आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Covaxin Covishield Vaccine Projections | Reality Check OF Government's Plan On Vaccine Doses Supply

एक्सप्लेनर:कोविड टास्कफोर्सचा दावा - ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात तयार होणार 2.16 अब्ज डोस; पण अर्धेच मिळण्याची शक्यता

रवींद्र भजनी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हॅक्सिन डोस पुरवठा करण्याबाबत सरकारची योजना आणि त्याचे वास्तव जाणून घेऊया...

भारतात कोविड -19 च्या लढ्याविरूद्ध सुरु झालेली लसीकरणाची गती आता पूर्णपणे मंदावली आहे. 3 ते 9 एप्रिल दरम्यान भारतात 2.47 कोटी डोस दिले गेले आहेत, जे 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेतील आतापर्यंतच्या आठवड्यातील सर्वाधिक डोस आहेत. परंतु त्यानंतर पुरवठा मंदावला आणि 15 ते 21 मे दरम्यान फक्त 92 लाख डोस दिले गेले.

जेव्हा लसीकरणाची गती मंदावली तेव्हा भारतातील कोरोनाशी संबंधित बाबींवर धोरण बनवणा-या कोविड टास्क फोर्सने लस उपलब्ध होण्याबाबत 13 मे रोजी मोठे दावे केले. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल यांनी एक प्रेझेंटेशन दाखवून सांगितले की, ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात 2.1 अब्ज डोस तयार केले जातील. म्हणजेच, संपूर्ण लोकसंख्येसाठी दोन डोस भारतात तयार बनवले जातील.

परंतु सरकारने जी योजना आखली आहे, त्याचे मूल्यांकन केले असता हे वास्तवापासून खूप दूर असल्याचे दिसते. सद्यस्थिती लक्षात घेता ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत भारतात टार्गेटच्या अर्धेच डोस उपलब्ध होऊ शकणार आहेत.

व्हॅक्सिन डोस पुरवठा करण्याबाबत सरकारची योजना आणि त्याचे वास्तव जाणून घेऊया...

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या फॅसिलिटीत कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या वायल्सने भरलेल्या बॉक्सचे पॅकिंग करताना कर्मचारी. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत सीरममध्ये 75 कोटी डोसचे उत्पादन होणे अपेक्षित आहे, परंतु कंपनीची प्रत्यक्षात क्षमता 50 कोटी डोस तयार करण्याची आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या फॅसिलिटीत कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या वायल्सने भरलेल्या बॉक्सचे पॅकिंग करताना कर्मचारी. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत सीरममध्ये 75 कोटी डोसचे उत्पादन होणे अपेक्षित आहे, परंतु कंपनीची प्रत्यक्षात क्षमता 50 कोटी डोस तयार करण्याची आहे.

1. कॉविशिल्ड : देशातील सर्वात मोठी आशा सीरम इन्स्टिट्यूट

प्लॅटफॉर्मः व्हायरल वेक्टर लस. चिंंपांझीत आढळणारा अ‍ॅडेनोव्हायरस घेतला. त्यात बदल केले. त्याला कोरोनासारखे बनवले. 12-18 आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिल्यास ही लस 80% पर्यंत प्रभावी आहे.
डेव्हलपमेंट स्टेटस : ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश फर्म अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केली. 16 जानेवारीपासून भारतात सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत त्याचा समावेश होता. 28 मे पर्यंत 18 कोटी डोस दिले गेले आहेत. सरकारने दोन डोसमधील अंतर दोनदा वाढवले. पहिल्यांदा 4 ते 6 आठवड्यांहून वाढवून ते 6 ते 8 आठवडे करण्यात आले आणि नंतर 13 मे रोजी अंतर वाढवून 12-16 आठवड्यांपर्यंत करण्यात आले.
सरकारचा दावाः जुलै पर्यंत 27.6 कोटी डोस उपलब्ध होतील. यानंतर, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत 75 कोटी डोस तयार असतील. म्हणजेच, दरमहा 15 कोटी डोसचे उत्पादन होईल.
वास्तव : काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारत सरकारला चार महिन्यांचा उत्पादन आराखडा दिला आहे. त्यानुसार, ऑगस्टपर्यंत ते दरमहा 10 कोटी डोसचे उत्पादन घेण्यास सुरुवात करतील. म्हणजेच ऑगस्ट ते डिसेंबर या काळात केवळ 50 कोटी डोस तयार केले जाऊ शकतील. यातही कंपनी कच्च्या मालासाठी अमेरिकेसह इतर देशांवर अवलंबून आहे आणि यामुळे त्यांचा प्रॉडक्शन प्लान ढासळला आहे.

कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत बायोटेकने प्राण्यांच्या लसी तयार करणा-या त्यांच्या दोन यूनिट्समध्ये व्हॅक्सिनची तयारी सुरू केली आहे. उत्पादन दरवर्षी 1 अब्ज डोसपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा दावा आहे.
कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत बायोटेकने प्राण्यांच्या लसी तयार करणा-या त्यांच्या दोन यूनिट्समध्ये व्हॅक्सिनची तयारी सुरू केली आहे. उत्पादन दरवर्षी 1 अब्ज डोसपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा दावा आहे.

2. कोव्हॅक्सिनः स्वदेशी लसीच्या मार्गात अनेक अडथळे

प्लॅटफॉर्म: इनअॅक्टिवेटेड व्हॅक्सिन. विषाणूला रेडिएशन, उष्णता आणि इतर उपायांनी कमकुवत केले. नैसर्गिक मार्गाने अँटीबॉडी तयार करण्यासाठी शरीरात इंजेक्ट केले.
डेव्हलपमेंट स्टेटस : भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या संयुक्त विद्यमाने ही लस विकसित केली आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत भाग घेतला आहे. गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या दुसर्‍या अंतरिम निकालानुसार ही लस 78% प्रभावी आहे. 28 मे पर्यंत कोव्हॅक्सिनचे 2.19. कोटी डोस दिले गेले आहेत.
सरकारचा दावाः जुलै पर्यंत 8 कोटी डोस उपलब्ध होतील. यानंतर ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत 55 कोटी डोस उपलब्ध होतील. म्हणजेच दरमहा 11 कोटी डोसचे उत्पादन होईल.
वास्तव : खरं तर, भारत बायोटेकने सरकारला सांगितले आहे की, जुलै पर्यंत प्रत्येक महिन्यात 3.32 कोटी डोस तयार केले जातील. ऑगस्टमध्ये उत्पादन दरमहा 7.82 कोटी डोसपर्यंत वाढवले ​​जाईल. यासाठी कंपनीने कर्नाटकातील मालूर येथे आणि गुजरातमधील अंकलेश्वर फॅसिलिटीत कोव्हॅक्सिन तयार करण्याची योजना आखली आहे. कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने कोविड सेफ्टी मिशन सुरू केले आहे. याअंतर्गत, कोव्हॅक्सिन उत्पादनासाठी सरकार त्यांचे तीन युनिट्स - इंडियन इम्यूनोलॉजिकल्स लिमिटेड, भारत इम्युनोबोलॉजिकल्स अँड बायोलॉजिक्स लिमिटेड आणि हॉफकिन इन्स्टिट्यूटला कोव्हॅक्सिनच्या प्रॉडक्शनसाठी तयार करत आहे. येथून दरमहा कोटी डोस तयार करता येतील. परंतु हे युनिट्स तयार करणे हे एक मोठे आव्हान असेल.

