 50 टक्के लसीकरणानंतरही कोरोनाची प्रकरणे कशी व का वाढत आहेत ते जाणून घेऊयात...

यूकेः अनलॉकपूर्वीच दररोज 30 हजार प्रकरणे येत आहेत
यूकेमध्ये 51% पेक्षा जास्त लोकसंख्येला दोन डोस आणि 68% लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. त्यानंतरच सरकारने 19 जुलैपासून लॉकडाऊन शिथिल करण्याची तयारी केली. परंतु नवीन प्रकरणे येण्याची प्रक्रिया थांबली नाही. गेल्या आठवड्यात, प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे 410 नवीन प्रकरणे आढळली. शुक्रवारी यूकेमध्ये 35 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी 5 महिन्यांतील सर्वाधिक होती. गेल्या 5 दिवसांत 30 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे सातत्याने आढळली आहेत. लॉकडाऊन शिथिल केले तर परिस्थिती सुधारण्याऐवजी परिस्थिती आणखी बिकटहोईल असा इशाराही द अकॅडमी ऑफ मेडिकल रॉयल कॉलेजने (एएमआरसी) दिला आहे.

इस्त्रायलः मास्क पासून स्वातंत्र्य जूनमध्ये प्राप्त झाले होते, परंतु रेड झोनमध्ये 5 क्षेत्र
इस्रायलने आपल्या लोकसंख्येचे वेगवान लसीकरण केले. तेथे, 60% लोकसंख्येला दोन्ही डोस दिले गेले आहेत आणि 66% लोकसंख्येला कमीतकमी एक डोस मिळाला आहे. जेव्हा हा आकडा 50% पर्यंत पोहोचला तेव्हा तिथे मास्क न घालण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पण आता पुन्हा प्रकरणात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत 1 हजार नवीन प्रकरणे आढळून आली असून यासह सक्रिय प्रकरणांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली आहे. यानंतर, इस्रायलने धोरण बदलले आणि उच्च संसर्ग दर असलेल्या देशांमधून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनासुद्धा क्वारंटाइन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संसर्गाच्या दराच्या आधारे इस्त्रायलमधील 5 क्षेत्र रेड झोन म्हणून घोषित केली आहेत.

स्पेन: तरुण लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला
स्पेनमध्ये, सुमारे 45% लोकसंख्येला दोन्ही डोस दिले गेले आहेत. त्याच वेळी, 59% लोकसंख्येने कमीतकमी एक डोस घेतला आहे. यानंतरही गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हचे प्रमाण दुप्पट झाले आहे. 20 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत, या वयोगटातील अनेकांनी लसीचे डोस घेतलेले नाहीत. दर 1 लाख तरुणांपैकी 911 तरुणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. यासह, युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांत सातत्याने वाढ होत आहे. इटलीमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या एका आठवड्यात प्रत्येकी 1 लाख चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह केसेस 9 वरून 11 पर्यंत वाढले आहेत.

अमेरिका: डेल्टा व्हेरिएंटमुळे काळजी वाढली; दररोज 19 हजार नवीन प्रकरणे
अमेरिकेच्या सुमारे 49% लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण केले गेले आहे, तर 77% लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. यानंतरही निम्म्या राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 19 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथे सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. 80% नवीन प्रकरणांमागे कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

आतापर्यंत भारतात सुमारे 38 कोटी डोस
11 जुलै पर्यंत भारतातील 37.73 कोटी लोकांना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे. लोकसंख्येनुसार ते 22 टक्के आहे. तर लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस प्राप्त झाले आहेत. दररोज सुमारे 35 लाख डोस दिले जात आहेत. जर देशात याच दराने लसीकरण सुरू राहिले, तर भारताला निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण करण्यास आणखी काही महिने लागतील. पॉझिटिव्ह प्रकरणांबद्दल बोलायचे झाल्यास सध्या दररोज सरासरी 40 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. त्यापैकी 50% नवीन प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रात समोर येत आहेत.

लसीकरणानंतरही कोरोनाची नवीन प्रकरणे का वाढत आहेत?
डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार नवीन प्रकरणे वाढण्याची ही कारणे आहेत-

 • कोरोनाचे नवीन व्हेरिएंट : कोरोनाच्या डेल्टासह इतर प्रकारांमुळे काळजी वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंट 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेत 80% नवीन प्रकरणे डेल्टाची आहेत. तसेच, लँबडा व्हेरिएंटही 31 देशांपर्यंत पोहोचला आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, नवीन व्हेरिएंट मूळ स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमित करतात आणि लसीचा प्रभावदेखीलकमी करतात. .
 • लॉकडाऊनमधील शिथिलता : ज्या देशांमध्ये लसीकरणचा आकाड 50% पर्यंत गेला आहे तेथे सरकार लॉकडाऊन शिथिल करत आहे. परिणामी, लोक निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत आणि विषाणूला प्रसार करण्याची संधी देत ​​आहेत. इस्त्रायलमधील निवडणुकांनंतर प्रकरणे वाढू लागली. युरोपच्या बर्‍याच देशांमध्ये नाईटक्लब सुरु झाले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. युरो कपसारखे स्पोर्टिंग इव्हेंटही युरोपमधील कोरोनाच्या वाढत्या घटनामागील कारण असल्याचे मानले जाते.
 • लसीकरणाचा मंदावलेला वेग : बर्‍याच देशांमध्ये, लसीकरणाचा कमी वेग हा देखील नवीन प्रकरणांसाठी कारणीभूत ठरत आहे. रशिया, मॅक्सिको, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमध्ये प्रकरणे सतत वाढत आहेत. इंडोनेशियातील परिस्थिती इतकी बिकट आहे की, ऑक्सिजनसाठी इतर देशांची मदत घ्यावी लागत आहे. मॅक्सिकोमध्ये एका आठवड्यात संसर्ग दर 29% वाढला आहे. रुग्णालयांतील 23% बेड कोरोना रुग्णांनी भरलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर राजधानी सिडनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

आपल्याला लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे का?

 • फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला म्हणाले की, लसीच्या दोन्ही डोसनंतर 6 ते 12 महिन्यांनतर तिसरा बूस्टर डोस आवश्यक असेल. तिस-या बुस्टर डोसच्या परवानगीसाठी फायझर पुढील काही आठवड्यांत अमेरिका आणि युरोपियन युनियनलाकडे अर्ज देऊ शकते.
 • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँंथनी फॉसी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीच्या बूस्टर डोसवर याक्षणी काहीही सांगणे कठीण आहे. अभ्यासाच्या निकालानंतर अमेरिकन लोकांना तिसरा बूस्टर डोस दिला जाऊ शकतो.
 • सध्या बर्‍याच देशांमध्ये यावर विचार केला जात आहे, परंतु इस्त्रायलने फायझर लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची तयारी केली आहे. कमकुवत प्रतिकारशक्ती असणार्‍या तरुणांना हा बुस्टर डोस दिला जाईल. इस्रायलचे म्हणणे आहे की, सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी निम्म्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
 • सध्या यावर वेगवेगळे अभ्यास चालू आहेत. बर्‍याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, नवीन व्हेरिएंटविरूद्ध लसीचा प्रभाव कमी आहे. लस कमी अँटीबॉडी तयार करत आहे आणि अँटीबॉडीजची​​​​​​​ संख्या वाढविण्यासाठी बूस्टर डोस हा पर्याय असू शकतो.
बातम्या आणखी आहेत...