आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोरोनामुळे गर्भवती महिलांना किती आणि कसा आहे धोका, जाणून घ्या जर तुम्ही गर्भवती असाल तर काय खबरदारी घ्यायला हवी

इंद्रभूषण मिश्रएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घेऊयात, गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी -

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत गर्भवती महिलांमध्ये संसर्ग वाढला आहे. यामुळे बरेच अंदाज वर्तवले जात आहेत. सामान्य महिलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे म्हटले जात आहे. आम्ही कोरोना काळात गर्भवती महिलांना होणा-या त्रासाविषयी राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रांची (आरआयएमएस)च्या सीनिअर रेजिडेंट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. दिव्या यांच्याशी बातचीत केली. जाणून घेऊयात, गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी -

 • सामान्य महिलांपेक्षा गर्भवती महिलांमध्ये कोरोना होण्याची शक्यता अधिक असते का?

गर्भवती महिलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अमेरिकेच्या काही संस्थांनी यावर संशोधन केले आहे. त्यातून सामान्य स्त्रियांना संसर्गाचा जेवढा धोका आहे, तितकाच तो गर्भवती महिलांना देखील आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. दोन्हीमध्ये इन्फेक्शन रेट समान आहे, परंतु गर्भवती महिलांमध्ये संसर्ग गंभीर होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण म्हणजे गर्भधारणेदरम्यान, त्यांच्या शरीरात बरेच बदल होतात. त्यांची प्रतिकारशक्ती देखील थोडी कमकुवत होते.

 • कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्भवती महिलांनी काय करावे?
 1. घराबाहेर गर्दीत जाऊ नका.
 2. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्याचे टाळा.
 3. आवश्यक नसल्यास रुग्णालयात जाणे टाळा.
 4. ऑक्सिमीटर, पल्स मीटर आणि थर्मामीटर आपल्या जवळ बाळगा. आणि मॉनिटरिंग करत राहा.
 5. गर्भधारणेदरम्यान होणा-या नियमित तपासणी व चाचण्या नक्की करा.
 6. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्दी आणि तापाची औषधे आपल्याजवळ ठेवा.
 7. वेळोवेळी फोनवर स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
 8. जर आपल्याला उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसन रोग असेल तर विशेष काळजी घ्या.
 9. योग्य आहार घ्या, नियमितपणे योगा आणि वॉकिंग करा.
 • कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलांमध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका जास्त आहे का?

याबद्दलही संशोधन झाले आहे. कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलांना सामान्य महिलांपेक्षा जास्त त्रास होतो. एका वर्षात ज्या केसेस समोर आल्या आहेत, त्यामध्ये 25 ते 30% महिलांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. सोबतच सिम्प्टोमेटिक कोविडच्या बाबतीत रिस्क फॅक्टरसुद्धा दोन ते तीन पट जास्त आहे. तसेच, ज्या स्त्रियांना आधीच रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास आहे अशा स्त्रियांमध्ये, कोविड असताना प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता अधिक वाढते.

 • कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलांनी कोणती खबरदारी घ्यावी?
 1. प्रथम एका खोलीत स्वत:ला आयसोलेट करा. आवश्यक वस्तू वेगळ्या ठेवा.
 2. लक्षणे सौम्य असल्यास, घरीच राहून उपचार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 3. अत्यंत महत्वाचे असेल तेव्हाच रुग्णालयात जावे.
 4. योग्य आहार, नियमित वैद्यकीय सल्ला आणि औषधे घ्यावी.
 5. पल्स रेट सकाळी आणि संध्याकाळी मॉनिटर करत राहावे.
 6. आपल्या खोलीत फेरफटका मारा. पलंगावर सतत झोपून राहू नका.
 7. जर कोणत्याही प्रकारची समस्या, अधिक ताप, रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काम करा.
 • गर्भवती महिलांना लसी द्यावी का?

बरेच लोक असे म्हणतात की, गर्भवती महिलांनी लस घेऊ नये. रुबेलासारखी लस गर्भवती महिलांना दिली जात नाही. परंतु, कोविड व्हॅक्सिनविषयी अद्याप कोणत्याही दुष्परिणामांचे रिपोर्ट आलेले नाहीत. अलीकडेच Centers for Disease Control and Prevention (CDC)ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गर्भवती महिलांमध्ये लसीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. म्हणजेच जोखीम घटकांपेक्षा फायदा जास्त होतो. म्हणून लस घ्यावी.

होय, पण जर मनात शंका असेल तर पहिल्या तीन महिन्यांत लस घेणे टाळता येऊ शकते, कारण तोपर्यंत बाळाचे बहुतेक भाग विकसित झाले असतात. अशा वेळी रिस्क फॅक्टर कमी होतो.

 • मासिक पाळीच्या काळात लस घ्यावी का? रोग प्रतिकारशक्ती किंवा प्रजननक्षमतेवर याचा काही परिणाम होईल का?

नक्कीच याकाळात लस घेता येते. मासिक पाळीच्या काळात लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे अद्याप समोर आलेले नाहीत. शिवाय रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होणे किंवा वंध्यत्व वाढणे, हे सायंटिफिक नाही. अशा दाव्यांना कोणताही आधार नाहीये.

बातम्या आणखी आहेत...