आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Corona Outbreak In Bangalore Group Infection Continues In Bangalore: No Beds, No Ambulances For 1 Crore People; Oxygen Supply Slowed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आँखों देखा हाल:बंगळुरूत समूह संसर्ग सुरू : 1.2 कोटी लोकांसाठी ना खाटा, ना रुग्णवाहिका; ऑक्सिजन पुरवठा मंदावला

बंगळुरूहून मनीषा भल्ला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूत भोजनासाठी मंदिराबाहेर कष्टकऱ्यांची रांग. आतापर्यंत ३.५ लाख लोकांनी राेजगार गमावले. - Divya Marathi
बंगळुरूत भोजनासाठी मंदिराबाहेर कष्टकऱ्यांची रांग. आतापर्यंत ३.५ लाख लोकांनी राेजगार गमावले.
  • बंगळुरूहून आलेल्या लोकांवर दंड लावण्यास सुरुवात, सामाजिक संस्था ऑक्सिजन सिलिंडरच्या खाटा लावणार

आयटी सिटी बंगळुरूत साधारण दाेन आठवड्यांपूर्वी सर्वकाही ठीक हाेते. काेराेना संसर्ग नसल्याने शहराचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे अभिमानाने सांगितले जात हाेते. परंतु, अचानक एका दिवसात हजारांहून जास्त बाधित आढळू लागले आणि सगळेच हादरले. रुग्णवाहिका, खाटा, आॅक्सिजन सिलिंंडर एवढेच नव्हे तर स्मशानभूमीही कमी पडू लागली. लाेक घाबरले. पंचायतींनी बंगळुरूहून गाव-खेड्यांत आल्यास दंड जाहीर केला. रुग्णालयात खाटा नसल्याने मृत्यू थांबलेले नाहीत. आराेग्यसेवेवरून अचानक सरकारी व्यवस्था काेलमडली. सरकारी संकेतस्थळ व सरकारी कागदपत्रांतून मात्र ही व्यवस्था दाखवली जाते. प्रत्यक्षात तसे काहीही नाही. कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व करणारे डाॅ.सी.एन. मंजूनाथ म्हणाले, बंगळुरूत कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले आहे. दोन-तीन आठवड्यांत परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. सर्वकाही आलबेल नाही. खाटा व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात सरकारला अडचणी येत आहेत. वास्तविक लवकरच ७०० नव्या रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. सध्या बंगळुरूच्या १.२ कोटी लोकसंख्येसाठी केवळ ३०० रुग्णवाहिका आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना सरकारने डॉक्टर व परिचारिकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याची देखील योजना आखली आहे. २७ जूनपूर्वीचे आकडे पाहता सर्वकाही ठीक होते, हे लक्षात येते. म्हणजे परिस्थिती नियंत्रणात होती. दररोज १०० ते १४० रुग्ण येत होते. परंतु, अचानक १ हजार ते १५०० रुग्ण येत होते. अखेर बंगळुरूत काय झाले? त्यावरील उत्तरात सार्वजनिक आरोग्यसेवेतील डॉक्टर डॉ. सेल्विया कारपागम म्हणाल्या, कोविडसंबंधीचे सरकारचे धोरण चुकीचे आहे. कोविड पॉझिटिव्हचा अहवाल आल्यानंतरच रुग्णवाहिका व खाटा मिळतील, असा सरकारचा नियम आहे. प्रकृती बिघडल्याच्या तीन दिवसांनंतर अहवाल येतो. तोपर्यंत विलंब होतो. वास्तविक कोणत्याही रुग्णालयात खाटा नाहीत. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे रूपांतर १० हजार खाटांच्या रुग्णालयात झाले आहे. परंतु, सिव्हिल सोसायटी त्याच्या बाजूने नाही. कारण लक्षण नसलेल्या रुग्णांना तेथे दाखल करण्यात आले आहे. डॉ. सेल्विया यांच्या मते, या खाटांसोबत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्थाच नाही. १०० रुग्णांमागे एक डॉक्टर व दोन परिचारिक देखभालीसाठी आहेत. त्याचा काहीही फायदा होत नाही. गंभीर रुग्णांसाठी खाटांची गरज असते. परंतु, त्यांच्यासाठी अशी व्यवस्थाच नाही. युरॉलॉजिस्ट डॉ. बेलगामी मोहंमद साद म्हणाले, लॉकडाऊननंतर लोक घरांतून बाहेर पडले. महाराष्ट्रातून येथे लोक आले. हे संसर्ग वाढवण्यामागील कारण ठरले. सांगण्यात येणाऱ्या आकड्यांच्या २०० पट जास्त बाधित आहेत. सरकारला तयारी करता यावी यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता. परंतु, तयारी काहीही झाली नाही. सरकारने काहीही दावा केला तरी बंगळुरूत प्रत्यक्षात केवळ ११०० खाटा आहेत. खासगी रुग्णालयांनी आतापर्यंत ११५ खाटा सरकारला उपलब्ध करून दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांत रुग्णांची भरती केली जात नाही. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण पालिकेला फोन करून रुग्णवाहिका पाठवण्यास सांगतो. परंतु, तीन-चार दिवसांपर्यंत काहीही प्रतिसाद मिळत नाही. योग्यवेळी उपचार झाला नाही तर रुग्ण मृत्युमुखी पडणारच, असा आरोप काँग्रेस नेते निजाम फौजदार यांनी केला.बंगळुरूमध्ये एक चांगली गोष्ट जाणवते. येथील लोक सजग दिसतात. ते इतरांना मदत करत आहेत. सरकारलाही जोरदार विरोध सुरू आहे. प्रसिद्ध व्हिक्टोरिया रुग्णालयासह सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी आहे. त्यात सर्व स्तरातील रुग्ण आहेत. शहरात स्थलांतरित मजूर परतू लागले आहेत. दोन किंवा तीन दिवसांनंतर श्रमिक रेल्वे येत आहेत. परिस्थितीचे अवलोकन केल्यास शहर लवकर पूर्ववत होईल, असे वाटत नाही.

ऑक्सिजन पुरवठा मंदावला, दररोज ५०-१०० फोन येताहेत

डॉ. सेलविया म्हणाल्या, चार दिवसांपासून तीन रुग्ण येत होते. त्यांना रुग्णालयात खाटा हव्या होत्या. तिघांनाही प्राण गमवावे लागले. परंतु त्यांना अखेरपर्यंत खाटा मिळाल्या नाहीत. बंगळुरूच्या जयनगरमधील मर्सी मिशनकडून रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणारे तौसीफ खान म्हणाले, माझ्या परिचितांपैकी असलेले आबिद यांनी वडिलांच्या उपचारासाठी २८ रुग्णालयांचे खेटे मारले. विनवण्या केल्या. परंतु अखेर वडिलांनी रुग्णवाहिकेत प्राण सोडले. मर्सी मिशनच्या हॉटलाइनवर ५० ते १०० फोन येतात. त्यात अनेक लोक श्वासोच्छ्वास घेता येत नसल्याची तक्रार करत आहेत. आयसीयू व हायफ्लो ऑक्सिजनची गरज सध्याच्या तुलनेत दहापटीने जास्त आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser