आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सप्लेनर:मुलांमध्ये वाढत चालला आहे कोरोना विषाणूचा संसर्ग; तज्ज्ञांकडून जाणून घ्या मुलांवर कसा होतोय जीवघेण्या विषाणूचा परिणाम

रवींद्र भजनीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या की मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण का वाढत आहे आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होत आहे-

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत सातत्याने कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी पहिल्यांदाच रुग्णांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला गेला. 18 राज्यांत कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स मिळाले आहेत, जे हा संसर्गाचा मोठ्या प्रमाणात फैलाव करत आहेत. अलीकडेच दिल्ली एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक असून यात मोठ्या संख्येने लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये बंगळुरू येथे 400 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जात आहेत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणे सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणे आहेत. हीच लक्षणे लहान मुलांसाठी घातक ठरतायत. ही लक्षणे लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

डॉ.गुलेरिया सांगतात की, अनेक शाळा सुरू झाल्या. मुले एकमेकांशी बोलत असतात आणि बर्‍याचदा ते खबरदारी घेत नाहीत. यामुळे, कोरोना विषाणू त्यांना संक्रमित करीत आहे. त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडीज तयार झाल्या नाहीत. कोरोना विषाणुच्या नवीन व्हेरिएंटमुळे त्यांना संसर्ग होत आहे. यासंदर्भात आम्ही हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथील बालरोग तज्ञ डॉ. रवींद्र चित्तल, बंगळुरुच्या अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटलचे पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिन कन्सल्टंट श्रीकांत जे.टी. आणि पोद्दार फाऊंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी प्रकृती पोद्दार यांच्याशी बातचीत केली.

या 5 प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घ्या की मुलांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण का वाढत आहे आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होत आहे-

1. पहिल्या लाटेच्या तुलनेत, दुसर्‍या लाटेत मोठ्या संख्येने मुलांना संसर्ग होत आहे, यामागचे कारण काय?

बंगळुरूचे डॉ. श्रीकांत जे.टी. म्हणतात की, सप्टेंबरनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. अनलॉक होताना प्रतिबंध देखील हटविणे सुरू झाले होते. बहुतेक लोकांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या उपायांकडे दुर्लक्ष केले. यामुळे दुसर्‍या लाटे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणतात की, पहिली लाट आली तेव्हा लहान मुले घरात होती. मात्र निर्बंध हटताच मुले घराबाहेर आली आणि त्यांनाही संसर्ग झाला.

मुंबईतील डॉ. चित्तल म्हणाले की, मार्च 2020 मध्ये पहिली लाट सुरू झाली. त्या तुलनेत मार्च 2021 मधील दुसर्‍या लाटेमध्ये लोकांच्या वागण्यात मोठा बदल झाला आहे. गेल्या वर्षी लोकांमध्ये अज्ञात भीती होती. मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे हे तीन महत्त्वाचे नियम होते. वर्षभर लोकांना असे वाटले की उपचारानंतर लोक बरे होत आहेत, म्हणून त्यांनी कोरोनासोबत जगणे देखील शिकले. मात्र याच मुळे मोठ्या संख्येने लहान मुले संक्रमित प्रौढांच्या संपर्कात आली. लोकांचे वर्तन बदलले आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले.

2. असे म्हटले गेले की, या विषाणूचा मुलांवर फारसा परिणाम होणार नाही. पण आता त्यांची प्रकृती खालावत आहे, असे का?

यावर तज्ज्ञ म्हणतात की, यात कोणताही मोठा बदल झालेला नाही. पहिल्या लाटेत मुलांमध्ये मल्टीसिस्टम इनफ्लॅमेटरी सिंड्रोम दिसला. पण त्यावेळी प्रकरणे कमी होती. दुसर्‍या लाटेत अशी प्रकरणे वाढली आहेत. डॉ. श्रीकांत म्हणाले की, आजही बहुतेक संक्रमित मुलांमध्ये नगण्य किंवा हलकी लक्षणे आढळतात.

यावर डॉ चित्तल म्हणतात की, बहुतेक मुलांमध्ये सामान्य सर्दी-खोकला आणि पोटदुखी सारखी लक्षणे आहेत. परंतु ते इतर लोकांना संक्रमित करू शकतात. मल्टी-सिस्टम इनफ्लॅमेशनमध्ये जर उपचार वेळेवर मिळाले नाहीत, तर हा रोग घातक ठरू शकतो. प्रौढांमधे संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने लहान मुलांमध्येही विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे दुसर्‍या लाटेत अधिक केसेस समोर येऊ शकतात.

3. मागील संपूर्ण वर्ष मुले घरात राहिली. ती शाळेत गेली नाहीत किंवा त्यांनी खेळातही वेळ घालवला नाही. आता मात्र लहान मुलांना मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. या समस्येचा
सामना कसा करावा?

गेल्या एक वर्षात मुलांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला, यावर तज्ज्ञांचे एकमत आहे. डॉ. चित्तल म्हणतात की, शाळा बंद पडल्यामुळे आणि मित्रांना भेटू न शकल्यामुळे बहुतेक मुले व किशोरवयीन मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यांच्यात एंग्झाइटी दिसू लागली आहे. अनेक मुलांमध्ये कोरोना संसर्गाची भीती देखील निर्माण झाली आहे. कोरोनाशी संबंधित भयानक बातमी, कौटुंबिक उत्पन्नामध्ये घट आणि पालकांच्या नोकर्‍यांवरील संकटांमुळेही मुलांमध्ये हायपरवेंटिलेशन, अंथरुणात लघवी करणे, मुलांमध्ये तीव्र डोकेदुखी यासारख्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत.

