आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Delta Plus Variant Explained | India COVID Cases, Coronavirus Third Wave And COVID Vaccine

एक्सप्लेनर:डेल्टा-प्लस व्हेरिएंट का आहे धोकादायक? यामुळे येऊ शकते का तिसरी लाट? आपल्याकडील औषधे आणि लसी यावर प्रभावी आहेत का?

रवींद्र भजनीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

कोरोना विषाणुच्या सततच्या बदलत जाणा-या रुपामुळे नवीन चिंता लागून राहिली आहे. भारतातील जीवघेणा-या दुस-या लाटेसाठी जो डबल म्युटेंट म्हणजेच डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता, त्यात आता बदल झालेला बघायला मिळतोय. नवीन व्हेरिएंटदेखील महाराष्ट्रातच आढळून आला आहे. महाराष्ट्रात या नवीन व्हेरिएंटची सात प्रकरणे समोर आली आहेत. हा व्हेरिएंट केवळ भरातातच नव्हे तर बर्‍याच देशांमध्ये आढळून आला आहे. याला वैज्ञानिंकांनी डेल्टा-प्लस व्हेरिएंट म्हटले आहे.

दक्षता घेतली गेली नाही तर येत्या दोन-तीन आठवड्यांत महाराष्ट्रात तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येणा-या तिस-या लाटेत अॅक्टिव रुग्णांचा आकडा आठ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि यापैकी 10% रुग्ण ही लहान मुले असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

म्युटेशन आणि व्हेरिएंट्स म्हणजे काय?

म्युटेशन म्हणजे विषाणूच्या मूलभूत जीनोमिक संरचनेत बदल. हा बदल व्हायरसला केवळ एक नवीन रूप देतो, ज्यास व्हेरिएंट म्हणतात. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, व्हायरसमध्ये बदल होणे सामान्य आहे. जसजसा विषाणू पसरले, एका व्यक्तीतून दुस-या व्यक्तीत पोहोचेपर्यंत त्यात बदल होईल.

तर महामारी तज्ज्ञ चंद्रकांत लहरिया म्हणतात की, हे शब्दलेखनाच्या चुकीसारखे आहे. औषधे आणि अँटीबॉडीजपासून बचाव करण्यासाठी व्हायरसमध्ये हा बदल होतो. हे स्वाभाविक आहे. परंतु जर साथीच्या रोगामध्ये व्हायरसला थांबवायचे असेल तर आपण त्यापेक्षा दोन पाऊल पुढे जाणे आवश्यक आहे. यासाठी त्यात होणा-या प्रत्येक बदलांवर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे.

हा डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय आहे?

 • भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्युटेंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा असे नाव दिले आहे. B.1.617.2 मध्ये K417N हे आणखी एक म्युटेशन झाले आहे. जे यापूर्वी कोरोना व्हायरसच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटसमध्ये आढळले होते. नवीन म्युटेशननंतर तयार झालेल्या व्हेरिएंटला डेल्टा + व्हेरियंट किंवा AY. 1 किंवा B.1.617.2.1 म्हटले जात आहे.
 • K417N म्युटेशन असलेले हे व्हेरिएंट्स मूळ विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहेत. लस आणि औषधांचा प्रभाव कमकुवत करू शकतात. वास्तविक, B.1.617 वशांपासूनच डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आले आहे. त्याच वंशाची आणखी दोन रूपे आहेत- B.1.617.1 आणि B.1.617.3, ज्यामध्ये B.1.617.1 ला WHO ने व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (VOI) या यादीत ठेवले असून त्याला कप्पा नाव दिले आहे.

डेल्टा-प्लस व्हेरिएंटची किती प्रकरणे भारतात आढळली आहेत?

 • आतापर्यंत डेल्टा-प्लस व्हेरिएंटमधून संक्रमणाच्या 7 घटनांची पुष्टी झाली आहे. 5 भारतीय प्रयोगशाळांनी मे आणि जूनमध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लूएंझा डेटा (GISAID) कडे या व्हेरिएंटची सूचना दिली आहे. भारतात 28 हजारांहून अधिक कोरोनाव्हायरसच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग झाली आहे.
 • परंतु नोंदवलेल्या प्रकरणांच्या संख्येनुसार, हे व्हेरिएंट किती प्रभावी आहे हे समजणे कठीण आहे. किती नमुन्यांची सिक्वेन्सिंग केली गेली आहे, त्याच्या संख्येवर देखील हे अवलंबून असते. यूकेमध्ये 4.66 लाख नमुन्यांची सिक्वेन्सिंग करण्यात आली आणि 45 मध्ये AY.1 आढळले. त्याचप्रमाणे अमेरिकेत 5.49 लाख नमुन्यांपैकी 12 प्रकरणांमध्ये याची पुष्टी झाली आहे. त्या तुलनेत भारतात केवळ 5% (28 हजार) नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे.

डेल्टा-प्लस व्हेरिएंटबद्दल काळजी करण्याची काही गरज आहे का?

