आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गतकाळाने शिकवले 12 धडे | या काळात आपण ओळखली कुटुंबाची खरी ताकद
१. निसर्ग सर्वशक्तिमान : निसर्गासमोर कुणाचे काही चालत नाही, हे आपण शिकलो. या संकटाने स्वच्छ हवा, पाण्याची गरज समजावली.
२. कुटुंब सर्वात मोठी ताकद : संकट कितीही मोठं असो, कुटुंब सोबत असेल प्रत्येक समस्येवर मार्ग निघणे शक्य आहे.
३. आरोग्य सर्वात मोठी संपत्ती : कोरोनाने शिकवले की, आरोग्य अत्यावश्यक आहे. निरोगी असणाराच आजाराशी लढू शकेल.
४. प्रबळ इच्छाशक्ती : लस येईपर्यंत महामारीशी लढण्यासाठी सरकार-समाजाची इच्छाशक्तीच उपयोगी पडली.
५. संयमातून उपाय : लॉकडाऊनमध्ये संयम हे महामारीविरुद्ध मोठे शस्त्र ठरले. पुढेही तेच उपयोगी पडेल. जिवंत राहिलात तर सर्व काही आहे.
६. शिस्तीतून मिळाला विजय : स्वच्छता असो की सात फुटांचे अंतर... अशा शिस्तबद्धतेनेच परिस्थिती आणखी बिघडली नाही.
७. भविष्य नव्हे, वर्तमानात जगणे : सहसा आपण उद्याच्या चिंतेत आजचे जगणे विसरतो. पण, आपण वर्तमानात जगायला शिकलो.
८. अडचणीतही आनंदाचा शोध घेणे : लॉकडाऊनमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींतही आनंद शोधला. आपला दृष्टिकोन बदलला.
९. आपण समाजाचा एक भाग आहोत : अडचणीत सामाजिक रचना महत्त्वाची भूमिका बजावतेे. एकजूट समाज संकटाला हरवतो.
१०. सर्वांचा सन्मान : डॉक्टर-पोलिसच नव्हे, सफाई कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यास शिकलो. सर्वच महत्त्वाचे,कोणतेही काम छोटे नाही.
११. बचत गरजेची : पैसा आनंद खरेदी करू शकत नाही, परंतु अडचणीच्या वेळी कामाला येतो. आपण बचतीचे महत्त्व जाणले.
१२. विज्ञानावर विश्वास : विषाणूशी खरी लढाई शास्त्रज्ञ लढले. प्रथमच इतक्या कमी कालावधीत लस तयार झाली.
भविष्यातील हे ९ प्रश्न | लस म्हणजे कोरोना निर्मूलन नाही, त्याचा प्रसार कमी होईल
Q. कोरोना निर्मूलन केव्हा होईल? मास्क नेहमी लावावा लागेल का?
लस म्हणजे कोरोनाचे निर्मूलन नव्हे, फक्त त्याचा प्रसार कमी होईल. नवे स्ट्रेन येतील आणि लस अपडेट होत राहील, असेही होऊ शकते. काही वर्षे तरी मास्क वापरावाच लागेल.
Q. शिक्षण, उपचार कधीपर्यंत तंत्रज्ञानाच्या साह्याने होतील?
काही काळासाठी ऑनलाइन माध्यम स्वीकारले गेले, परंतु ऑफलाइन मार्केट खूप समृद्ध आहे. ऑनलाइनचा ट्रेंड वाढत होता, पण भविष्यात ऑफलाइन मार्केट मजबूत स्थितीत येईल.
Q. आरोग्य सुविधा आणखी सुधारण्यासाठी काय करावे लागेल?
कोविडकाळात इतर आजारांऐवजी केवळ कोविडवरील उपचार झाले. आरोग्य सुविधा ६०% खासगी क्षेत्रावर अवलंबून आहेत. उणिवा उघड झाल्याने त्या सुधारण्यासाठी काम करावे लागेल.
Q. शाळा-काॅलेज बंद राहिले, पुढे ई-शिक्षण राहील की बदल होईल?
पुन्हा ऑफलाइन शिक्षण सुरू होत आहे. ऑनलाइन शिक्षण हा वर्गाचा पर्याय होऊ शकत नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आऊटडोअर अॅक्टिव्हिटीज अत्यंत आवश्यक आहेत.
Q. सार्वजनिक वाहतुकीत बदल होईल की खासगी वाहने वाढतील?
कोविडनंतर खासगी वाहनांची खरेदी वाढली आहे. परंतु, लांब पल्ल्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची उपयुक्तता कमी होणार नाही. विशेषतः हवाई कनेक्टिव्हिटी चांगली होईल.
Q. लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या, कमाईचे नवे मार्ग कसे मिळतील?
कोरोनाकाळात स्वयंरोजगाराची अनेक उदाहरणे दिसली. आता हा ट्रेंड वाढेल. अॅग्री-फूड प्रोसेिसंगची निर्यात, आरोग्य व शिक्षण क्षेत्र लोकांना व्यवसाय देण्याबरोबरच रोजगारही निर्माण करील.
Q. डिजिटलायझेशनमुळे सायबर धोका आणखी वाढेल का?
दक्षता गरजेची आहे. केवळ आपला डेटा लीक केल्याने वा विकल्याने नको असलेले काॅल व एसएमएसची संख्या वाढली आहे. अशी प्राेफायलिंग कोरोनाच्या आधीही होती.
Q. कोरोनाकाळात राहणीमान आणखी किती बदलेल?
हात धुण्याची सवय लागली तशाच आहाराच्या सवयीही बदलतील. सक्षम असणारे ऑरगॅनिक उत्पादने घेतील. संतुलित आहार आणि घरीच व्यायामाची सोय या गोष्टी सामान्य होतील.
Q. पार्क-चित्रपटगृहे बंद राहिली. मनोरंजन मोबाइलवर सीमित होईल?
लाइव्ह एंटरटेन्मेंटचा कल कमी होणार नाही. सूट मिळाल्यावर क्लब आणि चित्रपटगृहांत क्षमतेपेक्षा जास्त लोक जाताहेत. तथापि, ओटीटी आणि मोबाइलसारखे नवे मार्गही सुरू राहतील.
दिव्य मराठी एक्सपर्ट पॅनल
{एस. पी. शर्मा, चीफ इकॉनाॅमिस्ट, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स {डॉ. श्रीनिवास गोली, संशोधक, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न पर्थ, आॅस्ट्रेलिया {रितेश भाटिया, सायबर एक्स्पर्ट {हिमांशू ठक्कर, समाजशास्त्रज्ञ {जितेंद्र दुबे, रोड ट्रान्स्पोर्ट तज्ज्ञ {अशोक अग्रवाल, शिक्षणतज्ज्ञ/आरटीई कार्यकर्ते
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.