स्पुतनिक व्हीचे उत्पादन अद्याप देशात सुरू झालेले नाही. रशियाकडून आलेल्या पहिल्या खेपेच्या आधारे स्पुतनिक व्हीचा पहिला डोस 14 मे रोजी भारतात सुरू झाला.
स्पुतनिक व्हीचे उत्पादन अद्याप देशात सुरू झालेले नाही. रशियाकडून आलेल्या पहिल्या खेपेच्या आधारे स्पुतनिक व्हीचा पहिला डोस 14 मे रोजी भारतात सुरू झाला.

3. स्पुतनिक व्ही: दोन्ही डोस वेगळे आहेत, म्हणजे उत्पादन देखील वेगळे आहे

प्लॅटफॉर्मः व्हायरल वेक्टर व्हॅक्सिन. एडेनोव्हायरसपासून विकसित करण्यात आले. ही दोन डोस असलेली लस आहे, त्याच्या दोन्ही डोसमध्ये वेगवेगळे व्हायरस वापरण्यात आले आहेत.
डेव्हलपमेंट स्टेटस : रशियन लस स्पुतनिक व्हीला भारत सरकारने 12 एप्रिल रोजी आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी दिली. या लसीची कार्यक्षमता सुमारे 92% आहे. स्पुतनिक व्हीचा भारतातील पहिला डोस 14 मे रोजी देण्यात आला आहे. 28 मे पर्यंत, 3,761 डोस देण्यात आले आहेत.
सरकारचा दावाः 15.6 कोटी डोस जुलै ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध होतील.
वास्तव : डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने रशियाकडून दीड लाख डोस मागितले होते, जे खाजगी रुग्णालयांमध्ये वापरले जात आहे. पॅनासिया बायोटेकच्या हिमाचल प्रदेशातील फॅसिलिटीत स्पुतनिक व्हीचे उत्पादन घेणे सुरु झाले आहे. पहिली बॅच गुणवत्ता चाचणीसाठी मॉस्कोमधील गमालेया सेंटरमध्ये पाठविली जाईल. समस्या अशी आहे की, ही लस -18 डिग्री सेल्सिअस तापमानात स्टोअर करणे आवश्यक आहे. हे भारतात उपलब्ध असलेल्या रेफ्रिजरेशन सिस्टमसाठी एक आव्हान असेल. अशीही समस्या आहे की स्पुतनिक व्हीच्या दोन्ही डोसमध्ये भिन्न रचना आहे. म्हणजेच, पहिला डोस आणि दुसरा डोस वेगवेगळा असेल. डॉ. रेड्डीज आणि इतर पार्टनर्सची उत्पादन क्षमता पाहता लक्ष्य पूर्ण करणे अवघड आहे.

अहमदाबादमधील झायडस कॅडिलाची स्वदेशी लस फेज-3 चाचणीमध्ये आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल येऊ शकतात. लवकरच त्याचे उत्पादनही सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील कंपनीच्या फॅसिलिटीत व्हॅक्सिन डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेची पाहणी केली. हे तेव्हाचे म्हणजे नोव्हेंबरचे छायाचित्र आहे.
अहमदाबादमधील झायडस कॅडिलाची स्वदेशी लस फेज-3 चाचणीमध्ये आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल येऊ शकतात. लवकरच त्याचे उत्पादनही सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील कंपनीच्या फॅसिलिटीत व्हॅक्सिन डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेची पाहणी केली. हे तेव्हाचे म्हणजे नोव्हेंबरचे छायाचित्र आहे.

4. झायकोव डी: ही तीन डोसची लस आहे!

