आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Made In China Wuhan Lab; US China News | Joe Biden On Coronavirus Virus Origin Investigation And Lab Leak Theory

दिव्य मराठी एक्सप्लेनर:अमेरिकेच्या निशाण्यावर चीनची कोरोना लॅब, बाइडेन यांनी दिले 90 दिवसांत पुरावे गोळा करण्याचे आदेश

जयदेव सिंह17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरस कधी आला, कुठून आला आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ घेत आहेत. आतापर्यंत दोन प्रकारच्या थेअरींवर सर्वाधिक बोलले जात आहे. पहिल्या थेअरीमध्ये कुठल्यातरी प्राण्यापासून कोरोना माणसांपर्यंत आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसऱ्या थेअरीमध्ये चीनच्या एखाद्या लॅबमध्ये कोरोना तयार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी एका रिपोर्टनंतर आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मागच्या आठवड्यात आय वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहानच्या लॅबमधील तीन शास्त्रज्ज्ञांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. तेव्हा चीनने जगाला कोरोना महामारीबद्दल सांगितले नाही.

कोरोनाच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत काय-काय सांगण्यात आले आहे ? चीनमधील वुहानच्या लॅबमुळे वाद का होत आहे ? लॅबच्या शास्त्रज्ज्ञांबद्दल केलेल्या दाव्याचा आधार काय आहे ? याबाबत चीनने काय सांगितले ? प्राण्यांमधून कोरोना आल्याच्या दाव्याचे काय झाले ? जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे...

चीनमधील वुहान लॅब चर्चेत का?

चीनमधील वुहान शहरातील वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी एक हाय सिक्योरिटी रिसर्च लॅब आहे. या लॅबमध्ये वातावरणात आढळणारे आणि माणसांसाठी धोकादायक असलेल्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसवर अभ्यास केला जातो. 2002 मध्ये चीनमध्ये आढळलेल्या SARS-CoV-1 व्हायरसने जगभरातील 774 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या लॅबमध्ये वटवाघुळातून माणसांमध्ये होणाऱ्या संक्रमणावर अभ्यास झाला. याच लॅबमध्ये झालेल्या अभ्यासात दक्षिण-पश्चिम चीनमधील वटवाघुळांच्या गुफेत SARS सारखे व्हायरस आढळले होते.

या इंस्टीट्यूटमध्ये प्रयोगासाठी जंगली जनावरांच्या शरीरातून जेनेटिक मटेरियल घेतले जातात. याशिवाय, जनावरांमध्ये व्हायरस सोडून लाव्हव प्रयोगदेखील केले जातात. या लॅबमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ज्ञांना कडक नियमांचे पालन करावे लागते.

लॅबमधून कोरोना पसरला ?
काही शास्त्रज्ज्ञांचे म्हणने आहे की, लॅबमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे व्हायरस लॅबबाहेर आला, या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वुहानची ही लॅब हुनान सीफूड मार्केटपासून काही अंतरावरच आहे. याच मार्केटमध्ये सर्वात आधी कोरोना व्हायरस आढळला होता. आतापर्यंत कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्राण्यावर परिणाम झालेला आढळून आला नाही.

दरम्यान, चीन सरकारने लॅबमधून व्हायरस लीक झाल्याचे खंडन केले असून, याचा तपास करण्यासही नकार दिला आहे. यामुळे चीनमध्येच व्हायरस तयार झाल्याच्या थेअरीला बळ मिळत आहे. पण, वुहानच्या लॅबमॅध्ये काम करणारे शास्त्रज्ज्ञ सांगतात की, SARS-CoV-2 बाबत त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही आणि यासंबंधी कुठलाच रिसर्च कधीच लॅबमध्ये झाला नाही. 24 शास्त्रज्ज्ञांनी एक पत्र लिहून WHO ला याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये वुहानमध्ये गेलेल्या WHO च्या टीमचे मिशन अपयशी ठरले होते.

अमेरिका यावर काय म्हणते ?
मागच्या वर्षी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी अनेकदा हा व्हायरस चीनमधून आल्याचे म्हटले. पण, याबाबत त्यांनी कुठलाच पुरावा सादर केला नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याबाबत 90 दिवसात पुरावा शोधण्याचे आदेश दिले आहेत. बायडेन म्हणाले की, मार्चमध्ये त्यांनी कोरोनाच्या उत्पत्तीबाबत रिपोर्ट तयार करण्यास सांगितली होती. त्यांना या महिन्यात रिपोर्ट मिळाली आणि या रिपोर्टच्या आधारे त्यांनी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

तर, अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन गुप्त रिपोर्टच्या हवाल्याने दावा केला आहे की, वुहानच्या लॅबमधील अनेक रिसर्चर नोव्हेंबर 2019 किंवा त्या आधी आजारी पडले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे होती. पण, चीनने त्यावेळी याबाबत जगाला सांगितले नाही. त्या घटनेच्या एका महिन्यानंतर म्हणजेच, डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाची माहिती जगाला दिली.

यापूर्वी अमेरिकेचे आरोग्य मंत्री जेवियर बेसेरांनी वर्ल्ड हेल्थ असेंबलीमध्ये WHO ला म्हटले होते की, कोरोना कुठून पसरला, याच्या तपासातील पुढीलटप्पा 'पारदर्शी' असायला हवा. बेसेराने चीनचे नाव न घेताल, WHO च्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. पण, चीनने या सर्व बातम्यांचे खंडन केले. यानंतर चीनने अमेरिकेवरच हा व्हायरस तयार केल्याचा आरोप लावला.

WHO च्या पथकाला चीनमध्ये काय मिळाले ?
यावर्षी जानेवारीमध्ये WHO ची टीम वुहानमध्ये गेली होती. एप्रिलमध्ये या टीमने आपली रिपोर्ट सादर केली, पण यात काहीच निष्पन्न झाले नाही. यात कोरोनाच्या उत्पत्तीबाबतही काही सांगण्यात आले नाही. मागील दोन वर्षांमध्ये जे लोकांना सांगण्यात आले, त्याच गोष्टी या रिपोर्टमध्ये लिहील्या होत्या. यात व्हायरस प्राण्यांमधून आल्याचे म्हटले गेले. या रिपोर्टनंतर चीनच्या दबावात ही रिपोर्ट तयार करण्यात आल्याचा आरोपली लागला.

बातम्या आणखी आहेत...