आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर:कोरोनातून बरे झाल्यानंतर होत आहे ब्लॅक फंगस, काहींचे डोळे काढावे लागले; नेमका काय आहे हा रोग?

भोपाळ(जयदेव सिंह)एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • योग्यवेळी उपचार मिळाल्यावर इंफेक्शन रोखता येते

49 वर्षीय मीना खंडेलवाल यांना 10 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान त्यांना स्टेरॉइड देण्यात आले. पण, यामुळे याचा त्यांच्यावर साइड इफेक्ट झाला. त्यांचा चेहरा सुजला आणि उपचारासाठी 20 एप्रिलला जयपुरमध्ये आणले. ही समस्या इतकी गंभीर झाली की, त्यांचा एक डोळा काढावा लागला.

46 वर्षीय ताराचंद 27 एप्रिलला संक्रमित झाले. स्टेरॉयड दिल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यात साइड इफेक्ट दिसले. उपचारादरम्यान त्यांचे दोन्ही डोळे काढावा लागले. 42 वर्षीय मुनाफ यांची कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आली, पण CT स्कॅनमध्ये इंफेक्शन दिसले. त्यांनाही स्टेरॉयड देण्यात आले. यानंतर पाच दिवसातच त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आणि त्यांनाी आपले दोन्ही डोळे गमावले. मीना, ताराचंद आणि मुनाफ या तिघांना डायबेटीजचा त्रास होता.

ही काही मोजकी लोकं आहेत, ज्यांनी कोरोनावर मात केली. पण, साइड इफेक्टमुळे इतर आजारांनी ग्रासले. कोरोना इतका भयावहः होत आहे की, लोकांचा जीव वाचवण्यासाठी अवयव काढावे लागत आहेत. अशी अनेक प्रकरणे महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरातमधून समोर आली आहेत. या आजाराची पहिली काही प्रकरणे डिसेंबरमध्ये समोर आली होती. पण, आता देशातील अनेक राज्यात याचे रुग्ण आढळत आहेत. यातील अनेकांचा आजारामुळे मृत्यू झाला, तर काही लोकांचे डोळे काढावे लागले. या नवीन आजाराचे नाव आहे 'ब्लॅक फंगस.' परंतु, निती आयोगाने म्हटले आहे की, देशात याची जास्त प्रकरणे नाहीत. हा आजार झालेल्या बहुतेक लोकांना डायबेटीजचा त्रास आहे.

हा नवीन आजार काय आह ? याची लक्षणे काय आहेत ? हा किती धोकादायक आहे ? या आजारात मृत्यू होण्याची शक्यता किती आहे ? यातून कसे वाचावे ? या सर्व प्रश्नांबाबत आम्ही भोपाळच्या जेके हॉस्पिटलमधील डॉक्टर पूनम चंदानी यांच्याशी बातचीत केली.

ब्लॅक फंगस डोळ्याला पॅरालाइज करू शकतो.
ब्लॅक फंगस डोळ्याला पॅरालाइज करू शकतो.

काय आहे ब्लॅक फंगस ?

 • हा एक फंगल डिजीज आहे, जो म्यूकॉरमाइटिसीस नावाच्या फंगाइलने होतो. हा त्यांना होतो, ज्यांना आधीपासून एखादा आजार आहे, किंवा ते शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारे औषध-गोळ्या घेत आहेत. हे फंगस शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते.

हा फंगाइल शरीरात कसा जातो ?

 • हा फंगस श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाऊ शकतो. जर शरीरावर एखादी जखम असेल, तर त्याद्वारेही हा शरीरात जाऊ शकतो. जर हा फंगस लवकर डिटेक्ट झाला नाही, तर आपली दृष्टी जाऊ शकते किंवा शरीराच्या ज्या भागावर हा झाला आहे, तो भाग काढावा लागू शकतो.

ब्लॅक फंगस कुठे आढळतो ?

 • हे खुप गंभीर पण क्वचित आढळणारे इंफेक्शन आहे. हे फंगस वातावरणात कुठेही असू शकते. विशेषतः जमिनीवर आणि सडणाऱ्या गोष्टींवर. जसे झाडाची पाने, सडलेले लाडकं आणि शेणखतात.

याची लक्षणे काय आहेत ?

 • चेहऱ्यावर इंफेक्शन झाल्यावर चेहरा सुजतो, डोके दुखी सुरू होते, नाक बंद होते, उलटी येते, ताप, छातीदुखी, सायनस कंजेशन आणि तोंडामध्ये काळ्या जखमा होतात.

हे इंफेक्शन कोणाला होते, याचा कोरोनाशी काय संबंध आहे ?

 • डॉक्टर पूनम सांगतात की, डायबेटीज, कँसर, ऑर्गन ट्रांसप्लांट झालेले, अनेक दिवसांपासून स्टेरॉयड वापरणारे, स्किन इंजरी झालेले आणि प्रिमॅच्योर बालालाही हा आजार होऊ शकतो.
 • कोरोना असलेल्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच, हाय डायबेटीज असलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती जास्त कमी झालेली असते, अशा लोकांमध्ये हा ब्लॅक फंगस जास्त पसरू शकतो. याशिवाय स्टेरॉयड दिलेल्या कोरोना रुग्णांनाही याची लागण होऊ शकते.

हा फंगस किती धोकादायक आहे ?

 • हा एकापासून दुसऱ्याला होणारा आजार नाही, पण हा आजार झालेल्या 53% रुग्णांचा मृत्यू होतो. यावरुनच याची गंभीरता समजून जाईल.
 • शरीरात इंफेक्शन कुठे झाले आहे, यावरुन मोटर्लिटी रेट वाढू किंवा कमी होऊ शकतो. जसे- सायनस इंफेक्शनमध्ये मोटर्लिटी रेट 46%, तर फुफ्फुसात झाल्यावर मोटर्लिटी रेट 76% आणि डिसमेंटेड इंफेक्शनमध्ये मोटर्लिटी रेट 96% पर्यंत होऊ शकतो.
 • अमेरिकन एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅड प्रिवेंशन (CDC) चा अहवाल सांगतो की, जगातील एकूण इंफेक्शनमध्ये म्यूकॉरमाइटिसीस इंफेक्शनची प्रकरणे फक्त 2% आहेत.
 • डॉक्टरांचे म्हणणे आहे की, शरीराच्या ज्या भागावर हा फंगस येईल,त्या भागाला डॅमेज करेल. मेंदूमध्ये झाल्यावर ब्रेन ट्यूमरसह अनेक आजार होऊ शकतात. मेंदुमध्ये इंफेक्शन झाल्यावर मोटर्लिटी रेट 80 टक्केपर्यंत जातो.
 • कोरोना काळात अनेकजण अशक्त झाले आहेत, अशात हे इंफेक्शन वाढू शकते. पण, योग्यवेळी उपचार केल्यावर याला रोखता येते.

या इंफेक्शनपासून कसे वाचता येईल ?

 • डॉक्टर पूनम सांगतात की, कंस्ट्रक्शन साइटपासून दूर रहा, धुळीमध्ये जाऊ नका, गार्डनिंग किंवा शेतीक करताना फुल स्लीव्स आणि ग्लव्ज घाला, मास्क घाला. याशिवाय, घाण पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.
 • कोरोना झालेल्या किंवा ठीक झालेल्या रुग्णांनी नियमत चेकअप करुन घ्यावे. फंगससारखे एखादे लक्षण आढळत असेल, तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट घ्यावी. उपचारात उशीर केल्यावर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...