Corona XE Variant Explained; What Is XE Corona Variant, XE Variant Symptoms, XE Variant In India
दिव्य मराठी एक्सप्लेनर:भारतात नवा कोरोना व्हेरिएंट आढळल्याच्या चर्चेने खळबळ, जाणून घ्या किती खतरनाक आहे XE व्हेरिएंट?
लेखक: अभिषेक पाण्डेयएका वर्षापूर्वी
कॉपी लिंक
देशात कोरोना विषाणूच्या नव्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याच्या बातमीने या घातक विषाणूची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तथापि, या बातमीच्या काही तासांनीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, या महिलेत आढळलेला कोरोना व्हेरिएंट XE नाहीये. तरीही हे तपासण्यासाठी आणखी एक चाचणी होईल, ज्याचा अहवाल एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत जाणून घेऊया की, नेमका काय आहे कोरोनाचा XE व्हेरिएंट? किती खतरनाक आहे? जगभरात कुठे आढळले याचे रुग्ण? भारताला याचा कितपत धोका?
देशात आढळलेल्या पहिल्या XE व्हेरिएंट रुग्णाबद्दल जाणून घ्या
मुंबई महापालिका म्हणजेच BMCच्या मते, XE व्हेरिएंटने संक्रमित संशयित रुग्ण 50 वर्षीय महिला आहे, जी कॉश्च्युम डिझायनर आहे. ही महिला 10 फेब्रुवारीला साऊथ आफ्रिकेहून देशात परतली होती. मुंबई पोहोचवल्यावर झालेल्या तपासणीत ती कोरोना निगेटिव्ह आढळली होती.
02 मार्च रोजी झालेल्या रूटीन टेस्टिंगमध्ये ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. याानंतर तिला मुंबईच्या वांद्रे येथे क्वारंटाइन करण्यात आले होते. तथापि, दुसऱ्या दिवशी त्यांचा नमुना निगेटिव्ह आला होता.
BMCच्या मते, सीरो सर्व्हेसाठी पाठवलेल्या मुंबईच्या कोरोना रुग्णांच्या 230 नमुन्यांपैकी 228 नमुन्यांत ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. तर, एका नमुन्यात XE व्हेरिएंट आढळला, तर आणखी एकात कप्पा व्हेरिएंट आढळला आहे.
BMC च्या या घोषणेनंतर जेव्हा मुंबईतील महिला रुग्णाला भारतात XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण म्हटले जाऊ लागले, तेव्हा त्याच्या काही तासांनीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, प्राथमिक तपासणीत आढळले आहे की, हा XE व्हेरिएंटचा रुग्ण नाही.
भारतात जीनोम सीक्वेंसिंगची निगरानी करणारी सरकारी संस्था INSACOG या महिलेच्या नमुन्याची पुन्हा सीक्वेंसिंग करत आहे.
काय आहे कोरोनाचा XE व्हेरिएंट?
नोव्हेंबर 2021 मध्ये साऊथ आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न ओमायक्रॉन या वर्षी जगभरात आढळलेल्या कोरोनाच्या 90% पेक्षा जास्त रुग्णांसाठी जबाबदार आहे.
ओमायक्रॉनचे तीन सब-व्हेरिएंट आहेत- BA.1, BA.2 आणि BA.3, परंतु पहिले दोन्ही सब-व्हेरिएंटच जास्त घातक आहे, तर BA.3 तेवढा संसर्गजन्य नाही.
ओमायक्रॉन संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्याचा सब-व्हेरिएंट BA.1 हाच डॉमिनंट होता. या वर्षी याचा दुसरा सब-व्हेरिएंट BA.2 ने वेगाने याची जागा घेतली. भारतात तिसऱ्या लाटेदरम्यान BA.2 हाच डॉमिनंट होता.
BA.2 ला BA.1 च्या तुलनेत जास्त संसर्गजन्य मानले जात आहे, तथापि, हा तेवढा घातक नाही. WHOच्या मते, मागच्या काही महिन्यांत जगभरात समोर आलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 94% साठी ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 हाच जबाबदार होता.