 • याक्षणी नाही. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणतात की, आतापर्यंत डेल्टा-प्लस व्हेरिएंट भारतात व्हेरिएंट ऑफ कंसर्न बनला नाहीये. शिवाय डब्ल्यूएचओने व्हीओसीच्या यादीमध्ये त्याला समाविष्ट केलेले नाही. भारतात केवळ तो आढळून आला आहे. त्याच आधारावर याची नोंद ग्लोबल डेटा सिस्टमला केली गेली आहे.
 • परंतु दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी गेल्या आठवड्यात एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, आपण या विषाणुकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. व्हायरसचे रुप बदलत चालले आहे, हे आपण समजले पाहिजे. हा विषाणू जिवंत राहून जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करु शकतो. यूकेकडून आपण धडे घेतले पाहिजेत, जिथे अनलॉक होताच नवीन प्रकरणे समोर येत आहेत. डेल्टा व्हेरिएंट आणि त्याचे नवीन रुप लोकांवर परिणाम करत आहे. काळजी घेतली गेली नाही तर डेल्टा प्लस व्हेरिएंट आपल्यासाठीही चिंतेचे कारण बनू शकतो. त्यामुळे भारताने यूकेकडून धडा घ्यायला हवा.

तर हे भविष्यात चिंता करण्याचे कारण असू शकते?

 • होय. डेल्टा व्हेरिएंटमुळे आपल्याला अलीकडेच कोरोनाच्या जीवघेण्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला आहे. हळूहळू ही लाट ओसरत असून प्रकरणे कमी होत आहेत, परंतु फेब्रुवारीच्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्याला जुलैचा दुसरा आठवडा लागू शकतो. मे अखेरीपर्यंत गोळा करण्यात आलेल्या 21 हजार कम्युनिटी सॅम्पलपैकी 33% मध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. हा व्हेरिएंट​​​​​​​ फार्म कंपन्यांनी ज्या स्ट्रेनविरोधात व्हॅक्सिन तयार केली आहे, त्यापेक्षा वेगळा आहे. चाचण्या कराव्या लागतील जेणेकरुन हे कळू शकेल की ही लस नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे.
 • यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये ही लस प्रभावी असल्याचे दिसले आहे. परंतु डेल्टासारख्या व्हेरिएंटविरुद्ध जेव्हा चाचणी केली गेली, तेव्हा काहीच अँटीबॉडी तयार करण्यात ही लस यशस्वी ठरली. आता डेल्टा व्हेरिएंट्सची अनेक नवीन रूपे समोर आली आहेत आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हे भारतासह अनेक देशांमध्ये प्रमुख व्हेरिएंट म्हणून समोर येत आहे. पुढे जाऊन भारतातील साथीचे व्यवस्थापन करण्यासाठी हे एक आव्हान बनू शकते.

भारतीय लस या व्हेरिएंट्सविरुद्ध प्रभावी आहे का?

 • होय, काही प्रमाणात. भारतात ICMR-NIV (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) आणि CSIR-CCMB (सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी, हैदराबाद) यांनी हा अभ्यास केला आहे. यामध्ये डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा प्रभाव तपासण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परिणाम असे दर्शवित आहेत की, व्हेरिएंटविरुद्ध अँडीबॉडी तयार होत आहेत. पण मूळ​​​​​​​ कोरोनाव्हायरसच्या विरूद्ध तयार होणा-या अँडीबॉडीच्या तुलनेत ते कमी आहेत.
 • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अँडीबॉडीची पातळी कधीही इम्युनिटीचे एकमेव मार्कर नसते. डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे विषाणू वेगाने पसरत असल्याचा पुरावाही कमी आहे. या कारणास्तव, WHO ने सध्या ते​​​​​​​ व्हेरिएंट्स ऑफ कंसर्न (VOC) च्या यादीमध्ये त्याला ठेवले नाही.
 • इंग्लंडमध्ये जे 36 डेल्टा-प्लस रूग्ण आढळले आहेत, त्यापैकी 18 जणांनी ही लस घेतली नव्हती. तर केवळ दोन जणांनीच लसीचे दोन्ही डोस घेतले होते. सुदैवाने या 36 प्रकरणात कुणाचाही मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे, डेल्टा-प्लस प्रकरणांमध्ये, केवळ दोनच रुग्ण 60+ होते. म्हणजेच, बहुतेक प्रकरणे 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींची आहेत.

डेल्टा-प्लस व्हेरिएंटवर अस्तित्वात असलेली औषधे प्रभावी आहेत का?

 • डेल्टा प्लसमध्ये उपस्थित K417N म्युटेशनमुळे औषधांच्या प्रभावीपणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. CSIR-IGIB ( इन्स्टिट्यूट ऑफ जीनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी) च्या डेटाबेसनुसार, हे म्युटेशन नुकत्याच विकसित झालेल्या मोनोक्लोनल अँटीबॉडी ट्रीटमेंट ड्रग - कासिरिविमाब आणि इम्देविमाब विरूद्ध प्रतिकार करत आहे.
 • हे नवीन औषध ज्यांना मध्यम आणि गंभीर लक्षणे आहेत, अशा हाय रिस्क असलेल्या रुग्णांना दिले जात आहे. भारतात या औषधांचे मार्केटिंग रोश आणि सिप्ला करीत आहेत आणि त्यांना केंद्रीय औषध​​​​​​​ मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मान्यता दिली आहे. या औषधाच्या एकाच डोसची किंमत (1200 मिलीग्राम - 600 मिलीग्राम कासिरिविमाब आणि 600 मिलीग्राम इम्देविमाबचा एकत्रित डोस) तब्बल 59,750 रुपये आहे.
बातम्या आणखी आहेत...