आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Fever Symptoms And Older Adults; COVID Fever Ke Lakshan | Pulse Oximeters Useful For Elderly

आजी-आजोबांसाठी महत्त्वाची बातमी:कोरोनाची लागण झाल्यानंतर 30% ज्येष्ठांना ताप येत नाही, ऑक्सिमीटरने करा प्राथमिक तपासणी, तरीही सावधगिरी बाळगणे गरजेचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृद्धांमध्ये टेम्परेचर नव्हे तर ऑक्सिमीटरचा वापर अधिक प्रभावी आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ताप येणे हे त्याचे प्राथमिक लक्षण मानले जाते. मात्र तरीही सावध व्हा! वृद्धांमध्ये ताप हे कोरोनाचे प्राथमिक लक्षण असल्याचे दिसून येत नाहीये. त्यामुळे कोरोना संक्रमित असूनही, वृद्धांमध्ये त्याची लक्षणे ओळखणे कठीण आहे. हे केवळ त्यांच्या जीवासाठी धोकादायकच नाही तर यामुळे कुटुंबातील इतर सदस्यदेखील संक्रमित होण्याची शक्यता अधिक आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कोरोनावरील नव्या संशोधनानुसार, वृद्धांमध्ये टेम्परेचर नव्हे तर ऑक्सिमीटरचा वापर अधिक प्रभावी आहे.

फ्रंटियर्स इन मेडिसिन या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा पेपर वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कॅथरीन वान सोन आणि डेबोरा इति यांनी लिहिला आहे. त्यांच्या मते, वृद्धांच्या बाबतीत बेस-लाइन तापमान कमी होते. शरीराचे तापमान बेसलाइनपेक्षा जास्त असल्यास ताप असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) च्या परिभाषानुसार, 100.4 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असेल तेव्हाच ताप मानला जातो.

संशोधन पेपरनुसार, कोरोनाची लागण झालेल्या गंभीर वृद्ध रुग्णांमध्ये 30% लोकांना अजिबात ताप नव्हता किंवा खूप कमी ताप होता. अशा परिस्थितीत, थकवा, शारीरिक वेदना, वास आणि चव घेण्याची क्षमता कमी होणे यासारखी लक्षणे वाढत्या वयाचा परिणाम म्हणून कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले गेले.

अनेक रुग्णांना हायपोक्सियामुळेही अस्वस्थ वाटले नाही
त्याचप्रमाणे ऑक्सिजनची पातळी 90% पेक्षा कमी असतानाही कोरोनातील बर्‍याच रूग्णांमध्ये श्वसनाच्या त्रासाची लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे अशा लोकांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे ओळखणे कठीण होते.

या दोन्ही प्रकरणांकडे पाहताना, रिसर्च पेपरमध्ये शास्त्रज्ञांनी वृद्धांच्या बाबतीत तापाऐवजी ऑक्सिमीटरने हायपोक्सिया ओळखून कोरोनाचे लक्षण म्हणून विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोरोनाची पुष्टी केली जाऊ शकते.

यूएस अन्न व औषध प्रशासन (USFDA) चा इशारा…

ऑक्सिमीटरचे रिडींग असे समजा

  • ऑक्सिमीटरचे सद्य रिडींग मागील रिडींगपेक्षा कमी तर होत नाहीये ना याकडे लक्ष द्या.
  • कोणत्याही एका रिडींगऐवजी सतत घेतल्या जाणार्‍या रिडींगचा ट्रेंड परिस्थिती दर्शवितो.
  • ऑक्सिजनच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी केवळ ऑक्सिमीटरवर अवलंबून राहू नका.
बातम्या आणखी आहेत...