आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:कोरोनातून रिकव्हरी दरम्यान रक्तात गाठी झाल्यामुळे येत आहेत हार्टअटॅक, हृदय रुग्णांना जास्त त्रास, जाणून घ्या सर्वकाही

2 वर्षांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
  • कॉपी लिंक

कोविड -19 विरुद्ध संघर्ष करणार्‍या लोकांना नवीन प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोनामधून रिकव्हर झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांना हृदयाचे आजार होत आहेत. कार्डियाक अरेस्ट व हार्टअटॅकने मृत्यू होत आहेत. आरोग्य तज्ञ सांगतात की, कोरोनाच्या उपचारादरम्यान बरीच औषधे दिली जात आहेत, ज्यामुळे रक्ताच्या गाठी होऊ शकतात. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही, कारण प्रत्येकासोबत असे होत नाही. रिकव्हरी दरम्यान खबरदारी घेतल्यास रुग्णाच्या जीवाला धोका राहत नाही.

काही अभ्यासांनुसार, ज्या लोकांना आधीच हृदय रोग किंवा मधुमेह आहे अशा केवळ 15-20 टक्के लोकांना त्रास होत आहे. त्यापैकी 5% लोकांना हार्टअटॅक येण्याचा धोका आहे. परंतु सर्वात जास्त नुकसान तरूणांचे होत आहे, ज्यांना पूर्वी हृदयाशी संबधित कोणताही आजार नसेल किंवा लक्षणे दिसून न आल्यामुळे या आजाराची जाणीवच झाली नसेल. कोरोना संसर्गातून बरे होण्याच्या काळात उद्भवणाऱ्या या लक्षणांना समजून घेण्यासाठी आणि वेळेवर उपचार करण्यासाठी आम्ही दिल्लीतील द्वारका स्थित मणिपाल हॉस्पिटलचे चीफ ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस, कार्डियाक सायन्सचे प्रमुख डॉ. वायके मिश्रा यांच्याशी चर्चा केली.

जाणून घ्या, कोविड-19 आणि हृदयविकारांमधील संबंध काय आहे...

कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही लोकांना हृदयरोगाचा सामना करावा लागत आहे?

  • होय. कोविड-19 ची प्राणघातक दुसरी लाट तरुणांवर अधिक परिणाम करीत आहे आणि काही रुग्णांना हृदयविकाराचा कोणताही आजार नसतानाही हार्टअटॅक आल्याची प्रकरणे घडली आहेत. तरुण रूग्णांमध्ये, फुफ्फुसातील एलेमा (फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त द्रव) यामुळे ही प्रकरणे उद्भवतात. यामुळे श्वास घेण्यात अडचण येते आणि रेस्पिरेटरी ऑर्गन काम करणे थांबवतात.
  • त्याचप्रमाणे तीव्र मायोकार्डिटिसचा धोका वाढतो, जो हृदयाच्या स्नायूमध्ये होणारी सूज आहे. या प्रकरणात रुग्णाच्या जगण्याची शक्यता फार कमी होते. ज्या रुग्णांना आधीच हृदयविकार आहे त्यांच्यामध्ये कोविड-19 मधून रिकव्हर झाल्यानंतर हृदयात सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता वाढते.

छाती दुखणे हे कोविड-19शी संबंधित हृदयविकाराचे लक्षण आहे का?

  • होय. कोरोना ग्रस्त रूग्णांमध्ये छातीत दुखणे ही आता सामान्य तक्रार झाली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, तेसुद्धा छातीत दुखल्याचे सांगत आहेत. वास्तविक, हे समजून घेतले पाहिजे की कोविड संसर्ग वेगवेगळ्या लोकांमध्ये भिन्न असतो. सौम्य, मध्यम किंवा तीव्र.
  • वास्तविक, कोविड संसर्गामुळे फुफ्फुसात सूज येऊ शकते, ज्याचा हृदयावर देखील परिणाम होतो. ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या धमन्या (आर्टरी)मध्ये ब्लॉकेज हार्टअटॅकपर्यंत जाऊ शकतो.
  • कोविडग्रस्त रुग्णांना अशाप्रकारच्या तीव्र वेदना होऊ शकतात. यामागचे कारण सूजही असू शकते. काही प्रकरणांमध्ये यामुळे श्वास घेण्यासदेखील त्रास होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिसणारी ही सामान्य समस्या आहे. फुफ्फुसातील फायब्रोसिस, ज्यामुळे ऑक्सिजन सॅच्युरेशनवर परिणाम होतो.

कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयाशी संबंधित विकार कसे ओळखावे?

  • कोरोनामधून रिकव्हर होताना अनेक लक्षणे रिपोर्ट करण्यात आली आहेत. असे होण्याची अनेक कारणे असू शकतात. इतर कोणत्याही गंभीर आजाराप्रमाणेच कोरोनानंतर थकवा येणे हे एक सामान्य लक्षण आहे. लोकांना श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो, छातीत दुखणे, भीती वाटणे असेही घडू शकते
  • या सर्व समस्या हृदयरोगाशी संबंधित असू शकतात. परंतु फार गंभीर आजारी पडल्यानंतरचे इफेक्ट्स, बराच काळ निष्क्रिय राहणे आणि बरेच आठवडे अंथरुणावर झोपणे हे कारण देखील असू शकते. कोरोना रुग्णांना थरथरणे, अशक्तपणा येणे, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास अडचण येते असेल तर हे हृदयरोगाचे लक्षण असू शकतात.

कोरोनानंतर ह्रदयाशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास काय करावे?

  • लक्षणे गंभीर असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः श्वसनाच्या बाबतीत. श्वास घेताना होणारी अडचण नेहमीच गंभीर समस्येचे लक्षण नसते, परंतु ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी 90% पेक्षा कमी असणे चिंतेचे कारण आहे. फुफ्फुसांमध्ये सूज असल्यास छाती दुखू शकते. छातीत अचानक आणि तीक्ष्ण वेदना देखील फुफ्फुसातील रक्ताच्या गाठी (फुफ्फुसीय एम्बोलिझम) मुळे असू शकतात.

बातम्या आणखी आहेत...