BA.2 ला स्टेल्थ ओमायक्रॉनही म्हटले जात आहे, कारण आपल्या S-प्रोटीनमध्ये युनिक म्यूटेशनमुळे याला कोरोना टेस्टमध्ये पकडणे कठीण आहे.
XE व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 च्या कॉम्बिनेशनमधून बनला आहे, म्हणजेच हा 'रिकॉम्बिनेंट' वा हायब्रीड व्हेरिएंट आहे.
रिकॉम्बिनेंट व्हायरस हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या दोन व्हेरिएंटच्या कॉम्बिनेशनने तयार होतो. असे व्हायरसमध्ये सातत्याने होत असलेल्या म्यूटेशन म्हणजेच परिवर्तनामुळे होत असते.
कोरोनाच्या बाबतीत रिकॉम्बिनंट व्हेरिएंट हा आधीपासून असलेल्या दोन व्हेरिएंटच्या जेनेटिक मटेरियलच्या संयोगाने बनतो.
म्हणजेच एकच व्यक्ती एकाच वेळी दोन कोरोना व्हेरिएंटने संक्रमित झाल्याने त्याच्या शरीरात या दोन्ही व्हेरिएंटचे जेनेटिक मटेरियल मिळते, ज्यापासून बनणाऱ्या व्हेरिएंटला ‘रिकॉम्बिनंट’ म्हणतात.
रिकॉम्बिनंट व्हेरिएंट नवा नाही, यापूर्वीही डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रिकॉम्बिनंटचे रुग्ण आढळून आलेले आहेत.
WHO ने म्हटले की, XE ला सध्या नव्या व्हेरिएंटऐवजी ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंट कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे.
किती खतरनाक आहे XE व्हेरिएंट?
XE व्हेरिएंटची पहिली केस 19 जानेवारीला ब्रिटेनमध्ये आढळली होती. तेव्हापासून ती जगभरात 650 हून जास्त केसेस आढळल्या आहेत, ज्यात एकट्या ब्रिटनमध्येच याच्या 637 केसेस आढळलेल्या आहेत.
ब्रिटनशिवाय XE व्हेरिएंटच्या केसेस थायलंड, फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये आढळलेल्या आहेत.
WHO च्या मते, XE व्हेरिएंट ओमायक्रॉनचा सर्वात संसर्गजन्य प्रकार मानला जातोय. हा ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 पेक्षाही 10% जास्त संसर्गजन्य आहे.
XE व्हेरिएंटबद्दलची माहिती सध्या प्राथमिक पातळीवरच आहे. तथापि, जानेवारीत पहिली केस आढळल्यानंतर याच्या एक हजारपेक्षाही कमी केसेस आढळल्या आहेत.
XE व्हेरिएंटचे गांभीर्य आणि यावर लसीच्या परिणामाचाही सध्या आणखी अभ्यास करणे बाकी आहे. WHO आणि UK हेल्थ एजन्सी सातत्याने या व्हेरिएंटच्या बाबतीत आणखी माहिती गोळा करत आहेत.
कोरोनाच्या XE व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत?
XE व्हेरिएंटचे आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण समोर आलेली नाही. या व्हेरिएंटची लक्षणे बहुतांश ओमायक्रॉन सारखीच आहेत.
XE व्हेरिएंटने संसर्गाच्या सुरुवातीला थकवा आणि चक्कर येण्यासारखी लक्षणे असतात. याच्या इतर लक्षणांत सर्दी, डोकेदुखी, नाक वाहणे, गळ्यात खवखव आणि ताप यांचा समावेश आहे.
यात वास आणि चव जाण्याची समस्या होत नाही, पण यात हगवण, मळमळ, उलटी आणि पोटदुखीसारखी लक्षणे दिसू शकतात.
भारताला XE व्हेरिएंटचा किती धोका?
भारतात XE व्हेरिएंटसह कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट पसरण्याची शक्यता फेटाळता येऊ शकत नाही.
XE ओमायक्रॉनच्याच दोन सब-व्हेरिएंटच्या म्यूटेशनने बनलेले आहे, यामुळे हे शक्य आहे की, देशात XE व्हेरिएंटचे रुग्ण आधीपासूनच अस्तित्वात असतील, पण त्यांची ओळख पटणे बाकी असेल.
