आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओमायक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जगातील 55 हून अधिक देशांमध्ये पसरल्याने चिंता वाढली आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन भारतासह 59 देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत जगभरात याची 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच 78,064 पॉझिटिव्ह केसेस आहेत ज्यांना ओमायक्रॉन संशयित विचारात घेऊन तपासाधीन ठेवण्यात आले आहे. भारतातही ओमायक्रॉनची 30 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्याच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, असे औषध तयार केले गेले आहे, जे या नवीन व्हेरिएंटच्या 37 म्युटेशनवर प्रभावी आहे.
कोरोनाचे नवीन औषध काय आहे? ओमायक्रॉनमधील म्युटेशनविरूद्ध ते किती प्रभावी आहे? ते कसे कार्य करते आणि ते कोणी बनवले? याविषयी जाणून घेऊया...
ओमायक्रॉनच्या म्युटेशनविरूद्ध प्रभावी नवीन औषध कोणते आहे?
ओमायक्रॉन विरुद्धच्या लढ्यासाठी ब्रिटनची कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (GSK) ने ब्रिटनच्याच फर्म वीर बायोटेक्नोलॉजीसोबत मिळून सोट्रोविमाब (Sotrovimab) नावाचे मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध तयार केले आहे.
सोट्रोविमाब नावाचे हे औषध जेवुडी (Xevudy) या ब्रँड नावाने विकले जाते. कोविडची लक्षणे गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी हे औषध लोकांमध्ये वापरले जाते. तसेच, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी ते प्रभावी आहे.
गेल्या आठवड्यातील प्री-क्लिनिकल डेटावरून असे दिसून आले आहे की, औषधापासून बनविलेले मोनोक्लोनल अँटीबॉडी ओमायक्रॉनच्या 37 म्युटेशनविरूद्ध प्रभावी ठरले आहे.
हे औषध कसे कार्य करते?
या औषधाच्या वापरामुळे शरीरात विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात, तर त्यात असलेले अँटीव्हायरल विषाणूच्या वाढीच्या दरात अडथळा आणतात. या नवीन थेरपीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ती कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावरील स्पाइक प्रोटीनशी जोडते. स्पाइक प्रोटीनद्वारेच विषाणू मानवी पेशीचे प्रवेशद्वार उघडतो.
ओमायक्रॉन विरूद्धच्या या नवीन मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधाची प्रयोगशाळेत कृत्रिम व्हायरस (स्यूडो-व्हायरस) विरूद्ध चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये असे दिसून आले की, गॅलेक्सोचे अँटीबॉडी उपचार, सोट्रोविमाब (Sotrovimab), ओमायक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 37 म्युटेशनविरूद्ध प्रभावी आहे.
औषधांच्या चाचण्यांदरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा धोका 79 टक्क्यांनी कमी झाला. या महिन्यात या औषधाला यूकेच्या नियामकांकडून मंजुरी मिळाली आहे. ब्रिटनने त्याच्या एक लाख डोसची ऑर्डर आधीच दिली आहे.
या औषधाने ओमायक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी नवीन आशा का निर्माण केल्या?
ओमायक्रॉनमुळे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता
24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता, त्यानंतर भारतासह 55 हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. अभ्यासावरुन या नवीन व्हेरिएंटपासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका बीटा आणि डेल्टा पेक्षा तीनपट अधिक आहे. ओमायक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे मुलांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे आणि दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर 5 वर्षांखालील मुलांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अलीकडील साप्ताहिक अहवालात पुन्हा एकदा जगाला ओमायक्रॉनबद्दल चेतावणी दिली आहे आणि याविषयी गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. 59 देशांमध्ये पसरलेल्या या नवीन प्रकाराबाबत डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आताही जगभरातील सरकारांनी या नवीन व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले नसेल तर ते घातक ठरेल.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, प्राथमिक डेटामध्ये ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाले नसले तरी हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने जगभरात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, ओमायक्रॉनची लागण झाल्यास बरे होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो आणि बरे झाल्यानंतर कोविड नंतरचे आजार होण्याचा धोका जास्त असू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.