आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Corona Pandemic Effect On Wrestlers : Wrestlers Now Work Part time For Food; It Is Difficult To Meet The Cost Of Food, The Crisis Of Wrestling Due To Lack Of Competition

कोरोनामुळे मल्ल ‘चितपट’:खुराकासाठी मल्लांचे आता रोजंदारीवर काम; खुराकाचा खर्च भागवणे अवघड, स्पर्धेअभावी कुस्तीच सुटण्याचे संकट

अनंत वैद्य | बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुस्त्या खेळून पैसे यायचे, त्यात खर्च भागायचा; मात्र आठ महिन्यांपासून तेही साधन बंद - लहू आंधळे, मल्ल

खाशाबा जाधव यांना आदर्श मानत दहा वर्षांपासून कुस्तीच्या फडात आहे. यात्रा, जत्रा ते प्रशासनाच्या वतीने आयोजित मानाच्या स्पर्धांत खेळत त्यात बक्षिसी मिळवायचो. त्यातून खुराक व इतर खर्च भागायचा. गेल्या सात महिन्यांपासून हे सारे बंद आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने मी आता कुटुंबासह शेती व पशुधन विक्रीचा व्यवसाय करतोय. या साऱ्यात कुस्ती मात्र हरवत चालली आहे,’ अशी खंत आंधळेवाडी (ता. केज) येथील मल्ल लहू आंधळेने व्यक्त केली.

कोरोनाचा माेठा फटका कुस्तीलाही बसला आहे. लहू आंधळे हा २४ वर्षीय युवक राज्य स्पर्धांमध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आलेला. आई-वडील ऊसतोडणी कामगार. बालपणापासून कुस्तीची आवड असलेल्या लहू यांनी पहिलवान बाळासाहेब आवारे यांच्या जय हनुमान तालमीत वयाच्या १४ व्या वर्षीपासून सराव सुरू केला. दहा वर्षांच्या मेहनतीनंतर आता कुठे तरी नाव होऊ लागले होते. मात्र, कोरोनारूपी संकटाने मैदानात हार न मानणाऱ्या लहूसारख्या असंख्य मल्लांना चितपट केले. सात महिन्यांपासून लहू हा पालकांसह शेती व पशुधन विक्रीचा व्यवसाय पाहतोय. आष्टी तालुक्यातील मल्ल राहुल पोकळे याच्यावर ही ओढवली.

दहा ते बारा हजार खर्च

काजू, बदाम, तूप, फळे व इतर साहित्य असा रोजचा चारशे रुपयांचा खुराक मला लागतो. कोरोनाच्या काळात सर्वच आर्थिक मार्ग बंद झाले. कुस्त्या खेळून पैसे यायचे. त्यात खर्च भागायचा. मात्र आठ महिन्यांपासून तेही साधन बंद आहे. आता शेती व जोडीला पशुधन विक्रीचा व्यवसाय करतो. बक्षीस, किताब मिळवण्याचे स्वप्न खूप आहे, मात्र राजाश्रयाअभावी सारे काही धूसर बनलेय.’ - लहू आंधळे, मल्ल, आंधळेवाडी.

राष्ट्रीय मल्ल बांधावर!

पाचंग्री येथील अमोल बाजीराव मुंढे हा ८६ किलो वजनी गटात गतवर्षी राज्यस्तरावर कांस्यपदक मिळवणारा मल्ल. ९२ किलो वजनी गटातही त्याने कांस्यपदक प्राप्त केले. शिवाय राष्ट्रीय स्तरावरही राज्याचे प्रतिनिधित्व त्याने केलेले आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या संकटात मे महिन्यापासून अमोल हा आर्थिक अडचणींमुळे गावाकडे आहे. यात्रा, उत्सवातून मिळालेल्या मानधनावर दिवस काढले.

बातम्या आणखी आहेत...