पोद्दार फाउंडेशनच्या प्रकृती पोद्दार सांगतात, उदासीनता, चिंता, कंटाळा आणि अनिश्चितता या आव्हानांना गेल्या वर्षी मुलांना सामोरे जावे लागले होते. मित्रांना भेटता येत नसल्याने नैराश्य आणि चिंता वाढली. याचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पालकांना मुलांमध्ये सामील व्हावे लागेल. त्यांच्याबरोबर इनडोअर खेळ खेळावे लागतील. मुलांसाठी भावनिक सुरक्षा सर्वात महत्वाची आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षित आणि कनेक्ट वाटेल.

डॉ. श्रीकांत देखील या समस्येवर उपाय म्हणून पालकांकडे बघत आहेत. ते म्हणतात की, पालकांनी इनोवेटिव्ह असले पाहिजे. मुलांना त्यांच्या नित्यक्रमात सामिल करुन घ्यायला हवे. त्यांना स्वयंपाक, साफसफाई आणि घरातील इतर कामांमध्ये सामील करुन घ्यायला हवे. पालक बॅडमिंटनसारखे खेळ नक्कीच त्यांच्या मुलांबरोबरच खेळू शकतात.

युनिसेफने देखील मुलांवर कोरोनाच्या परिणामाचा अभ्यास केला आहे. तसेच पालकांनी काय करावे ते सांगितले. फोटो-युनिसेफ
युनिसेफने देखील मुलांवर कोरोनाच्या परिणामाचा अभ्यास केला आहे. तसेच पालकांनी काय करावे ते सांगितले. फोटो-युनिसेफ

4. कोणत्या प्रकारचे उपक्रम मुलांसाठी सुरक्षित असतील?

ऑनलाईन शिक्षणाने अनेक मुलांना अशा गॅझेटशी जोडले ज्यापासून त्यांना कायम दूर राहण्यास सांगितले गेले होते. डॉ. चित्तल म्हणतात की, आम्ही मुलांना मोबाइल, टॅबलेट, टीव्ही किंवा प्लेस्टेशनवर जास्त वेळ घालवू नका असे सांगत होतो. पण गेल्या एका वर्षात मुलांनी त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवला. शारीरिक हालचालीअभावी वजन वाढणे देखील वाढले आहे. अशा परिस्थितीत पालकांनी प्रयत्न करावेत की मुलांनी मनोरंजक पुस्तके वाचायला हवी, चित्रकला, नृत्य किंवा संगीत यात अधिक वेळ घालवावा.

प्रकृती यादेखील डॉ. चित्तल यांच्याशी सहमत आहेत. त्या म्हणतात की, मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करणे महत्वाचे आहे. जर त्यांना इनडोअर गार्डनिंगच्या माध्यमातून मातीशी जोडले गेले, तर ते नैराश्यावर विजय मिळविण्यास मदत करेल. योग, नृत्य आणि व्यायामामुळे तणाव कमी होतो. डिप्रेशन आणि एंग्झाइटी कमी करण्यासाठी याहून दुसरा चांगला पर्याय नाही. त्याचबरोबर डॉ. श्रीकांत म्हणतात की, अशा गोष्टींसाठी लोकांना भेटण्याची गरज नाही, पालक त्यांना धावण्यासाठी किंवा चालायला नेऊ शकतात.

5. भारतात 45+ लसीकरण सुरू झाले आहे. मुलांना ही लस कधी मिळेल?

कोव्हॅक्सिन आणि कोवीशिल्ड या दोन लसी भारतात दिल्या जात आहेत. दोन्ही लसी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायल्समध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना समाविष्ट केले गेले होते, परंतु मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या नाहीत.

अमेरिकेत फाइजरने मुलांवर चाचण्या सुरू केल्या आहेत. मुलांना जी लस दिली जाईल त्याच्या चाचण्या घेतल्या जातील. गेल्या महिन्यात सरकारने सांगितले होते की, कोव्हॅक्सिनच्या मुलांवर चाचण्या सुरू होतील. पण अद्याप त्याला अजून वेळ आहे. डॉ. श्रीकांत यांच्या मते, लसीचा प्रभाव आणि डोसचे प्रमाण निश्चित झाल्यानंतरच त्याचा वापर मुलांसाठी सुरक्षित असेल. सध्या अभ्यास चालू आहे.

डॉ. चित्तल म्हणतात की, जगातील कोणत्या देशाकडे सध्या गर्भवती महिला, स्तनपान देणारी महिला आणि 18 वर्षांखालील मुलांसाठी लस उपलब्ध नाही. प्रकृती यांनी सांगितल्यानुसार,जगभरात मुलांच्या लसींवर काम सुरू आहे. येणार्‍या काळात ही लसदेखील मुलांसाठी उपलब्ध असेल. तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. तसेच, त्यांना हात धुण्याची, सामाजिक अंतर ठेवण्याची आणि मास्क घालण्याची सवय लावायली हवी.

बातम्या आणखी आहेत...