आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:वॉल्व मास्कचा वापर करु नका, इतर सर्व मास्क कोरोनापासून बचाव करण्यास 50 ते 95% इफेक्टिव्ह, जाणून घ्या प्रत्येक मास्कचा इफेक्टिव्हनेस

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • N95 मास्क कोरोना व्हायरससारख्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला मास्क मानला जातो.

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरमयान पुन्हा एकदा मास्क घालण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. मात्र कोणते मास्क कुणासाठी जास्त योग्य असेल, कोणते जास्त इफेक्टिव्ह असेल, हे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. चला तर मग जाणून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे मास्क, त्याचा इफेक्टिव्हनेस आणि वापराविषयी...

मास्क किती प्रकारचे असतात?
ढोबळमानाने पाहिले तर दोन प्रकारचे मास्क असतात. पहिला सर्जिकल मास्क ज्याचा वापर आरोग्य कर्मचारी करतात. दुसरा, फॅब्रिक किंवा कपड्याने बनवलेला मास्क, ज्याचा वापर सामान्य लोक करतात.

सर्जिकल मास्क

कोणासाठी आहे : आरोग्य कर्मचारी

कुठे घालावे : अशा ठिकाणी जेथे कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि फिजिकल डिस्टेंसिंग खूप अवघड आहे.

अजून कोण घालू शकते : असे लोक ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्याची प्रकृती खराब आहे, ज्यांना कोरोनाचे लक्षण आहेत किंवा जे संक्रमितांची देखरेख करत आहेत.

फॅब्रिक मास्क
(कपड्याचे मास्क)

कुणासाठी : सामान्य लोकांसाठी

कुठे घालावे : कामाच्या ठिकाणी, ग्रॉसरी स्टोर, बस, शेअर टॅक्सी आणि गर्दीच्या ठिकाणी.

कोण घालू शकते : कोरोना संक्रमित परिसरातील लोक, असे लोक ज्यांच्यात कोरोनाचे लक्षण आहेत आणि जेथे फिजिकल डिस्टेंसिंग अवघड आहे.

कोणता मास्क कोरोना व्हायरस रोखण्यात किती टक्के इफेक्टिव्ह आहे?
N95 मास्क कोरोना व्हायरससारख्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सर्वात चांगला मास्क मानला जातो. हा सहजपणे तोंड आणि नाकावर फिट होतो आणि बारीक कणांनाही नाक किंवा तोंडात जाण्यापासून रोखतो. हे हवेतील 95 टक्के कणांना रोखण्यात सक्षम आहे यामुळे याचे नाव N95 आहे. तर सामान्य सर्जिकल मास्कही जवळपास 89.5% टक्के कणांना थांबवण्यात सक्षम आहेत. हे दोन्ही मास्क हेल्थ केअर वर्कर्ससाठी असतात.

सामान्य लोक वापरत असलेल्या तीन लेअर असणारे फॅब्रिक मास्कही बारी कणांना जवळपास 94% रोखतात.

कोणता मास्क किती प्रभावी आणि कुणासाठी

मास्कमोठे ड्रॉपलेट्सला फिल्टर करण्याची क्षमताछोट्या एयरोसॉलला फिल्टर करण्याची क्षमताकोणी आणि कुठे घालायला हवे
N9599.9%95%आरोग्य कर्मचारी
सर्जिकल मास्क98.5%89.5%आरोग्य कर्मचारी
हायब्रिड मास्क96%94%सामान्य लोक, इंडोर किंवा गर्दीच्या ठिकाणी
टू लेअर कॉटन मास्क99.5%82%सामान्य लोक, इंडोर किंवा गर्दीच्या ठिकाणी
सामान्य सुती मस्क98%72.5%खुल्या ठिकाणांवर
100% कॉटन टी-शर्टचे मास्क97%51%खुल्या ठिकाणांवर
सिल्कच्या कपड्याचे मास्क56%54%खुल्या ठिकाणांवर
स्कार्फ किंवा गमछा44%49%जेव्हा तुमच्याकडे काहीच नसेल
वाल्व असणारे मास्क90%90%कधीच नाही

अनेक लोक डबल मास्क घालतात, याचा फायदा काय?
ड्यूक यूनिव्हर्सिटीचे डॉक्टर बिके स्मिथ म्हणतात की, डबल मास्क घातल्याने कोणतेही नुकसान होत नाही. मात्र दोन मास्क घालणे थोडे असहज होते, मात्र जर तुम्हाला हे सोपे वाटत असेल तर तुम्ही पहिले मेडिकल मास्क लावायला हवे. त्याच्यावर तुम्ही कपड्याचे मास्क लावावे.
WHO ने मास्क घालण्याची योग्य पध्दत सांगितली आहे, त्यानुसार...

  • मास्क घालण्यापूर्वी आणि ते काढल्यानंतर हात स्वच्छ करायला हवे.
  • हे लक्षात ठेवा की, मास्क तुमचे नाक, तोंड आणि चिन पूर्णपणे कव्हर करेल.
  • तुम्ही जेव्हा मास्क काढाल तेव्हा ते एका स्वच्छ प्लास्टिक बॅकमध्ये स्टोअर करा.
  • कापडाचा मास्क प्रत्येक दुसर्या दिवशी धुवा आणि मेडिकल मास्कला ट्रॅश बिनमध्ये टाका.
  • वॉल्व असणारे मास्क कधीच वापरु नका.
बातम्या आणखी आहेत...