आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषसजीवही नाही आणि निर्जीवही नाही:कोरोना विषाणू अमर आहेत का? व्हायरसचे नेमके वय किती असते?

नीलेश भगवानराव जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायरस कोणत्याही जीवाणू किंवा पेशींच्या आधीपासूनच होते अस्तित्त्वात.

​​​​​​कोरोना काळ आपण सर्वांनीच अनुभवला आहे. सध्या हीच स्थिती चीनमध्ये पाहायला मिळतेय. चीनमध्ये कोरोनाची लाट आली आहे. येत्या काही महिन्यात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक रुग्ण संख्येचा आकडा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देखील बैठक घेत, सर्व राज्यांना सतर्क राण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनाचा हा विषाणू पुन्हा त्याचे रुप बदलून समोर येत आहे. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला की, या व्हायरसचे आयुष्य असते का? ते कधी मरतात का? ते कसे जन्माला येतात? त्यांचा उगम कोठे होतो? बॅक्टेरिया आधी आले की व्हायरस... चला या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करुयात...

मानवाच्या आधी पृथ्वीवर आले विषाणू

पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर सुमारे 350 कोटी वर्षांपूर्वीची ही घटना आहे. वास्तविक कोणताही विषाणू हा जिवंत किंवा मृत नसतो. तुम्ही म्हणू शकता की ते अमर आहेत... त्यांची अनुवांशिकता त्यांच्याच डीएनएमध्ये आहे. हे विषाणू कोणत्याही सजीवांवर हल्ला करू शकतात. आणि जिवंत राहू शकतात. लगदी लहानातील लहान जीवाणूपासून ते वनस्पती, प्राणी, मानव कोणावरही हे विषाणू हल्ला करतात.

कोरोना व्हायरसबाबत सांगायचे झाल्यास, त्याने मानवावर केलेल्या हल्ल्यानंतर स्वत:मध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला ही जागतिक महामारी म्हणून घोषीत करावी लागली. प्रत्येक देशाने आप-आपल्या परिने त्यावर मात केली असली तरी त्याचा धोका अद्याप संपलेला नाही.

पृथ्वीच्या उत्क्रांतीपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू दिसून येतात. त्यातील कित्येक असे विषाणू आहेत, ज्यांच्याबद्दल अद्याप मानवाला माहितीही मिळालेली नाही. त्यामागचे कारणही तसेच आहे. हे विषाणू त्यांचे स्वरुप कायम बदलू शकतात. आपल्या शरीराच्या कोणत्याही एका भागापासून तो नवीन विषाणू तयार करू शकतो. सध्या असेच काही कोरोना बद्दल म्हणता येईल. कोरानाचा नवीन व्हेरिंयंट आला, अशा बातम्या तुम्ही या आधी वाचल्या असतीलच.

सेलमध्ये कसा पसरतो व्हायरस?

कोणत्याही विषाणूभोवती प्रोटीनचा थर असतो. ज्याला सेलमधून लिपिड्स चोरावे लागतात. या यजमान पेशीच्या शरीरातून लिपिड घेऊन, विषाणू त्या लिपिडवर वर एक नवीन क्लोन बनवतो. हा क्लोन एकतर समान असतो किंवा नवीन शक्तीसह नवीन प्रकारचा असतो.

व्हायरसचा जन्म

व्हायरस किंवा विषाणूच्या जन्माच्या तिन थेअरी मांडल्या जातात... त्या खालील प्रमाणे आहेत.

Virus First Hypothesis : पृथ्वीच्या निर्मितीपासूनच वातावरण अनुकूल होते अशा प्रकारचा एक सिद्धांत मांडला जात आहे. त्यानुसार या वातावरणात सर्वात आधी विषाणू तयार झाले. या नुसार पृथ्वीवर आधीपासूनच विषाणू अस्तीत्त्वात होते.

The Regression Hypothesis : काही शास्त्रज्ञांच्या मते, पूर्वी तयार झालेल्या काही पेशींना स्वतःला पुन्हा जुन्या अस्तित्वात घेऊन जायचे होते, म्हणजेच त्यांचा ऱ्हास हवा होता. जेणेकरून त्या स्वतःची प्रतिकृती तयार करण्याची क्षमता प्राप्त करू शकतील. हे स्थान प्राप्त करण्यासाठी, त्यांना परजीवीसारखे जीवन जगावे लागले ... जे शेवटी व्हायरसच्या रूपात त्यांची अस्थित्त्व तयार झाले.

The Escaped Genes Hypothesis : आणखी एका दाव्यानुसार असे म्हटले जाते की, विषाणू जनुकांपासून विकसित झाले आहेत. जे जीन्स कोशिकायुक्त जीवांपासून विभक्त झाले आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवर विभक्त झालेली जीन्स एकत्र होऊन वेगवेगळे विषाणू तयार होतात. या जनुकांनी विषाणूंना स्वार्थी होण्याचा उद्देश दिला. म्हणजे स्वतःची प्रतिकृती. तुमचा नवीन प्रकार तयार करण्यासाठीचे कार्य.

शास्त्रज्ञांच्या मते या तीन प्रकारे विषाणू तयार झाले आहेत, त्यातील सत्यता तर शास्त्रज्ञच पडताळून पाहू शकतात.

