आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत संपूर्ण जगाला माहिती झाले आहे की, 90% कोरोना रुग्ण घरात राहून ठीक होत आहेत. त्या रुग्णांना ना ऑक्सिजनची गरज ना रुग्णालयात भरती होण्याची गरज. पण, जे लोक घरात होम आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, त्यांचे होम आयसोलेशन कधी संपेल..?
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना पडत असलेल्या प्रश्नांबाबत आम्ही भोपाळमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. तेजप्रताप तोमर आणि डॉ. पूनम चंदानी यांच्याशी बातचीत केली.
होम आयसोलेशनचा अर्थ काय ? याचा सल्ला कुणाला दिला जातो ?
जर एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे दिसत असतील, किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल, तर अशा लोकांना आम्ही टेस्ट करण्याचा सल्ला देतो. जोपर्यंत त्याचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत त्याला आम्ही विलगीकरणात राहण्याचा सल्ला देतो. रिपोर्ट आल्यानंतर त्या आधारे डॉक्टर त्या रुग्णावर उपचार करतात. जर त्या व्यक्ती मध्ये सौम्य लक्षणे असतील, तर त्याला घरात राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. घरात राहूनही त्याला घरातील इतर सदस्यांपासून वेगळे राहण्यास सांगितले जाते. यालाच होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईन म्हटले जाते.
होम आयसोलेशन कधी बंद करावे ?
सामान्यतः रुग्णाला 14-17 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. पण, हेदेखील त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. पण, असे समजा की, लक्षण असल्यावर 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. ज्यांच्या शरीरात कोणतेही लक्षण दिसत नाहीये, अशा लोकांचे होम आयसोलेशन 10 दिवसांत संपवू शकते. पण, याचा निर्णय तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारुन घ्यावा.
आयसोलेशन संपवण्यासाठी निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट गरजेची आहे ?
नाही. काही ठराविक परिस्थितींमध्ये 24 तासांच्या आत दोन RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशन संपवता येते. पण, 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर टेस्टशिवाय आयसोलेशन संपवता येते. आयसोलेशनचा काळ 14 दिवसांचा असावा. कारण जाणकार सांगतात की, व्हायरसची सायकल 14 दिवसांची आहे आणि इतक्या दिवसात व्हायरस मरुन जातो.
आयसोलेशन संपल्यानंतरही व्हायरस पसरू शकतो ?
हो. तुम्ही नियमांचे पालन केले नाही आणि वेळेपूर्वीच आयसोलेशन संपवले, तर तुमच्यातला व्हायरस इतरांमध्ये पसरू शकतो. खरत एका ठराविक वेळेनंतर शरीरातील व्हायरस नष्य होतो, पण सुरक्षा म्हणून डॉक्टर रुग्णांना सात दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देतात. रुग्णाने मास्क घालणे, स्वच्छतेचे पालन करणे इत्यादी खबरदारीचे उपाय केले जावेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लोकांमध्ये कधी मिसळू शकतो ?
रुग्णाच्या शरीरात कुठलेही लक्षण दिसत नसेल, तर तो काही दिवस आराम करुन लोकांमध्ये मिसळू शकतो. पण, ठीक झाल्यानंतरही डॉक्टर काही दिवस आराम करण्याचा सल्ला देतात.
तुमच्या घरात कोरोना संक्रमित रुग्ण असेल, तर तुम्ही काय करावे ?
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीची देखभाल करणे गरजेचे आहे. रुग्णशी संबंधित काही काम करताना इतर व्यक्तींनी मास्क, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटाइजरचा वापर करावा. इतर व्यक्तींमध्ये कुठलेही लक्षण दिसत असेल, तर त्याने तात्काळ आयसोलेट व्हावे किंवा टेस्ट करुन घ्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.