आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Coronavirus Origin Wuhan Connection | World Health Organization (WHO) Plan Rejects By China Xi Jinping Government

एक्सप्लेनर:कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली, याची पुन्हा चौकशी करण्याचा WHO चा प्रस्ताव चीनने धुडकावला; लॅब लीक थिअरी खरी ठरली तर पुढे काय होईल?

जयदेव सिंह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठून झाली? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर आपण चीन असे देऊ. पण याबाबत अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत. जगातील महासत्ता अमेरिका या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने चीनमध्ये जाऊन याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला त्यांच्या हाती काहीच लागले नाही. कोरोना विषाणूचा उगम प्रयोगशाळेत झाल्याच्या निष्कर्ष आधीच चीनने फेटाळला आहे.

16 जुलै रोजी डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रॉस अधोनोम घेब्रेयसूस यांनी कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपासाचा दुसऱ्या टप्पा सुरू करण्याचा विचार व्यक्त केला होता. मात्र चीनने हा प्रस्ताव धूडकावून लावला आहे. दुसऱ्या टप्प्यात चीनमधील प्रयोगशाळांचीही तपासणी केली पाहिजे, असे मतही घेब्रेयसूस यांनी व्यक्त केले होते. मात्र चीनने याला विरोध केला असून कोरोनाच्या उगमाचा अभ्यास पुन्हा करण्याचा ‘डब्लूएचओ’चा प्रस्ताव धुडकावला आहे. अमेरिका व अन्य देशांकडून चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या प्रयोगशाळेची चौकशी करण्यासाठी दबाव आणली जात आहे.

चीनने पुन्हा चौकशीचा प्रस्ताव का नाकारला? कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य आता कधीही समोर येणार नाही का? डब्ल्यूएचओची टीम पहिल्यांदा वुहानला गेली तेव्हा काय झाले होते? चीनच्या वुहानच्या लॅबवरून वाद का झाला आहे? याबद्दल जगातील देशांचे काय म्हणणे आहे? चला जाणून घेऊया ...

चीनने पुन्हा चौकशीचा प्रस्ताव का धुडकावला?
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपाध्यक्ष झेंग यिक्सिंग म्हणाले की, आम्ही असा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही. हा प्रयत्न एक प्रकारे सामान्यज्ञान आणि विज्ञान या दोन्हींचा अपमान आहे.

चीनचे म्हणणे आहे की, डब्ल्यूएचओ राजकीय दबावाखाली हे सर्व करीत आहे. झेंग म्हणासले, चीनने डब्ल्यूएचओला यापूर्वीच सर्व प्रकारचा डेटा उपलब्ध करुन दिला आहे. आम्ही आशा करतो की, डब्ल्यूएचओ गंभीरपणे चिनी तज्ज्ञांचे मते आणि सूचनांचे पुनरावलोकन करेल. यासह, कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेणे याकडे राजकीय नव्हे तर वैज्ञानिक विषय म्हणून पाहिले गेले पाहिजे.

तर आता कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य कधी समोर येणार नाही?

असं म्हणता येणार नाही. जरी डब्ल्यूएचओचा तपास पुढे जाऊ शकला नाही, तरी अमेरिकन संस्था त्यांच्या पातळीवर तपास करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 26 मार्च रोजी कोरोना विषाणूच्या उगमाबाबत चौकशी करणाऱ्या गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर चीनने नाराजी व्यक्त केली होती. चीनने अमेरिकेवर आरोप लावताना त्यांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची उत्पत्ती झाली असावी असा दावा केला होता.

ऑगस्टच्या अखेरीस अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा आपला अहवाल सादर करेल आणि जर त्यात चीनमधून कोरोनाचा उगम झाल्याचे समोर आल्यास पुन्हा एकदा चीनवर दबाव वाढेल. जर वुहानमधील लॅबमध्ये कोरोना विषाणू लीक झाल्याची बातमी खरी ठरली तर अमेरिका-चीन संबंध बिघडू शकतात. याचा परिणाम चीनच्या आर्थिक व्यवस्थेवरही होईल.

चीनमधील वुहान लॅब चर्चेत का?

चीनमधील वुहान शहरातील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एक हाय सिक्युरिटी रिसर्च लॅब आहे. या लॅबमध्ये वातावरणात आढळणारे आणि माणसांसाठी धोकादायक असलेल्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसवर अभ्यास केला जातो.

2002 मध्ये चीनमध्ये आढळलेल्या SARS-CoV-1 व्हायरसने जगभरातील 774 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या लॅबमध्ये वटवाघुळातून माणसांमध्ये होणाऱ्या संक्रमणावर अभ्यास झाला. याच लॅबमध्ये झालेल्या अभ्यासात दक्षिण-पश्चिम चीनमधील वटवाघुळांच्या गुफेत SARS सारखे व्हायरस आढळले होते.

या इन्स्टिट्यूटमध्ये प्रयोगासाठी जंगली जनावरांच्या शरीरातून जेनेटिक मटेरियल घेतले जातात. याशिवाय, जनावरांमध्ये व्हायरस सोडून थेट प्रयोगदेखील केले जातात. या लॅबमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ज्ञांना कडक नियमांचे पालन करावे लागते.