विषाणू अमर आहेत

विषाणू हे जिवंतही नाहीत आणि मेलेलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्या वयाचा प्रश्नच उद्भवत नाही. ते फक्त त्यांचा स्वतःचा क्लोन किंवा प्रकार बनवत राहतात. नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, व्हायरस हे बॅक्टेरिया, ओरिएंटल किंवा आर्किया पेक्षा जुने असतात. कारण प्रथम प्रतिकृती तयार करणारे रेणू आरएनए आणि डीएनए आहेत. बहुतेक व्हायरस आरएनएचे बनलेले असतात. याचा अर्थ व्हायरस कोणत्याही जीवाणू किंवा पेशींच्या आधीपासून अस्थित्त्वात होते.

व्हायरस जिवंत आहेत का?

नाही. वास्तविक सजीवाची व्याख्या वेगळी आहे. जीवशास्त्रानुसार जे पुनरुत्त्पादन करू शकतात, शरीराचा समतोल राखू शकता, कोणत्याही प्रकारच्या कृतीला प्रतिक्रिया देऊ शकतात, चयापचय कार्य करू शकतात, त्यांना सजीव म्हटले जाते. मात्र, या व्याख्येत विषाणू बसत नाही. विषाणू फक्त पुनरुत्त्पादन करू शकतात. इतर सजीवांपैकी कोणतेही दुसरे लक्षण त्यांच्यात दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना जिवंत असल्याचे म्हणता येत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर चीनमधील कोरोना चिंतेचा विषय बनला आहे. सध्या चीनमधील कोरोनाची स्थिती देखील पाहूयात...

अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सामना करतोय चीन

चीनच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार फेंग जिजियान म्हणाले की, देशातील 60 टक्के लोकसंख्या किंवा 84 कोटीहून अधिक लोकांना संसर्ग होऊ शकतो. इतर देशांप्रमाणे चीन आता अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सामना करत आहे. तो पहिल्या विषाणूपेक्षा सौम्य आहे. चीनकडे परिस्थिती हाताळण्यासाठी तीन वर्षे होती. पण, लसीकरण करण्याऐवजी आणि लोकांना कोविडसोबत जगण्यासाठी तयार करण्याऐवजी लॉकडाऊनवर अधिक भर दिला आहे. हाँगकाँग विद्यापीठातील विषाणू तज्ज्ञ जिन डोंग यान म्हणतात की, संसर्गाची सुनामी येणारच आहे. शून्य-कोविड आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही. देशातील संसर्गाची सद्यःस्थिती स्पष्ट नाही.

2023 च्या एप्रिलमध्ये चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण, लाखो मृत्यूची भीती

नुकताच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. IHMI ने अंदाज व्यक्त केला आहे की 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. चीनमधील कोविड निर्बंध उठवल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज लावण्यात आले आहेत.

अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांची संख्या कमाल पातळीवर असेल. तोपर्यंत मृतांचा आकडा 3 लाख 22 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आयएचएमआयचे संचालक क्रिस्टोफर मर्रे यांच्या मते, एप्रिलपर्यंत चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असेल.

आणखी अशाच बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकरव क्लिक करा...

कोरोना अलर्ट- 90 दिवसांत 60% चिनी संक्रमित:बीजिंगमध्ये 24 तास अंत्यसंस्कार, 2000 पर्यंत वेटिंग; रुग्णालयांत बेड नाही

चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तेथे संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. झिरो-कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. औषधे नाहीत, जीथे आहेत तिथे लांबच लांब रांगा लावाव्या लागतात.

बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. त्यांनी कोरोनाबाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 90 महिन्यांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. नुकताच अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHMI) नेही असाच अंदाज वर्तवला होता. पूर्ण बातमी वाचा...

चीनमध्ये पुन्हा कोरोना उद्रेक:तरीही आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरूच, नूतन वर्षाच्या तोंडावर देशांतर्गत उड्डाणांत 158 टक्के वाढ

चीनमध्ये कोरोना महामारीमुळे सर्वात वाईट परिस्थिती दिसते. त्यामुळे संपूर्ण जगासाठी पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. रुग्णालयांत मृतदेहांसाठी जागा शिल्लक नाही. चीनसाठी तीन महिने आव्हानात्मक असतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात चीनच्या ६० टक्क्यांहून जास्त नागरिकांना कोरोनाची बाधा झालेली असेल. असे असले तरी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ सुरूच ठेवली नाही तर त्यांची संख्याही वाढवली आहे. झीरो कोविड धोरणात चीनमध्ये दररोज १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती. ती संख्या आता २ हजारांवर गेली. त्यामुळे इतर देशांच्या चिंतेत भर पडली आहे. चीनमध्ये सध्या ७,२९० देशांतर्गत उड्डाणे सुरू आहेत. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या १५८ टक्के जास्त आहे. तीन वर्षांनंतर चीन लॉकडाऊनमधून बाहेर पडला आहे. आता ७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान २ हजार आंतरराष्ट्रीय व ११, ६६७ देशांतर्गत उड्डाणांची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात ३७ लाख लोकांनी हवाई प्रवास केला. पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...