आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका टीमने जानेवारी आणि फेब्रुवारीचे 27 दिवस वुहान (चीन) येथे घालवले. तेथे कोविड - 19 अखेर कोठून आला याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या टीमने एक अहवाल तयार केला आहे, परंतु या अहवालातून काहीही स्पष्टपणे सांगितले गेलेले नाही. डब्ल्यूएचओच्या अहवालात काहीतरी 'मिसिंग' आहे असे म्हटले गेले आहे. आता या हरवलेल्या दुव्याबद्दल डब्ल्यूएचओकडे काहीही सांगण्यासारखे नाही.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये नवीन कोरोना विषाणू समोर आला होता. त्याचे नाव कोविड - 19 होते आणि तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला. प्रत्येक टप्प्यावर पडताळणी करुन अखेर हा कोरोना विषाणू कोठून आला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला हा विषाणू वटवाघळांमधून आला असे म्हटले गेले. यात तथ्य देखील आहे, कारण त्यांच्यात SARS-CoV-2 सारखे व्हायरस होते, ज्यामुळे कोविड - 19 होते. पण नंतर असे सांगितले गेले की, वटवाघळूंमध्ये जो कोरोना व्हायरस आढळतो, त्याच्यात आणि कोविड 19 मुळे तयार होणा-या विषाणू यांच्यात खूप फरक आहे. मग असा अंदाज व्यक्त केला गेला की, वटवाघळूमधून निघालेला विषाणू एखाद्या प्राण्यात गेला, तेथे तो वाढला आणि नंतर प्राणघातक मार्गाने मानवांमध्ये पसरला. काही अहवालांमध्ये असाही दावा केला आहे की हा व्हायरस चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला. परंतु डब्ल्यूएचओच्या 127 पानांच्या अहवालात हा दावा पूर्णपणे खोडून काढण्यात आला आहे.
चला तर मगल आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार, नवीन कोरोना विषाणूसाठी कोणकोणत्या प्राण्याला दोष दिला गेला, ते जाणून घेऊयात...
चिनी शास्त्रज्ञ म्हणाले- साप
नवीन कोरोना विषाणूसाठी सर्वप्रथम ज्या प्राण्यावर संशय व्यक्त केला गेला तो प्राणी म्हणजे साप होता. हा विषाणू प्रथम चीनमध्ये पसरला, म्हणून जानेवारी 2020 मध्ये चिनी अॅकॅडमी ऑफ
सायन्सेसने एक संशोधन केले. यात सर्वप्रथम असे नोंदवले गेले की SARS-CoV-2 हा विषाणू वटवाघळांमध्ये आढळणा-या विषाणूसारखा आहे. वटवाघळांना कोरोना विषाणूचे 'नेटिव्ह होस्ट' देखील म्हटले जाते.
मग शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूचे इतर अनेक प्रकार वटवाघळांमध्ये आहेत. वटवाघळांमधूनच हा विषाणू इतर प्राण्यापर्यंत पोहोचला. तो याचा इंटरमीडिएट होस्ट बनला.
जर्नल ऑफ मेडिकल व्हायरोलॉजीमध्ये आणखी एक संशोधन समोर आले. यात असा दावा केला गेला आहे की नवीन कोरोना विषाणू सापांमधून पसरला. चीनमध्ये साप मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात, म्हणून हा दावा अनेक स्तरांवर मान्य करण्यात आला. परंतु काही तज्ज्ञांनी सांगितले की, हे सत्य नाही. SARS प्रमाणेच कोरोना विषाणू देखील सस्तन प्राण्यांद्वारे पसरला असावा. हा सापातून पसरलेला नाही.
मग समोर आले दुसरे नाव - पँगोलिन
सापाला दोषी ठरवल्याच्या एका महिन्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये साऊथ चीन अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीचा अहवाल आला. त्यात म्हटले आहे की, विलुप्त होणारा पँगोलिन हा प्राणी वटवाघूळ आणि मानव यांच्यात कोरोना विषाणूसाठी हरवलेल्या दुव्याचे काम करतोय. चिनी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात पँगोलिनचा वापरल केला जातो. त्यानुसार, यावर काही दिवस संशोधन झाले. वुहानच्या हुनान सीफूड मार्केटला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. या बाजारात पँगोलिनची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण पेंगोलिन या विषाणूसाठी दोषी आहे की नाही, याची पुष्टी नंतर मिळू शकली नाही.
कुत्रा आणि मांजरीवरही संशय
नवीन कोरोना विषाणू फेब्रुवारी 2020 मध्ये हाँगकाँगला पोहोचला. तिथे एका श्वानाला क्वारंटाइन केले गेले. त्याचा मालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. चाचणी घेतल्यानंतर असे आढळले की श्वानालाही कोरोनाची लागण झाली आहे.
यानंतर, मांजरींमध्येदेखील कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला. फेरेट्स आणि हॅमस्टरबरोबरच पिंज-यात बंदिस्त असलेले सिंह व वाघही पॉझिटिव्ह झाले होते. मग शास्त्रज्ञांनी सांगितले की, पाळीव जनावरांना विषाणूची लागण होऊ शकते परंतु ते संसर्ग पसरवू शकत नाहीत.
मिंक्सद्वारे मानवांमध्ये पसरला संसर्ग
बर्याच देशांमध्ये मौल्यवान फरांसाठी मिंक्सची पैदास होते. जून 2020 मध्ये डब्ल्यूएचओने असा दावा केला आहे की, मिंकमधून नेदरलँड्समधील कर्मचार्यांना हा संसर्ग झाला. प्राण्यांपासून मानवांमध्ये विषाणूचे संक्रमण होण्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले गेले. ही फक्त एक सुरुवात होती. कोविड -19 ची प्रकरणे डेन्मार्क, फ्रान्स, ग्रीस, इटली, लिथुआनिया, स्पेन आणि स्वीडन यासह युरोपियन संघाच्या अनेक देशांमध्ये आणि अमेरिकेतील मिंक फार्ममध्ये आढळली. त्यानंतर जुलै 2020 मध्ये हजारो मिंक्स मारले गेले. नेदरलँड्समध्ये वर्षाच्या अखेरीस संपूर्ण उद्योगावर बंदी घालण्याचा आदेश होता. लाखो मिंक्स याकाळात मारले गेले.
डेन्मार्कमध्ये लोकांपेक्षा तीन पट जास्त मिंक होते. तेथे नोव्हेंबरमध्ये 15 ते 17 दशलक्ष मिंक मारण्याचे आदेश देण्यात आले. कोपेनहेगनने चेतावनी दिली की मिंकद्वारे झालेले म्युटेशन 'क्लस्टर 5' लसीची कार्यक्षमता कमी करु शकते.
दुवा अद्याप मिसिंग आहे...
WHO च्या आंतरराष्ट्रीय तज्ञांची टीम जानेवारीत वुहानमध्ये आली तेव्हा अनेक प्राणी कोरोना विषाणूसाठी दोषी असल्याचे विविध संशोधनातून समोर आले होते. डब्ल्यूएचओच्या अहवालातील लिक झालेल्या गोष्टीनुसार, हा विषाणू वटवाघळूंमधून मनुष्यापर्यंत पोहोचला. दरम्यान यांच्यात एक इंटरमीडिएट होस्ट होता, जे अद्याप मिसिंक लिंक आहे.
मग हा कोरोना विषाणू मनुष्यात कसा आला?
WHOच्या अहवालात चार मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत-
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.