यासोबतच भारताने 27 मार्चपासून जगभरातील सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली आहे. यामुळे परदेशातूनही XE सह कोणत्याही व्हेरिएंटच्या येण्याचा धोका कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारताला XE व्हेरिएंटपासून जास्त धोका नाही, कारण हा ओमायक्रॉनशी संबंधित सब-व्हेरिएंट आहे, ज्याची लाट नुकतीच ज्या देशातून गेली आहे आणि ज्यामुळे देशातील जवळपास 50-60% लोक संक्रमित झाले होते.
अशा परिस्थितीत ओमायक्रॉनने तयार झालेली इम्यूनिटी एवढ्या लवकर संपण्याची शक्यता नाही, जेणेकरून XE व्हेरिएंट लोकांना संसर्गित करू शकेल.
भारतात ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट संपली आहे आणि दैनंदिन कोरोना रुग्ण 1 हजारांच्या आसपास राहिले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 12 हजारांहून कमी झाली आहे. देशात दैनंदिन आणि सक्रिय रुग्णसंख्या मागच्या दोन वर्षांपासूनच्या किमान पातळीवर पोहोचली आहे.
भारतात 07 एप्रिलला आधीच्या 24 तासांदरम्यान 1033 कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आणि सक्रिय रुग्ण 11639 होते.
XE शिवाय XD आणि XF रिकॉम्बिनेंट व्हेरिएंटही आढळले
ब्रिटनची हेल्थ एजन्सी UKHSA नुसार, आतापर्यंत कोरोनाचे तीन हायब्रीड व्हेरिएंट-XD, XF आणि XE आढळलेले आहेत.
XD स्ट्रेन डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंट BA.1 च्या जेनेटिक मटेरियलच्या संयोगाने बनले आहे. याची पहिली केस गतवर्षी डिसेंबरमध्ये आढळला होता.
XD स्ट्रेनची केस फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स आणि बेल्जियममधून आढळले आहेत. 22 मार्चपर्यंत याचे एकूण 49 रुग्ण आढळले होते.
XF स्ट्रेनही डेल्टा आणि ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट BA.1 चा हायब्रीड आहे. या स्ट्रेनचे रुग्ण केवळ ब्रिटनमध्येही आढळले आहेत आणि आतापर्यंत याचे 39 रुग्ण आढळले आहेत.
शास्त्रज्ञ विषाणूत होत असलेल्या सततच्या म्यूटेशनने वा दो व्हेरिएंटच्या संयोगाने बनणाऱ्या एखाद्या रिकॉम्बिनेंटवर नजर ठेवतात, जेणेकरून त्यापासून तयार होणाऱ्या धोक्याला सामोरे जाता येऊ शकेल.
XE व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्याचे उपाय:
मास्क घाला, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करा म्हणजे लोकांपासून कमीत कमी 1 मीटर अंतर राखा.
आपले हात नियमितपणे साबणाने धुवा, सॅनिटायझरचा वापर करा.
अशा जागांमध्ये राहण्यापासून वाचा, जेथे गर्दी असेल आणि जी हवेशीर नसेल वा जेथील व्हेंटिलेशन खराब असेल.
घराच्या आतही व्हेंटिलेशनची योग्य सोय ठेवा.
लस घ्या आणि लसीचे दोन्हीही डोस जरूर घ्या.
WHO प्रमुखांनी दिला होता नव्या व्हेरिएंटचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम यांनी जवळजवळ तीन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, ओमायक्रॉनला कोरोनाचा अखेरचा व्हेरिएंट समजणे धोकादायक ठरू शकते. UN हेल्थ एजन्सीच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डाच्या मीटिंगमध्ये ते असेही म्हणाले होते की, जर महामारीपासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या, तर 2022 पर्यंत ही संपू शकते. यासोबतच त्यांनी असाही सल्ला दिला होता की, भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती रोखता यावी, यासाठी सध्याच्या महामारीतून धडा घेणे आणि नवे उपाय शोधण्याची गरज आहे.