आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:जगातील 300 केंद्रांत कोरोना लस बनतेय, 40 केंद्रांत मानवी चाचणी; भारत या वर्षअखेरीस लस निर्मितीत यश मिळवू शकतो

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाचणी : ब्रिटन, चीन, अमेरिका, बेल्जियम तिसऱ्या टप्प्यात, ऑक्सफर्डकडेही लक्ष

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी तयार होत असलेले जग लसीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ३०० हून जास्त फर्म तसेच संस्था लस निर्मितीच्या कामात व्यग्र आहेत. त्यापैकी ४० हून जास्त संस्थांनी मानवी चाचणी सुरू केली आहे. ९ संस्था तिसऱ्या टप्प्यात दाखल झाल्या. त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत याच वर्षी लस उपलब्ध होण्याची आशा वाटते.

संसर्ग : विषाणू शरीरासाठी बाह्य आक्रमण, शरीराला कमकुवत करते
विषाणू सामान्यपणे आपल्या शरीराचे नाक, डोळे व तोंडाच्या माध्यमातून प्रवेश करतो. शरीराला विषाणूची एक बाह्य तत्त्व म्हणून आेळख असते. त्यामुळेच ते विषाणूशी दोन हात करते. परंतु अँटिबॉडीजविना शरीर कमकुवत पडू लागते.

लस : इम्युन सिस्टिमला अँटिबॉडी तयार करण्यास मदत मिळते
शरीराला विषाणू्च्या विरोधात सुरक्षात्मक प्रतिबंधात्मक प्रतिक्रिया देण्यास तयार करण्याचे कार्य लस करते. सामान्यपणे सर्व लसी एकसारख्या पद्धतीने काम करतात. लसीद्वारे शरीरात विशिष्ट प्रथिने पोहोचवली जातात. हा कोरोनाचाच एक सूक्ष्म भाग असतो. त्यास स्पाइक म्हटले जाते. तो अल्प नुकसान करतो. यातून धोकादायक लक्षणे समोर येत नाहीत. त्याद्वारे शरीराची इम्युन सिस्टिम अँटिबॉडी तयार करू शकते. त्यानंतर लसीविरुद्ध लढणाऱ्या पेशी संसर्ग रोखतात.

भारत : या वर्षी लस निश्चित येईल : फर्म
भारतातही कोरोना लसीवर काम सुरू आहे. फार्मा कंपनी डॉक्टर रेड्डीज लॅब्जच्या म्हणण्यानुसार भारत या वर्षअखेरीस लसनिर्मितीत यश मिळवू शकतो. कंपनीने रशियाच्या स्पुटनिकसोबत १० कोटी डोस खरेदीचाही करार केला आहे.

रशिया : लसीचा पहिला दावा, पण प्रश्नचिन्ह
गेल्या महिन्यात रशियाने स्पुटनिक व्ही नावाने कोरोनावरील पहिली लस शोधल्याचा दावा केला होता. परंतु ही लस तिसऱ्या टप्प्यातून गेली नसल्याची टीका होते. त्यामुळे लसीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतो.

चाचणी : ब्रिटन, चीन, अमेरिका, बेल्जियम तिसऱ्या टप्प्यात, ऑक्सफर्डकडेही लक्ष
ब्रिटनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका इन्स्टिट्यूट, चीनचे कॅनसायनो-बीजिंग इन्स्टिट्यूट, सायनोवॅक, सायनोफार्म-वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स, बेल्जियमचे जेनसेन फार्मास्युटिकल्स व अमेरिकेचे मॉडना, बायेएनटेक-फायझरसह अनेक संस्थांमध्ये कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रस्तावित लस आतापर्यंतची सर्वाधिक अत्याधुनिक लस आहे. त्याचे अॅस्ट्राझेनेका मोठ्या प्रमाणात उत्पादन करेल.

नियम: सीडीएससीआेच्या मंजुरीनंतर दोन वेळा पशूंवर, नंतर मानवी चाचणी अनिवार्य
आैषधी नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीआे) देशात कोरोनासह इतर कोणत्याही लसीच्या चाचणी व विपणनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. संस्थेच्या मंजुरीनंतर लसीची दोन वेळा प्राण्यांवर चाचणी करावी लागते. आधी एक वेळ होत असे. लसीच्या वापरानंतर तिच्या परिणामांवरही निगराणी ठेवावी लागते. प्रमुख नियम असे-

- लसीचे स्ट्रेन सुरक्षित आहे का हे पाहिले जाते. - विट्रो स्ट्रेनद्वारे लसीमधील सामग्रीची खातरजमा होते. - उंदीर, ससा तसेच इतर लहान जीवांवर प्री-क्लिनिकल चाचणीद्वारे पहिला टप्पा पूर्ण होतो. - लहान प्राण्यांवर चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याची मोठ्या प्राण्यांवर चाचणी होते. - लस सुरक्षित आहे का, हे पाहण्यासाठी मानवी चाचणी. - मानवी चाचणीत सुमारे १०० लोकांवर परीक्षण आवश्यक. - मानवी चाचणीनंतर इम्युन सुरक्षा तपासणी जाते. यात १ हजारावर लोकांवर प्रयोग. - मानवी चाचणीत तीन टप्प्यांत यशस्वी राहिल्यास मंजुरी. - सीडीएससीआेच्या मंजुरीनंतर लसीचे मार्केटिंग, परिणामांवर निगराणी ठेवली जाते.

किंमत : भारतासारख्या विकसनशील देशांत एक डोस २२० रुपयांत, इतर देशांत महाग
- काही दिवसांपूर्वी मेक्सिकोमधील एका कंपनीचे प्रमुख म्हणाले, दक्षिण अमेरिकेत लसीची किंमत प्रतिडोस २९६ रुपयांहून जास्त राहू शकते.
- भारतात लस निर्मिती करणाऱ्या सीरम संस्थेच्या म्हणण्यानुसार विकसनशील देशात किंमत २२० रुपये प्रतिडोस असेल.
- ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत काम करणाऱ्या अॅस्ट्राझेनेका कंपनीनुसार लस कमी किमतीत उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून अल्प नफा मिळवण्याचा आमचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

लस कशी काम करते समजून घेऊया
1. लस दिली जाते
2. लस शरीरात टी पेशी तयार करते
3. पुढे यातून बी सेल सक्रिय होतात.
4. बी सेलद्वारे प्लाझ्मा बी सेल तयार करतात.
5. प्लाझ्मा बी सेल अँटिबॉडीज बनवतात
6. बी सेल मेमरी सेल, किलर टी सेल बनवून संसर्गाशी लढतात.

बातम्या आणखी आहेत...