प्लॅटफॉर्म: डीएनए प्लॅटफॉर्म. हे पहिल्यांदा सार्स आणि मर्ससाठी व्हॅक्सिन तयार करण्यासाठी प्लॅटफॉर्म विकसित झाले होते.
डेव्हलपमेंट स्टेटस : कोव्हॅक्सिननंतरची ही दुसरी स्वदेशी लस असेल. जानेवारीत 28 हजार स्वयंसेवकांवर फेज 3 ट्रायल्स सुरू झाले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल अपेक्षित आहे. परवानगी मिळाल्यास जूनमध्ये उत्पादन सुरू सुरु होईल.
सरकारचा दावाः 5 कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत उपलब्ध असतील. परंतु ही तीन डोसची लस आहे, म्हणजे केवळ 1.6 कोटी लोकांनाच संपूर्ण लसी दिली जाईल.
वास्तव : जूनपासून ही लस पुरवण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी दरमहा 2 कोटी डोस देऊ शकते. काही दिवसांपूर्वी, झायडस कॅडिलाचे व्यवस्थापकीय संचालक शेरविल पटेल म्हणाले होते की, कंपनी दरमहा एक कोटी डोसचे उत्पादन करेल. करारा अंतर्गत दरमहा एक कोटी डोस तयार करता येतील. म्हणजेच ते सरकारच्या अंदाजांची पूर्तता करू शकते. परंतु सर्व काही फेज 3 चाचणीच्या परिणामांवर अवलंबून असेल. लसीला परवानगी दिली जाऊ शकते की नाही हे तेव्हाच समजेल.

नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन, बेलर येथील प्रोफेसर आणि डीन डॉ. पीटर होटेज आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. मारिया एलेना बोटाजी यांच्या देखरेखीखाली तयार होत असलेल्या या लसीचे प्रॉडक्शन भारतात बायोलॉजिकल ई करेल.
नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन, बेलर येथील प्रोफेसर आणि डीन डॉ. पीटर होटेज आणि असोसिएट प्रोफेसर डॉ. मारिया एलेना बोटाजी यांच्या देखरेखीखाली तयार होत असलेल्या या लसीचे प्रॉडक्शन भारतात बायोलॉजिकल ई करेल.

5. बायोलॉजिकल ई: जागतिक चाचण्यांच्या निकालांसाठी प्रतीक्षा करावी लागेल

प्लॅटफॉर्मः प्रोटीन सबयूनिट. व्हायरस स्पाइक प्रोटीनच्या भागाला टार्गेट करेल, त्याविरूद्ध अँडीबॉडी तयार करण्यास प्रेरित करेल.
डेव्हलपमेंट स्टेटस : अमेरिकेच्या टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटल सेंटर फॉर व्हॅक्सीन डेव्हलपमेंटमध्ये तयार अँटीजनचा वापर केला गेला. बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन अँड डायनाव्हॅक्सने ही लस तयार केली आहे. 24 एप्रिल रोजी बायोलॉजिकल ई ने भारतात 1,268 वॉलंटिअर्सवर फेज -3 क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत.
सरकारचा दावाः 30 कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध असतील.
वास्तव : सरकारच्या आदेशानुसार जून-जुलैमध्ये आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सरकार या लसीला त्याच्या जागतिक चाचण्यांच्या निकालांच्या आधारे मान्यता देईल की नाही? हे पाहावे लागेल. जर नियम पाहिले तर परवानगी दिली जाऊ नये. तसे, प्रॉडक्शन टार्गेट पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बायोलॉजिकल ईने ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यात 7.5-8 कोटी डोसची योजना आखली आहे. पाच महिन्यांत 30 कोटी डोस उपलब्ध करणे कठीण नाही.

नोव्हेंबरमध्ये लस विकास प्रक्रिया बघण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नरेंद्र मोदी गेले असता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी त्यांना कंपनीच्या विस्ताराविषयी सांगितले. कोविशील्डसह कोवाव्हॅक्स देखील येथे बनवली जाणार आहे.
नोव्हेंबरमध्ये लस विकास प्रक्रिया बघण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नरेंद्र मोदी गेले असता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी त्यांना कंपनीच्या विस्ताराविषयी सांगितले. कोविशील्डसह कोवाव्हॅक्स देखील येथे बनवली जाणार आहे.

