आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:वर्षभरात भारतीयांनी इम्युनिटी बूस्टर औषधांवर खर्च केले तब्बल 15 हजार कोटी रुपये; जाणून घ्या ते काय आहे आणि आपल्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

रोग प्रतिकारशक्ती हा शब्द कोरोना काळात सर्वाधिक वापरला गेला आहे. इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती. आपल्या शरीराची ती शक्ती, जी आपल्याला कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देते. या कोरोनाच्या युगात, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोकांनी वेगवेगळे प्रयत्न सुरु केले आहेत.

काहींनी रोज व्यायाम करण्यास सुरवात केली तर काहींनी सकाळ आणि संध्याकाळी काढा पिण्यास सुरुवात केली. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स (एआयओसीडी) च्या अहवालात आणखी एक खुलासा झाला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 2020 मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भारतीयांनी व्हिटॅमिन सप्लीमेंट्स आणि इम्यूनिटी बुस्टर्सवर सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. हे वर्ष 2019 च्या तुलनेत जवळपास 5 पट जास्त आहे.

इम्युनिटी बूस्टर काय आहेत? त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत? कोरोनामुळे त्यांची विक्री कशी वाढविली आहे? चला जाणून घेऊयात...

इम्युनिटी बूस्टर काय आहेत?
इम्युनिटी बुस्टर म्हणजे ती औषधे जी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा करतात. यामध्ये मल्टी-व्हिटॅमिन, मिनरल्स, अमीनो अॅसिड आणि तत्सम इतर पौष्टिक घटकांचा समावेश आहे. ही औषधे आपल्याला टॅब्लेट, कॅप्सूल, लिक्विड किंवा पावडर स्वरूपात दिली जातात. या औषधांद्वारे आपल्याला व्हिटॅमिन, मिनरल्स, झिंक आणि इतर पोषक तत्व दिले जातात.

कोरोनाने या सप्लीमेंट्सची विक्री कशी वाढविली?
कोरोनामुळे संपूर्ण जगाने आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. लोकांनी त्यांच्या आरोग्याविषयी अधिक जागरुक झाले. कोरोनाचा प्रसार थेट शरीराच्या इम्युन सिस्टमशी संबंधित आहे. रोगप्रतिकारक शक्ती जेवढी कमकुवत, तेवढा विषाणूचा फैलाव होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लोकांनी ही औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि भीती या दोहोंमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या सप्लीमेंट्सची मागणी देखील वाढली आहे.

कोरोनाने फार्मा कंपन्यांची कमाई वाढवली

  • जून 2020 मध्ये ग्लेनमार्क फार्माने फेविपिरावीर हे अँटीव्हायरल औषध लाँच केले होते. कंपनीने गेल्या एक वर्षात केवळ या औषधातून 975 कोटी रुपये कमावले आहेत. या औषधासाठी एकूण 1220 कोटींची विक्री झाली आहे.
  • गेल्या एक वर्षात रेमडिसिविरची 899 कोटींची विक्री झाली आहे. सिप्लाने या औषधातून 309 कोटी आणि कॅडिलाने 215 कोटी रुपये कमवले आहेत.
  • अँटिबायोटिक औषध एझिथ्रोमाइसिनची 992 कोटी रुपयांची विक्री झाली. गेल्या एका वर्षात या औषधाच्या विक्रीत 38% वाढ झाली आहे.
  • रिव्हायटल आणि प्रोटीनेक्स या हेल्थ सप्लीमेंट औषधांच्या विक्रीतही 52% आणि 64% वाढ झाली आहे.

फार्मा कंपन्यांनी थेट इस्पितळात विकल्या गेलेल्या औषधांचा या अहवालात समावेश केलेला नाही. ते जोडल्यानंतर ही आकडेवारी जास्त असू शकते.

इम्युनिटी बूस्टर औषधांचा बाजार किती मोठा आहे?