शास्त्रज्ञांची लॅब थिअरी काय सांगते
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनानुसार, चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत तयार केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. लॅबमधील कर्माचा-यांच्या बेजबाबदारपणामुळे हा विषाणू जगभरात पसरला असे सांगितले जात आहे. हा विषाणू तयार करण्यात आल्यानंतर या विषाणूला रिव्हर्स इंजिनियरिंग व्हर्जनने याला लपवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हा विषाणू वटवाघुळांपासून निर्माण झाला हे दाखवता येऊ शकतो. ब्रिटिश प्राध्यापक एंगस डल्गालिश आणि नॉर्वेतील शास्त्रज्ञांनी डॉ. बिर्गर सोरेनसेन यांच्यासह हे संशोधन केले आहे. आपल्याकडे एक वर्षाहून अधिक काळापासून चीनने रेट्रो-इंजीनिअरिंगचे पुरावे असल्याचा दावा केला. अनेक तज्ज्ञांनी आणि प्रख्यात वैद्यकीय, संशोधन नियतकालिकांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी म्हटले. प्रा. डल्गालिश हे लंडन येथील सेंट जॉर्ज विद्यापीठात कर्करोग विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांना एचआयव्ही वॅक्सिन तयार करण्यासाठी ओळखले जाते. तर, नॉर्वेच वैज्ञानिक डॉ. सोरेनसेन हे महासाथ रोग तज्ज्ञ आहेत. त्याशिवाय ते इम्युनर कंपनीचे अध्यक्ष असून करोनावर लस तयार करत आहेत.

जर ही लॅब लीक थिअरी खरी ठरली तर त्याचा चीनवर काय परिणाम होईल?
प्रयोगशाळेतील लॅब लीक थिअरी खरी ठरली तर काय होईल, आत्ता हे सांगणे फार कठीण आहे, पण जर हा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध झाले तर जगाच्या ट्रेडवरही त्याचा परिणाम होईल, हे निश्चित आहे. चीनबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलेल. त्याला अनेक प्रकारच्या आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.

असो, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी कोरोना पसरवल्याबद्दल चीनला दोष देत 10 लाख कोटी डॉलर्स (744 लाख कोटी रुपये) ची नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, चीनने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला. आता तपासात जर चीनच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार झाल्याचे सिद्ध झाले तर अमेरिका आणखी मोठ्या नुकसानभरपाईची मागणी करू शकते. यासह जगातील इतर देशांचा दबावही चीनवर पडेल.

चीनमध्ये गेलेल्या WHO च्या पथकाला काय मिळाले होते?
यावर्षी जानेवारीमध्ये WHO ची टीम चीनच्या वुहान शहरात गेली. एप्रिलमध्ये या पथकाने आपला अहवाल दिला, परंतु या अहवालात काहीच निष्पन्न झाले नाही. यात कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी कोणतेही निश्चित निष्कर्ष काढले गेले नाहीत. मागील दोन वर्षांत जे लोकांना सांगण्यात आले, त्याच गोष्टी या अहवालात सांगितल्या गेल्या. या अहवालात असे म्हटले आहे की, चीनमधील लोकांना या विषाणूची लागण कशी झाली हे माहित नाही. हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत आला आहे. यासह, या व्हायरसची उत्पत्ती प्रयोगशाळेत होण्याची शक्यताही नगण्य आहे. WHO वर चीनच्या दबावात रिपोर्ट तयार करण्यात आल्याचा आरोपलीही लागला.

याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे?
काही शास्त्रज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लॅबमधील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे व्हायरस लॅबबाहेर आला, या शक्यतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वुहानची ही लॅब हुनान सीफूड मार्केटपासून काही अंतरावरच आहे. याच मार्केटमध्ये सर्वात आधी कोरोना व्हायरस आढळला होता.

आतापर्यंत कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्राण्यावर परिणाम झालेला आढळून आला नाही. दरम्यान, चीन सरकारने लॅबमधून व्हायरस लीक झाल्याचे खंडन केले असून, याचा तपास करण्यासही नकार दिला आहे. यामुळे चीनमध्येच व्हायरस तयार झाल्याच्या थेअरीला बळ मिळत आहे. पण, वुहानच्या लॅबमॅध्ये काम करणारे शास्त्रज्ज्ञ सांगतात की, SARS-CoV-2 बाबत त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही आणि यासंबंधी कुठलाच रिसर्च कधीच लॅबमध्ये झाला नाही.

प्राण्यांपासून मानवांमध्ये कोरोना पसरवण्याच्या सिद्धांताचे समर्थन करणा-यांचे काय म्हणणे आहे? ब-याच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या विषाणूची उत्पत्ती एखाद्या प्रयोगशाळेपेक्षा नैसर्गिकरित्या होण्याची शक्यता अधिक आहे. कोरोना विषाणूवर काम करणारे स्क्रीप्स रिसर्चचे शास्त्रज्ञ क्रिस्टन जी. अँडरसन यांचे म्हणणे आहे की, इबोला आणि इतर रोगजनक विषाणू प्राण्यांपासून मनुष्यांत आले. या विषाणूंच्या जिनोम सीक्वेन्समधून कोरोना पसरण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...