आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह:अति आत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयांमुळे कोरोना परिस्थिती आणखी बिकट झाली, वाचा आघाडीच्या 5 परदेशी मीडिया हाऊसनी काय लिहिले

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या परदेशी मीडिया हाऊस काय म्हणत आहेत..

भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. जाणून घ्या परदेशी मीडिया हाऊस काय म्हणत आहेत..

ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यू : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मोदींचे व्यंगचित्र

ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूमध्ये व्यंगचित्रकार डेव्हिड रोव यांचे हे व्यंगचित्र प्रकाशित केले गेले आहे.
ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूमध्ये व्यंगचित्रकार डेव्हिड रोव यांचे हे व्यंगचित्र प्रकाशित केले गेले आहे.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ऑस्ट्रेलियन फायनान्शियल रिव्ह्यूमध्ये तीव्र प्रतिक्रिया बघायला मिळाली आली. व्यंगचित्रकार डेव्हिड रोव यांनी व्यंगचित्रात दाखवले की, भारत देश हत्तीइतकाच विशाल आहे. मात्र आता तो मरणाच्या दारात उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हत्तीच्या पाठीवर लाल सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डोक्यावर पगडी असून एका हातात माईक दिसतोय. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

द वॉशिंग्टन पोस्ट: निर्बंधातून लवकर दिलासा मिळाल्यामुळे भारतात कोरोनाचा उद्रेक झाला

अमेरिकेच्या 'द वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने 24 एप्रिलच्या आपल्या ओपिनियनमध्ये लिहिले आहे की, भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे सर्वात मोठे कारण म्हणजे निर्बंधांमधून मिळालेला दिलासा हे आहे. यामुळे लोकांनी महामारीला गांभीर्याने घेतले नाही. कुंभमेळा, क्रिकेट स्टेडियमवर मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले. कोरोनाचा नवीन प्रकार आणखी धोकादायक आहे.

बातमी येथे वाचा : https://www.washingtonpost.com/opinions/global-opinions/indias-sudden-coronavirus-wave-is-not-a-far-away-problem/2021/04/23/f363bda2-a3a3-11eb-85fc-06664ff4489d_story.html?ref=inbound_article

द गार्डियन : भारतातील बिघडलेल्या परिस्थितीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अति आत्मविश्वास

'द गार्डियन' या ब्रिटीश वृत्तपत्राने भारतातील कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीवर पंतप्रधान मोदींना कठड्यात उभे केले आहे. 23 एप्रिल रोजी वर्तमानपत्राने लिहिले आहे - भारतीय पंतप्रधानांच्या अति आत्मविश्वासामुळे देशाला जीवघेण्या कोविड -19 च्या दुस-या लाटेने विक्रमी स्तरावर नेले आहे.

लोक अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड नाहीत. 6 आठवड्यांपूर्वी त्यांनी भारताला 'वर्ल्ड फार्मसी' म्हणून घोषित केले, प्रत्यक्षात भारतातील 1% लोकांचेही लसीकरण झाले नव्हते.

येथे वाचा बातमी : https://www.theguardian.com/world/commentisfree/2021/apr/23/the-guardian-view-on-modis-mistakes-a-pandemic-that-is-out-of-control?ref=inbound_article

द न्यूयॉर्क टाईम्सः चुकीच्या निर्णयांमुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे भारतात कोरोनाने हाहाकार माजवला

अमेरिकेच्या 'द न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राने 25 एप्रिल रोजी भारताच्या संदर्भात लिहिले आहे की, एक वर्षापूर्वी जगातील सर्वात कठोर लॉकडाउन लावून कोरोनावर ब-यापैकी मात केली होती, परंतु त्यानंतर तज्ज्ञांच्या इशा-याकडे दुर्लक्ष केले गेले. आज कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्णालयात बेड नाहीत. प्रमुख राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. सरकारचे चुकीचे निर्णय आणि येणा-या अडचणींकडे डोळेझाक केल्याने भारताला सर्वात वाईट स्थितीत पोहोचवले आहे. हाच देश कोरोनाला पराभूत करण्यात यशस्वी उदाहरण ठरू शकला असता.

येथे वाचा बातमी : https://www.nytimes.com/2021/04/09/world/asia/india-covid-vaccine-variant.html?ref=inbound_article

टाईम मॅगझिनः पंतप्रधान मोदी भारतात कोरोना रोखण्यात अपयशी ठरले, लसीकरणाचा दर देखील कमी

प्रतिष्ठित टाईम मासिकाच्या 23 एप्रिलच्या लेखात राणा अयूब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाच्या युद्धात अपयशी ठरवले. या लेखात त्यांनी यावर्षी कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तयारी कशी केली गेली नव्हती असा प्रश्न केला आहे.

पंतप्रधानांवर निशाणा साधताना म्हटले की जबाबदार तो आहे ज्याने सर्व खबरदारींकडे दुर्लक्ष केले. जबाबदार ते मंत्रिमंडळ आहे, ज्याने पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना त्यांनी देशातील कोरोनाविरूद्ध यशस्वी लढा दिल्याचे म्हटले आहे. चाचणी देखील मंदावली आहे. लोकांना भयानक विषाणूची जास्त भीती राहिली नाही.

येथे वाचा बातमी : https://time.com/5957118/india-covid-19-modi/?ref=inbound_article

बीबीसीने म्हटले- भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीवर वाईट परिणाम झाला

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटिश वृत्तसंस्था बीबीसीने म्हटले आहे की, कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांमुळे भारताची आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. लोकांना उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णालयात बेड व ऑक्सिजन नाही. आरोग्य प्रोटोकॉलमधील उथळपणा, कुंभमेळ्यात लाखो लोकांच्या उपस्थितीमुळे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

येथे वाचा बातमी : https://www.bbc.com/news/world-asia-56858403?ref=inbound_article

जगभरातून भारताला मदतीचा हात

  • ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी सांगितले - या कठीण काळात आम्ही भारताबरोबर उभे आहोत. भारत हा आपला मित्र देश आहे आणि कोविड -19 विरुद्धच्या या लढाईत आम्ही त्यांना साथ देऊ.
  • फ्रान्स आणि जर्मनीने भारतात वैद्यकीय ऑक्सिजन क्षमता वाढवण्याची तयारी केली आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी त्याला 'मिशन सपोर्ट इंडिया' असे नाव दिले आहे. ते म्हणाले - आम्ही सर्वजण साथीच्या विरोधात लढा देत आहोत.
  • फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेने संकटाच्या काळात भारताला मदतीचा हात दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन म्हणाले की, साथीच्या रोगाच्या सुरूवातीच्या काळात भारताने आमच्या रूग्णालयात मदत पाठविली होती. आता त्यांना गरज आहे म्हणून आम्ही मदतीसाठी तयार आहोत.
बातम्या आणखी आहेत...