आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Home Testing Kit; Fayde Nuksan, How Does Self Testing Work And Why Is Important For India?

एक्सप्लेनर:घरबसल्या कोरोना चाचणीसाठी होम टेस्ट किट; जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे-तोटे आणि सोबतच भारतात किती आहे याची आवश्यकता

आबिद खानएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या होम टेस्टिंग किट म्हणजे काय? आणि यासह या किटविषयी बरंच काही...

नोव्हेंबर 2020 मध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (US - FDA) घरच्या घरी कोरोनाची चाचणी करणा-या किटला मंजुरी दिली होती.त्यावेळी कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये वेग आला होता. लोकांना घरबसल्या कोरोना टेस्टची सुविधा मिळावी यासाठी सरकारने होम टेस्ट किटला परवानगी दिली होती.

भारतातही भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत दररोज तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीत चर्चा सुरू आहेत. कोरोना टास्क फोर्सनेही देशात लॉकडाउनची शिफारस केली आहे. एकुण रुग्णसंख्येत भारत केवळ अमेरिकेच्या मागे आहे. अशा परिस्थितीत ही होम टेस्ट किट भारतासाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते.

चला तर मग जाणून घेऊयात ही टेस्ट किट आहे तरी काय? त्याचे फायदे काय आहेत? कोरोनाचा विळखा तोडण्यासाठी ही किट भारतात किती मदतशीर ठरु शकते?

 • होम टेस्टिंग किट म्हणजे काय?

कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपल्याला रॅपिड अँटीजन किंवा RT-PCR या चाचण्या कराव्या लागतात. या सर्व चाचण्यांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि लॅब आवश्यक आहेत. कोरोनाची होम टेस्ट किट हा एक सोपा पर्याय आहे. हे प्रेग्नन्सी टेस्ट किटसारखे आहे. याच्या मदतीने, कुणीही व्यक्ती कोणत्याही लॅब किंवा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीशिवाय घरबसल्या कोरोना टेस्ट करु शकते.

 • ही किट कसे कार्य करते?

ही टेस्ट किट लेटरल फ्लो टेस्टवर कार्य करते. आपण आपल्या नाकातून किंवा घशातून घेतलेले सँपल या ट्यूबमध्ये ठेवला. ही ट्युब आधीपासूनच लिक्विडने भरलेली असते. ही ट्युब किटच्या आत घातली जाते जेथे लिक्विड शोषक पॅड लावला असतो. या पॅडद्वारे, लिक्विड एका पट्टीवर जाते, जिथे आधीपासूनच कोरोना व्हायरसचे स्पाइक प्रोटिन ओळखणारे अँटीबॉडीज असतात. जर तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल तर या अँटीबॉडीज सक्रिय होतात आणि किट आपली चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दर्शवते. किटवर एक डिस्पेल आहे जिथे चाचणीचा निकाल दर्शवला जातो. रिपोर्ट तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा टेस्ट किट बनवणार्‍या कंपनीच्या अ‍ॅपवर देखील बघता येऊ शकतो.

 • या किटचे काय फायदे आहेत?
 1. घरबसल्या टेस्ट होईल. यामुळे लोकांना टेस्ट करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही आणि त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होईल.
 2. ही टेस्ट किट आरटी-पीसीआर किंवा इतर कोणत्याही चाचणीपेक्षा स्वस्त आहे.
 3. ही टेस्ट स्वतःच केली जाऊ शकते. वैद्यकीय तज्ज्ञ किंवा लॅबची आवश्यकता नाही.
 4. टेस्टचा रिपोर्ट 15 मिनिटे ते अर्धा तासात उपलब्ध होतो. लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी किमान 1 दिवसाचा कालावधी लागतो.
 • या किटचे तोटे काय आहेत?
 1. घरी टेस्ट केल्याने संक्रमित रुग्णांच्या डेटाचे परीक्षण करणे अवघड होईल. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह येईल ते भीतीपोटी योग्य माहिती देणार नाहीत.
 2. वैद्यकीय तज्ज्ञांच्या तुलनेत स्वत:हून सँपल घेण्यास अडथळा येण्याची शक्यता आहे, ज्याचा टेस्टच्या रिझल्टवर देखील परिणाम होईल.
 3. होम टेस्ट किटची अचूकता लॅबमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांपेक्षा कमी आहे. यामुळे चुकीचे निकाल येण्याची शक्यता जास्त आहे.
 4. जर एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या टेस्टचा रिझल्ट चुकून निगेटिव्ह आला तर तो घरातील इतर सदस्यांनाही संक्रमित करू शकतो.
 • या किटचे परिणाम किती अचूक आहेत?

लॅबमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत होम टेस्ट किटच्या निकालांची अचूकता 20% ते 30% कमी असल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या पद्धतीने नमुना घेतल्यास, संसर्ग झाल्यानंतर 1-2 दिवसांच्या आत टेस्ट केल्यास निगेटिव्ह रिपोर्ट देखील येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते जर दोन्ही चाचण्या करण्याची पद्धत एकसारखी असली तरीही त्यांच्या निकालाच्या अचुकतेत फरक अधिक आहे.

 • या किट्सची आवश्यकता का होती?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढतेय, तर दुसरीकडे डॉक्टर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या एका मोठ्या टीमची गरज असते. अशा परिस्थितीत, जर कोरोनाची स्वतःच टेस्ट घेतली गेली तर वैद्यकीय तज्ज्ञांवर अवलंबून राहणे कमी होईल आणि ते इतर दुस-या कामात सक्रीय होऊ शकतील.

तसेच, कोणतीही चाचणी करण्यासाठी, व्यक्तीला रुग्णालयात किंवा लॅबच्या ठिकाणी जावे लागते. संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता ते सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत, जर घरच्या घरी टेस्ट करता आली तर संसर्ग पसरवण्याची गतीही कमी होईल.

 • हे किट भारतात उपलब्ध आहे का?

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने 27 एप्रिल रोजी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. त्यात म्हटले आहे की, अमेरिका, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अन्य 5 देशांनी ज्या किटच्या वापरला परवानगी दिली आहे, त्यांचा वापर भारतात केला जाऊ शकतो. त्यांना आयसीएमआरकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त, आयसीएमआरने या कंपन्यांना असेही सांगितले आहे की, चाचण्यांच्या निकालांवर नजर ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा अ‍ॅ​​​​​​पमधील सर्व डेटा कोरोनाच्या मध्यवर्ती पोर्टलवर जोडला गेला पाहिजे जेणेकरून रुग्णांच्या आकडेवारीत गडबड होणार नाही.

 • हे भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

संपूर्ण कोरोना संसर्गाच्या बाबतीत सध्या अमेरिकेनंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारचे लक्षही जास्तीत जास्त टेस्टिंगवर आहे, जेणेकरुन संक्रमित लोकांची नेमकी संख्या समोर येऊ शकेल. अशा होम टेस्ट किटमुळे चाचणी वाढेल तसेच टेस्ट सेंटरवरचा दबाव कमी होईल. सद्यस्थितीत, जे वैद्यकीय तज्ज्ञ कोरोना चाचणी घेण्यात गुंतले आहे त्यांची मदत इतर ठिकाणी घेतली जाऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...