6. कोवाव्हॅक्स - सीरमवरच सरकारचा मोठा डाव आहे

प्लॅटफॉर्मः दोन डोस असलेली ही लस प्रोटीन सबयूनिट प्लॅटफॉर्मवर बनवली गेली आहे.
डेव्हलपमेंट स्टेटस : सीरम इन्स्टीट्यूटने मार्चमध्ये कोवाव्हॅक्सच्या फेज -2 / 3 ब्रिजिंग चाचण्या सुरू केल्या. यासाठी 1600 वॉलंटियर्स सामील झाले आहेत. ही लस जूनमध्ये लाँच होणार होती. पण आता सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
सरकारचा दावाः 20 कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उपलब्ध असतील.
वास्तव : खरं तर, ही लस विकसित करणारी कंपनी नोवाव्हॅक्सचे म्हणणे आहे की 30,000 वॉलंटियर्सवर करण्यात आलेल्या फेज -3 चाचणीचा अंतिम निकाल जूनपर्यंत उपलब्ध होईल. यामुळे, 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत अमेरिका, यूके आणि युरोपमध्ये आपत्कालीन वापराची मंजूरी घेण्यात येईल. सप्टेंबरपूर्वी लस येणे अवघड आहे. आणखी एक मोठी समस्या म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता. सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर कच्चा माल मिळाला तर दरमहा 4-5 कोटी डोस तयार केले जाऊ शकतील. म्हणजेच प्रॉडक्शन अटींमध्ये अडकले आहे.

देशातील पहिली mRNA लस जेनोवामध्ये बनविली जात आहे. सध्या चाचण्या सुरू आहेत. मॉडर्नाची mRNAव्हॅक्सिनचे भारतात उत्पादन जेनोवा करत असल्याची चर्चा आहे. सध्या काहीही निश्चित केलेले नाही.
देशातील पहिली mRNA लस जेनोवामध्ये बनविली जात आहे. सध्या चाचण्या सुरू आहेत. मॉडर्नाची mRNAव्हॅक्सिनचे भारतात उत्पादन जेनोवा करत असल्याची चर्चा आहे. सध्या काहीही निश्चित केलेले नाही.

7. जेनोवा फार्मास्युटिकल्सची mRNA लस

प्लॅटफॉर्म: mRNA व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म. अमेरिकेत फायझर आणि मॉडर्नाची लस याच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. मेसेंजर आरएनए वर आधारित आहे. शरीरात जाऊन रोगप्रतिकारक यंत्रणेस सतर्क करते.
डेव्हलपमेंट स्टेटस : मे महिन्यात फेज -1 आणि फेज -2 चाचण्या सुरु झाल्या. पुणे आणि कोल्हापुरात 620 जणांची नोंद झाली आहे. ही दोन डोसची लस असून यातील अंतर 24 दिवसांचे असेल. ही लस -4 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवावी लागेल.
सरकारचा दावाः डिसेंबरपर्यंत 6 कोटी डोस उपलब्ध होतील.
वास्तव : पुणेस्थित जेनोवा फार्माने सिएटलच्या एचडीटी बायोटेकशी हातमिळवणी केली आहे. लसीच्या चाचण्या सुरू होण्यास आधीच 6 महिन्यांचा उशीर झाला आहे. कंपनीची भारतात दरवर्षी 20 कोटी डोस उत्पादन करण्याची क्षमता आहे, जी नंतर वाढवून 1 अब्ज करण्याची तयारी आहे. त्याचबरोबर एचडीटी बायोटेक म्हणते की, ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. फेज-3 चाचण्या पूर्ण करण्यास किती वेळ लागेल आणि आपत्कालीन मंजुरी कधी मिळेल, हे सर्व नियामक संस्थांच्या हातात आहे. मोठा प्रश्न हा आहे की तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा निकाल न पाहता भारतीय नियामकाने देशातील पहिल्या mRNA लसीला मंजूरी देणे योग्य ठरेल का?