फॉर्च्युन मॅगझिनच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये ग्लोबल इम्यून हेल्थ सप्लीमेंट मार्केट 1.47 लाख कोटींचे होते. 2028 पर्यंत हे 2.3 लाख कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. या काळात हे बाजार वार्षिक 6.6% दराने वाढू शकते. या औषधांची सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका आहे. जगभरात वापरल्या जाणार्‍या इम्युनिटी बूस्टर ड्रग्सचे 36 टक्के सेवन एकट्या उत्तर अमेरिकेतच होते.

कोरोनाच्या भीतीमुळे इतर कोणत्या उत्पादनांची विक्री वाढली?
आयुष मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढ्याचा वापर करण्यास सांगितले होते. कांतार या संशोधन कंपनीच्या अहवालानुसार 91% भारतीयांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये काढा किंवा रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे वापरली आहेत. यामुळे बाजारात रेडिमेड काढ्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. आयुर्वेदिक उत्पादने बनवणा-या हिमालय आणि डाबर सारख्या अनेक कंपन्यांनी या काळात मध, अश्वगंधा, गिलोय, च्यवनप्राशच्या विक्रीत वाढ नोंदविली आहे. 2019 मध्ये च्यवनप्राशच्या विक्रीत 5% घट झाली, तर 2020 मध्ये 132% इतकी वाढ झाली. केवळ एप्रिलमध्ये मध, ग्रीन टी, कडुनिंब, तुळशी-आधारित पेये आणि साबणांची विक्री 60 % वरून 157% वर गेली आहे.

आहारतज्ज्ञ डॉ. विनिता जयस्वाल यांनी सांगितले, या सप्लीमेंट्सचे तोटे काय आहेत आणि आपण आपली रोगप्रतिकार शक्ती कशी मजबूत करू शकता...

या सप्लीमेंट्सचे तोटे काय आहेत?
कोरोनाच्या भीतीपोटी लोकांनी सर्व प्रकारच्या इम्युनिटी बूस्टर औषधे घेतली. यामुळे शरीरात या औषधांचा ओव्हर डोस झाला आणि या औषधांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याऐवजी इतर आजार वाढवणे सुरू केले. या औषधांच्या ओव्हर डोसमुळे खाज सुटणे, निद्रानाश, नैराश्य आणि किडनी स्टोन देखील होऊ शकतात.

मल्टी व्हिटॅमिन हे बहुतांश वॉटर सॉल्युबल असतात, त्यांचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. वॉटर सॉल्युबल म्हणजे शरीराची गरज पूर्ण केल्यानंतर उर्वरित मल्टी व्हिटॅमिन मूत्रमार्गाने स्वतःहून शरीराबाहेर निघून जातात, मात्र जे मल्टीविटामिन पाण्यात विरघळणारे नसतात, ते शरीरात गोळा होतात आणि त्यामुळे टॉक्सिसिटी वाढते.

शरीराची रचना आणि शारीरिक हालचालींनुसार प्रत्येकाची प्रतिकारशक्ती आणि आहार भिन्न असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः इम्युनिटी बूस्टर औषधे घेतल्याने ते आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात.

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल?
प्रतिकारशक्ती संतुलन राखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहाराकडे लक्ष देणे. जास्त किंवा कमी खाऊ नका. तूप आणि तेलाचा वापर कमी करा. खाण्यातील गोड पदार्थांचा वापर कमीत कमी करा. सुका मेवा, हंगामी फळे आणि भाज्या आणि लिक्विड आहार घ्या.

यामुळे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कायम राहिल आणि तुम्हाला सप्लीमेंट्स घेण्याची आवश्यकता भासणार नाही. येथे लक्षात ठेवणारी गोष्ट अशी की, एक किंवा दोन दिवसात शरीराची प्रतिकारशक्ती सुधारू शकत नाही. हे थेट आपल्या आहार आणि जीवनशैलीशी संबंधित आहे. एखाद्या ओळखीच्या किंवा मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा गुगल सर्च करुन कोणतेही सप्लीमेंट्स घेऊ नका. डाएटिशियनचा सल्ला घ्या, त्या आधारेच सप्लीमेंट्स घ्यायला हवेत.

बातम्या आणखी आहेत...