आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Corona Crisisi | 21 Children Arrive In Shelter Home During Lock Down Including 4 Newborns, Their Parents Leaving Them On The Road.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आँखो देखा हाल:पोटच्या मुलांना सोडून देण्याची आई-वडिलांवर वेळ; लॉकडाऊनच्या 70 दिवसांत अनाथाश्रमात आली २१ मुले

ओडिशातील सुंदरगडहून शशिभूषण10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील आले नाहीत, आजीने मुलांना अनाथालयात दिले

कोरोना संकटाने मानवाच्या हतबलतेचे भयावह चेहरे समोर येत आहेत. एखादी आई आपल्या मुलाला अनाथाश्रमात किंवा रस्त्यावर सोडून जाण्यातील ितच्या वेदना आणि हतबलतेची कल्पनाही आपण करू शकत नाही. लॉकडाऊनमध्ये ओडिशातील सुंदरगड येथे अॅडॉप्शन केंद्रात मुले सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. समरुती, रेखा, निशांत, आदिल, कुसुम, समीर, वर्षा, कुणाल, कुम, बिरजिनिया, निखिल ही अशीच अनाथ मुले आहेत. ही मुले लॉकडाऊनच्या काळात बिसराच्या ‘दिशा शेल्टर होम’मध्ये आली आहेत. सध्या येथे ३९ मुले आहेत. त्यापैकी सात तर काही तासांच्या अंतराने येथे आली आहेत. दिशा चाइल्डलाइनचे सचिव अबुल कलाम आझाद सांगतात की, अनाथाश्रमात महिन्यातून एखादे मूल येत असे. मात्र, लॉकडाऊनमध्ये २१ मुले आली आहेत. यापैकी ११ मुले पोलिसांना रस्त्यावर आढळली. चार नवजातांना कोणीतरी सोडून गेले. यापैकी समरुती ४५ दिवसांची आणि रेखा ३४ दिवसांची आहे. ब्राह्मणी तरंग गावच्या निशांतला २२ दिवसांपूर्वी रस्त्यावर टाकून दिले होते. अशी कथा आदिलची आहे. तो जनता कर्फ्यूच्या (२२ मार्च) नंतरच्या दिवशी येथे आला. या मुलांना ही नावे शेल्टरहोमने दिली आहेत. या मुलांचे आई-वडील कोणालाच माहिती नाही. आझाद सांगतात की, काही दिवस मुले आमच्याकडे राहतील. नंतर त्यांची व्यवस्था होस्टेलवर होईल. शेल्टर होममध्ये कुसुम, समीर, वर्षा, कुणाल आणि कुम हे पाच भाऊ-बहीण याच काळात आलेत. यापैकी सर्वात मोठी कुसुम १४ वर्षांची आहे. सुंदरगड जिल्ह्यातील राजगंगापूरचे भगत टोला-भाटीपाडाजवळ त्यांचे आई-वडील त्यांना झोपलेल्या अवस्थेत सोडून गेले. कुसुमने सांगितले की, भुकेमुळे काम शोधणे सुरू केले. छोटे भाऊ-बहिणी आहेत. मग काय करणार? राजगंगापूरच्या एका घरी धुणीभांडी करण्याचे काम करू लागले. त्यातील पैशातून भूक भागवली. कोरोनामुळे हे काम सुटले. भुकेशी नवी लढाई सुरू झाली. काही जणांनी चाइल्डलाइनला आमची माहिती दिली. त्यानंतर आम्हाला येथे आणण्यात आले. येथे आम्ही व्यवस्थित आहोत.

वडील आले नाहीत, आजीने मुलांना अनाथालयात दिले

बिरजिनिया (५)व निखिलचे (३)वडील कमावण्यासाठी सुरतला गेले ते परतलेच नाहीत. वर्षापूर्वी आईचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये वडील परतण्याची आशा होती, मात्र तसे झाले नाही. मुले आजीकडे राहायची. या महामारीत आपले काही बरेवाईट झाले तर? अशी भीती सत्तर वर्षांच्या आजीला वाटू लागली. आजीने दोघांचा सांभाळ चाइल्डलाइनकडे सोपवला. चाइल्डलाइनमध्ये मुलांना देणाऱ्या लोकांना प्रश्न विचारले जात नाहीत.

येथे २७% मुले तस्करीचे शिकार, विक्रीपर्यंतची प्रकरणे

ओडिशा मानव तस्करीविरोधी पथदर्शी प्रकल्पाचा अहवाल सांगतो की, येथे १०० पैकी २७ मुले मानवी तस्करीची शिकार आहेत. मुली केरळातील कापड उद्योग, बागांत काम करण्यासाठी नेल्या जातात. सुरतला १० ते १२ मजुरांच्या टोळीसाठी एक मुलगी स्वयंपाकासाठी नेण्यात येते. हरियाणातील लोक लग्नासाठी मुली नेतात.

बातम्या आणखी आहेत...