आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus (Covid 19) Vaccination 18 44 Age Group FAQs; Registration Portal And Covaxin Covishield Mismatch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:कोरोना व्हॅक्सिन FAQs:  पहिला डोस कोविशिल्डचा आणि दुसरा कोव्हॅक्सिनचा … घेता येऊ शकतो का?

आबिद खान8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे...

येत्या 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना आता कोरोनावरील लस घेता येणार आहे. यामुळे देशात पसरलेली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु असे बरेच प्रश्न आहेत जे लसीकरणाबद्दल पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी अनेकदा या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून अजूनही हे प्रश्न विचारले जात आहेत.

हे प्रश्न काय आहेत आणि त्यांची उत्तरे काय आहेत? हे समजून घेऊया. त्यासाठी आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेले FAQs, लस उत्पादक (सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक) कंपन्यांनी जारी केलेली फॅक्टशीट, व्हॅक्सिन एक्सपर्ट डॉ. गगनदीप कंग, एपिडिमोलॉजिस्ट डॉ. चंद्रकांत लहरिया, इंदूर येथील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औषध विभागाचे डॉ व्ही.पी. पांडे यांची मदत घेतली आहे. प्रत्येकाचे हेच म्हणणे आहे की, सगळ्यांनी लस घ्यावी. कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून आपले संरक्षण करण्यात हे 100% प्रभावी आहे.

मी 18+ आहे. मी लस थेट रुग्णालयात जाऊन घेऊ शकतो का?
नाही. केंद्र सरकारने यासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याव्यतिरिक्त काही खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येऊ शकते. पण त्यांनाच ज्यांनी आरोग्य सेतु अ‍ॅप किंवा कोव्हिन पोर्टल (https://selfregreg.c.cinin.gov.in/) वर नोंदणी केली असेल. ही सुविधा 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
पासपोर्ट साइज फोटोसह खाली दिलेल्या कोणत्याही आयडीद्वारे नोंदणी करता येते.

 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसेंस
 • कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) जॉब कार्ड
 • खासदार / आमदार / MLC यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • बँक / पोस्ट ऑफिसने दिलेले पासबुक
 • पासपोर्ट
 • पेन्शन कागदपत्र
 • केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक मर्यादित कंपन्यांद्वारे कर्मचार्‍यांना दिलेली सेवा ओळखपत्रे
 • वोटर ID

नोंदणीनंतर काय होईल?
नोंदणीमध्येच आपल्याला रुग्णालय, उपलब्ध तारीख आणि भेटीची वेळ निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट बुक करण्यासाठीचा मेसेज मिळेल. त्यानंतर आपण निर्धारित वेळेत लसीचा एक
डोस घेऊ शकता. आपण नोंदणीमध्ये जे ID वापरले ते आपल्यासोबत ठेवणे आवश्यक असेल.

पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल का?
नाही एकदा नोंदणी केल्यावर तुम्हाला संभाव्य तारखांविषयी सूचित केले जाईल. आपल्याला मोबाइलवर मेसेजद्वारे त्याचे कन्फर्मेशन मिळेल.

मी माझ्या मूळ शहरापासून दूर आहे. मी दुसर्‍या राज्यात लस डोस घेऊ शकतो?

 • तुमचे वय 45+ असेल, तर केंद्र सरकारच्या यंत्रणेनुसार तुम्हाला देशातील कोणत्याही लसीकरण केंद्रात डोस मिळेल. परंतु 18-44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी अद्याप स्थिती स्पष्ट नाही. या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या व्यवस्था असू शकतात.
 • स्थलांतरित मजुरांबरोबरच आपल्या मूळ शहराबाहेरील रहिवाशांनाही ही लस घेण्याची सुविधा मिळावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आता राज्यांमध्ये धोरण तयार केले जात आहे. यावर काही बोलणे घाईचे होईल.
 • आतापर्यंत मध्य प्रदेश, हरियाणा, नवी दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यासारख्या 24 राज्यांनी 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत लस दिली जाईल असा निर्णय घेतला आहे. परंतु यामध्ये मूळ नागरिकांसाठी हा नियम लागू होईल की नाही आणि बाह्य राज्यांतील मूळ रहिवाशांना ही सुविधा मिळेल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. एक किंवा दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल.