भारत बायोटेकचे सीएमडी श्री कृष्णा एल्ला आपल्या सहका-यांशी चर्चा करताना... भारत बायोटेक एका नेजल व्हॅक्सिनवरही काम करत आहे. त्याची चाचणी सुरू झाली आहे. ही देशात तयार होणारी पहिली नेजल कोरोना व्हॅक्सिन ठरु शकते.
भारत बायोटेकचे सीएमडी श्री कृष्णा एल्ला आपल्या सहका-यांशी चर्चा करताना... भारत बायोटेक एका नेजल व्हॅक्सिनवरही काम करत आहे. त्याची चाचणी सुरू झाली आहे. ही देशात तयार होणारी पहिली नेजल कोरोना व्हॅक्सिन ठरु शकते.

8. भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन
प्लॅटफॉर्म: BBV154 किंवा इंट्रानेजल एडेनोव्हायरल वेक्टर लस. ही लस नाकातील थेंबाप्रमाणे वापरली जाईल. सुईची गरज भासणार नाही.
डेव्हलपमेंट स्टेटस : 175 लोकांवर फेज -1 क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्याचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
सरकारचा दावाः या लसीचे 10 कोटी डोस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होईल.
वास्तव : कोव्हॅक्सिन ही लस तयार करणारी भारत बायोटेकच ही इंट्रानेजल व्हॅक्सिन तयार करत आहे. भारतातली ही अशा प्रकारची पहिली लस असेल. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, सेंट लुईस येथील बायोलॉजिक्स थेरॉप्टिक्स सेंटरने ही लस विकसित करण्यासाठी भारत बायोटेकशी हातमिळवणी केली आहे. ही लस नाकातच प्रतिकारशक्ती निर्माण करेल, जी स्वतःच विषाणुला प्रवेश करताच नष्ट करेल. सप्टेंबर 2020 मध्ये, कंपनीने असा दावा केला की हैद्राबाद फॅसिलिटीत या इंट्रानेजल लसच्या दरवर्षी 2 अब्ज डोस तयार करण्याची क्षमता विकसित होईल.

खासगी रुग्णालयांमधील या सूचना डोसच्या उपलब्धतेची सद्यस्थिती काय आहे हे दर्शवित आहे. वास्तवदेखील तेच आहे. जून किंवा जुलैमध्ये गोष्टी निश्चितच सुधारू शकतात.
खासगी रुग्णालयांमधील या सूचना डोसच्या उपलब्धतेची सद्यस्थिती काय आहे हे दर्शवित आहे. वास्तवदेखील तेच आहे. जून किंवा जुलैमध्ये गोष्टी निश्चितच सुधारू शकतात.

आता प्रत्यक्षात स्थिती काय आहे...

भारत सरकारची योजना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या उत्पादनावर अवलंबून आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एकत्रित 1.3 अब्ज डोस अपेक्षित आहेत. वास्तविकता अशी आहे की जर याचे 75 कोटी डोस जरी मिळाले तरी ही एक मोठी उपलब्धी असेल. केंद्र सरकारला नोवाव्हॅक्सच्या कोवाव्हॅक्सचे 20 कोटी आणि स्पुतनिक व्हीचे 15.6 कोटी डोस मिळणे सध्या तरी कठीण दिसत आहे.

उर्वरित 51 कोटी डोस ज्या लसींचे मिळणार आहे, त्यापैकी चार तर फेज - 1 आणि फेज - 2 चाचण्यांमध्ये अडकले आहेत. तीन लसी परदेशी कंपनी किंवा संस्थांच्या मदतीने विकसित केल्या जात आहेत. त्याच्या चाचण्यांचा डेटाही उपलब्ध नाही. केंद्र सरकारच्या दबावाखाली जर या लसींच्या कार्यक्षमेची चाचणी न करता परवानगी दिली गेली, तरच सरकारच्या अंदाजानुसार लसीचे डोस भारतात उपलब्ध होऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...