आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus In Kid: How To Take Care Of Your Children In Coronavirus, Government Guidelines On What To Do After Your Child Gets Infected With Covid19

एक्सप्लेनर:लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल, लक्षणे आढळल्यास काय कराल? समजून घ्या, सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्स

18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
चिमुकल्यांना श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्यांची श्वासोच्छवासाची गती वाढते. एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो त्याला ब्रीदिंग रेट असे म्हटले जाते. टेबलानुसार, वयोगटानुसार ब्रीदिंग रेट देण्यात आला आहे. - Divya Marathi
चिमुकल्यांना श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्यांची श्वासोच्छवासाची गती वाढते. एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो त्याला ब्रीदिंग रेट असे म्हटले जाते. टेबलानुसार, वयोगटानुसार ब्रीदिंग रेट देण्यात आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. गेल्या काही दिवसांत कोरोनाने लहान मुलांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, कोरोना संक्रमितांमध्ये 12% रुग्णांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. अशात सरकारने कोरोनावर उपचारासाठी वेळोवेळी गाइडलाइन सुद्धा जारी केल्या.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना किती धोका यावर अजुनही वेग-वेगळी मते आहेत. काही तज्ज्ञ लहान मुलांना कोरोना झाल्यास घाबरू नये असे सल्ले देत आहेत. कोरोना झालेल्या बहुतांश लहान मुलांमध्ये लक्षणे सुद्धा दिसून आलेली नाहीत. काही मुलांना कोरोनाची हलक्या लक्षणांपासून गंभीर लक्षणे सुद्धा दिसून आली आहेत. त्यावर सुद्धा सरकारने गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोना कसा ओळखता येईल आणि काळजी कशी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. लहान मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर घरात उपचार करणे शक्य आहे.

लहान मुलांमध्ये कोणती लक्षणे असू शकतात? यावर आरोग्य मंत्रालयाने 4 टप्प्यात विभाजन केले आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाची विविध लक्षणे दिसून येत असल्याने त्यांची अशी विभागणी करण्यात आली आहे.

 1. अशी मुले ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.
 2. असे चिमुकले ज्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यात अडथळे, थकवा, अंगदुखी, सर्दी, घशात खव-खव, अपचन, स्वाद आणि वास न येणे इत्यादी.
 3. ज्यांना मध्यम लक्षणे आहेत. मध्यम लक्षणांमध्ये पोट आणि आतड्यांसंबंधित विकार होई शकतात. परिस्थिती बिघडल्यास त्यांना गंभीर लक्षणांत सुद्धा समाविष्ट करता येईल.
 4. गंभीर लक्षणे असलेली मुले. काही मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फलेमेटरी सिंड्रोम नावाची समस्या होऊ शकते. यात मुलांना 100 डिग्रीपेक्षा अधिक ताप असतो. हा सिंड्रोम SARS-CoV-2 शी संबंधित आहे.

हलकी लक्षणे असलेल्या मुलांची काळजी कशी घ्याल?

 • घरातच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ताप चेक करत राहावे. एक चार्ट तयार करा आणि ताप येण्याचे प्रमाण आणि वेळ नोंद ठेवा.
 • तापीसाठी पॅरासिटामोल देऊ शकता, घशात खव-ख किंवा सर्दीसाठी कोमट पाण्याच्या गुळण्या करायला लावाव्या.
 • पोट बिघडल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. अशात फळांचा रस आणि नारळ पाणी जास्तीत-जास्त द्या. आपल्याच मर्जीने अँटीबायोटिक देऊ नका.
 • अशा वेळी कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही.

मध्यम लक्षणे असलेल्या चिमुकल्यांची काळजी कशी घ्याल?

 • अशा मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल.
 • मुलांना पातळ जेवण द्यायला हवे. तान्ह्या मुलांसाठी आईचे दूधच उत्तम राहील.
 • मुले जेवत नसतील तर त्यांना पातळच खायला द्यावे.
 • ताप आल्यास पॅरासिटामोल देऊ शकता.
 • बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्यास एमोक्सिलिन दिले जाऊ शकते.
 • ऑक्सिजन लेव्हल घसरल्यास कृत्रिम ऑक्सिजनची देण्याची गरज राहील.
 • लक्षणे तशीच राहिल्यास कॉर्टिकोस्टरोइड्स दिले जाऊ शकतात.

गंभीर लक्षणे असल्यास उपचार कसे?

 • छातीचा एक्स रे, कंप्लीट ब्लड काउंट, यकृत आणि मूत्रपिंडाची तपासणी करावी.
 • यकृत आणि मूत्रपिंडात काही इन्फेक्शन असल्यास रेमडेसिविर दिले जाऊ शकते.

वजनानुसार दिला जातो डोस

 • यात 3.5 - 4 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 5 एमजी, त्यानंतर 4 दिवस 2.5 एमजी
 • 4-40 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 200 एमजी, नंतर 4 दिवस 100 एमजी
 • हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, फेविपिरावीर, आयवरमेक्टिन यांची गरज नाही

लहानग्यांमध्ये मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम काय?

भोपाळच्या कॅन्सर रुग्णालयात कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर पूनम चंदानी यांच्या मते, शरीरात वेग-वेगळ्या अवयांमध्ये अर्थात हार्ट, किडनी, लंग्स, डोळे, त्वचा, ब्रेन इत्यादींमध्ये इंफेक्शन होत आहे. त्यालाच मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम म्हटले जात आहे. यावर अजुनही संशोधन सुरू आहेत. त्यामुळे, याला अद्याप आजार घोषित करण्यात आलेले नाही.

कसा होतो मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम?
अद्याप या स्थितीवर मुबलक आकडेवारी किंवा माहिती उपलब्ध नाही. तरीही ज्यांना याची लागण झाली ते लहानगे कोरोना संक्रमित झालेले होते किंवा कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आले होते. सविस्तर संशोधन आणि डेटा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना कोरोना संक्रमितांपासून दूर ठेवलेलेच बरे. सोबतच, लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठ्यांनी लस घेणे आवश्यक बनले आहे.

बातम्या आणखी आहेत...