भारतात कोणत्या लसी दिल्या जात आहेत?

 • भारतात सध्या पुण्यातील सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया येथे तयार केली जाणारी कोविशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकमध्ये तयार होणारी कोव्हॅक्सिन दिली जात आहे. कोव्हॅक्सिन ही लस ICMR - भारत बायोटेकने मिळून बनवली आहे. हैदराबाद येथे निर्मिती होत आहे. तर कोविशिल्ड ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका यांनी मिळून बनवली. पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियामध्ये निर्मिती होत आहे.
 • भारत सरकारने 12 एप्रिल रोजी स्पुतनिक V या रशियन लसीला मान्यता दिली आहे. मे महिन्यात ही लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. भारतात डॉ. रेड्डीज लेबॉरेटरीसह अन्य काही औषधी कंपन्या ही लस बनवत आहे. कोणत्याही राज्य सरकारकडून रशियन लसीसाठी कोणताही करार झालेला नाही.
 • अमेरिका, जपान, यूके, युरोपियन युनियन आणि डब्ल्यूएचओकडून मंजूर झालेल्या लसींना काही अटींसह तातडीने मान्यता देण्याचा निर्णय भारत सरकारने नुकताच घेतला आहे. यासोबतच सरकारने​​​​​​​ फायझर, मॉडर्ना, जॉनसन आणि जॉन्सन या कंपन्यांनाही लस भारतात उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन केले आहे. या लसी मे-जूनमध्ये भारतात उपलब्ध देखील होऊ शकतील.

यापैकी कोणती लस चांगली आहे?

 • कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात वापरल्या जाणार्‍या सर्व लसींची भिन्न कार्यक्षमता आहे. ती 66% ते 95% पर्यंत असू शकते. चांगली गोष्ट म्हणजे ही लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला​​​​​​​ संसर्ग झाल्यास तो गंभीर अवस्थेत पोहोचत नाही.
 • वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी घेण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांवर इफेक्टिव्हनेस ठरु शकतो. परंतु चांगली गोष्ट अशी की, या सर्व लस गंभीर लक्षणांपासून संरक्षण करण्यासाठी 100% प्रभावी आहेत. यामुळे तज्ज्ञ म्हणतात की, ज्यांना संधी मिळत आहे, त्यांनी लस नक्कीच घ्यायला हवी.

कोविड व्हॅक्सिनचे दोन डोस बदलले जाऊ शकतात? अर्थात पहिला डोस कोव्हॅक्सिन आणि दुसरा कोविशिल्डचा घेता येतो?

नाही. हे तुमच्यासाठी सुरक्षित राहणार नाही. पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेत असाल तर दुसरा डोस सुद्धा त्याचाच घ्यावा. याच प्रकारे कोविशिल्डचा पहिला डोस घेत असाल तर दुसरा डोस सुद्धा कोविशिल्डचाच घ्यावा.

लहान मुलांना कोरोना होतोय, मग त्यांना लस द्यावी का?
नाही. सध्या व्हॅक्सिनच्या लहान मुलांवर चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे, त्यांना व्हॅक्सिनचे डोस देणे सुरक्षित राहणार नाही.

मासिक पाळीत महिला लस घेऊ शकतात का?
होय. पीरियड्समध्ये महिलांच्या शरीरात होणाऱ्या प्रक्रियेचा आणि कोरोना व्हॅक्सिनचा काहीच संबंध नाही असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

कुणी लस घेणे टाळावे?

 • कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर गंभीर एलर्जी झाल्यास.
 • गर्भवती असल्यास किंवा बाळाला फीडिंग करत असल्यास.
 • कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास.
 • इतर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर लस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्हॅक्सिन कोरोनाच्या नवीन प्रकाराविरुद्ध काम करते का?
होय. कोव्हॅक्सिन संदर्भात ICMR ने दावा केला की आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांविरुद्ध व्हॅक्सिन प्रभावीपणे काम करते. तर कोविशिल्ड बाबतीत मतभिन्नता दिसून आली आहे. तरीही दोन्ही व्हॅक्सिन कोरोनाच्या सर्व व्हॅरिएंट्स आणि गंभीर लक्षणांच्या विरोधात लढण्यात प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...