आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना व्हायरस नवनवीन व्हेरिएंटद्वारे विज्ञान आणि शास्त्रज्ञांना सतत नवीन आव्हान देत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या घटनांमध्ये आता कोरोनाचे नवे रुप असलेल्या कप्पा व्हेरिएंटची सात प्रकरणे देशात सापडली आहेत. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात ही प्रकरणे आढळली आहेत. डेल्टाप्रमाणेच कप्पा देखील कोरोना विषाणूचे डबल म्युटेशन आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमधील एसएमएस मेडिकल कॉलेज दिल्लीमधील एक लॅब आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे जीनोम सिक्वेंसिंगसाठी कोरोनाचे सकारात्मक नमुने पाठवले जातात. याअंतर्गत, दुस-या लाटेत 174 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 166 नमुने डेल्टा व्हेरिएंटचे आणि पाच कप्पा व्हेरिएंटचे असल्याचे आढळले होते.
त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये 109 नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये 107 नमुने डेल्टा प्लसचे आणि दोन नमुने कप्पा व्हेरिएंटचे होते. डेल्टा, डेल्टा प्लस आणि लँबडानंतर आता कप्पा नावाच्या या नवीन व्हेरिएंटमुळे म्हणजेच कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे लोकांची चिंता वाढली आहे.
चला तर मग जाणून घेऊया कप्पा व्हेरिएंटशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे ...
कप्पा व्हेरिएंट कोरोना विषाणूच्या डबल म्युटेंट व्हेरिएशन म्हणजे दोन बदलांनी बनला आहे. हे B.1.617.1 म्हणून देखील ओळखले जाते. विषाणूचे हे दोन म्युटेशन्स E484Q आणि L453R या वैज्ञानिक नावांनी ओळखले जातात.
कप्पा व्हेरिएंट हा कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, कप्पा व्हेरिएंट पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात आढळला होता. कप्पाव्यतिरिक्त, डेल्टा व्हेरिएंटदेखील प्रथम भारतात आढळला. डब्ल्यूएचओने 4 एप्रिल 2021 रोजी त्याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून घोषित केले होते.
डब्ल्यूएचओने कप्पा व्हेरिएंटला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' ऐवजी 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून घोषित केले आहे. डब्ल्यूएचओच्या कार्यकारी परिभाषेनुसार कोरोना विषाणूचे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट एक असे व्हेरिएंट असते, ज्याच्या जेनेटिक बदलाविषयी आधीपासूनच माहिती असते. म्हणजेच हा बदल सहसा नैसर्गिक असतो. याद्वारे हे विषाणूचा प्रसार, त्याद्वारे होणा-या रोगाची तीव्रता, मानवी रोगप्रतिकारक यंत्रणेत बिघाड करण्याची क्षमता किंवा चाचण्या व औषधांच्या मदतीने त्यावर मात करण्याची क्षमता इत्यादींविषयी माहिती असते.
डब्ल्यूएचओच्या वेबसाइटनुसार, हा व्हेरिएंट बहुतेक देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा कोरोना प्रकरणांच्या क्लस्टरिंगसाठी जबाबदार असू शकतो. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या या प्रकाराबद्दल (कप्पा) काळजी करण्याची गरज नाही. हा कोरोनाचा एक सामान्य प्रकार आहे आणि त्यावर उपचार शक्य आहेत.
नाव | पहिल्यांदा कुठे आढळला | पहिल्यांदा कधी मिळाला | व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित |
ईटा B.1.525 | अनेक देशांत | डिसेंबर 2020 | 17 मार्च 2021 |
आयोटा B.1.525 | अमेरिका | नोव्हेेंबर 2020 | 24 मार्च 2021 |
कप्पा B.1.617.1 | भारत | ऑक्टोबर 2020 | 4 एप्रिल 2021 |
लँबडा C.37 | पेरु | डिसेंबर 2020 | 14 जानेवारी 2021 |
कप्पा व्हेरिएंटमध्ये L453R म्युटेशन आहे. या व्हेरिएंटमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान होईल, असे म्हटले गेले आहे. परंतु याबद्दल अद्याप संशोधन चालू आहे आणि हा दावा सिद्ध करण्यासाठी किंवा तो खोडून काढण्यासाठी सध्या आकडे उपलब्ध नाहीत.
मात्र, आयसीएमआरने अलीकडेच म्हटले होते की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन कप्पा व्हेरिएंट विरूद्ध प्रभावी आहे. दुसरीकडे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनेही जूनमध्ये म्हटले आहे की, कोविशिल्ड देखील कप्पा व्हेरिएंटपासून संरक्षण करते. सध्या भारतातील बहुतेक लोकांना केवळ कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या इतर सर्व व्हेरिएंटप्रमाणेच, कप्पा व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ करणे या नियमांचे काळजीपूर्वक पालन केले पाहिजे.
महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि शक्य तितक्या लवकर कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या.
प्रसिद्ध सायन्स मॅग्झिनमध्ये प्रकाशित झालेल्या फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूटच्या नवीन संशोधनानुसार कोरोना लसीचा एकच डोस सहसा व्हायरसच्या बीटा आणि डेल्टा प्रकारांवर परिणाम करत नाही.
हे संशोधन अॅस्ट्राजेनेका आणि फायझर-बायोटेक लस घेतलेल्यांवर केले गेले. भारतात अॅस्ट्राजेनेका लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे कोविशिल्ड या नावाने तयार केली जात आहे.
संशोधनानुसार, एकच डोस घेतलेल्या केवळ 10% लोक अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटला पराभूत करु शकले. तर, या दोनपैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतलेले 95% लोक डेल्टा आणि बीटा व्हेरिएंटवर मात करु शकले आहेत. कप्पा देखील डेल्टासारखा डबल म्युटंट आहे, म्हणजेच या व्हेरिएंटने स्वतःमध्ये दोन बदल केले आहेत. अशा परिस्थितीत असे म्हटले जाऊ शकते की, कोरोना लसीचा एक डोस कप्पावर फारसा प्रभावी होणार नाही. म्हणूनच लोकांनी लसीचे शक्य तितक्या लवकर दोन्ही डोस देणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.