आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Coronavirus Positive Patients Guide All You Need To Know | Coronavirus Home Isolation | What To Cure At Home If Found Corona Positive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:सर्दी-खोकला असल्यास रुग्णालयात धाव घेण्याची गरज नाही; जाणून घ्या कोरोनाची लक्षणे कशी ओळखावी, रूग्णालयात कधी दाखल व्हावे आणि कुणाला पडू शकते ऑक्सिजनची गरज

आबिद खान10 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आता आक्राळविक्राळ रुप घेतले आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णांची आणि मृत्यूची आकडेवारी वाढत चालली आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे आणि उपचारांविषयी सामान्य लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. गेल्या काही दिवसांत डॉक्टरांनी देखील सर्दी-खोकल्याला कोरोना असल्याचे समजून रुग्णालयांकडे धाव घेऊ नका, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना गरज नाही त्यांनीदेखील रेमेडिसिवीरचा साठा करुन ठेवल्याने या औषधाची कमतरता भासू लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. तज्ज्ञांचे मते कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नसते, जवळजवळ 90 टक्के रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जाऊ शकतात. आम्ही डॉ. व्ही.के. भारद्वाज आणि डॉ. पूनम चंदानी यांच्याशी बातचीत करुन रूग्णाला रूग्णालयात कधी दाखल करावे आणि त्याला ऑक्सिजन, रेमडिसिवीर इत्यादीची गरज कधी पडू शकेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

85 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे होत आहेत...

 • स्वतःला होम आयसोलेट कधी करावे?
 1. जेव्हा तुम्ही एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला कोणतीही लक्षणे नसली तरी देखील स्वतःला आयसोलेट करुन घेणे योग्य ठरते.
 2. जर तुम्ही एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला नसाल, मात्र तुम्हाला ताप, घसा दुखणे, थकवा, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे असतील तर स्वतःला आयसोलेट करा.
 3. तुम्ही तुमची कोविड टेस्ट करुन घेऊ शकता. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्यास आणि तुमची ऑक्सिजनची पातळी 93 हून अधिक असल्यास तुम्ही होम आयसोलेशनमध्ये बरे होऊ शकता.
 • होम आयसोलेशन म्हणजे विश्रांती
 1. तज्ज्ञांच्या मते, होम आयसोलेशनमध्ये विश्रांती खूप गरजेची आहे. थकवा येईल, अशी कोणतीही कामे करु नका, भरपूर झोप घ्या.
 2. याकाळात शरीराला प्रोटीनची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे हाय प्रोटीन डाएट घ्या.
 3. फळ खा, ज्युस प्या. पण ज्युस घेताना त्यात बर्फ टाकू नका.
 4. घरातील सदस्यांपासून दूर राहा. तुमच्या वापरात असलेल्या वस्तू घरातील इतर सदस्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
 5. फिजिशियनच्या सल्ल्यानुसार, औषधे आणि काढा घेऊ शकता.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घ्या...

 • रुग्णालयात कधी दाखल व्हावे लागते?
 1. श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा दम लागत असेल.
 2. शरीरातील ऑक्सिजनची पातळी 95 वरुन घसरुन 90 वर आली असेल
 3. तुमचे वय 60 वर्षांहून अधिक असेल आणि तुम्हाला इतर काही आजार असेल
 4. येथे रुग्णालयात दाखल होण्याचा अर्थ तुम्हाला थेट ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडतेय, असा नाही. या सर्व परिस्थितीत तुमच्यावर आयसीयू आणि व्हेंटिलेटरविना उपचार होऊ शकतात.
 • ICU किंवा व्हेंटिलेटरची गरज कधी भासते?
 1. जेव्हा तुमच्या फुफ्फुसांना 50 टक्क्यांहून अधिक संसर्ग झाले असेल.
 2. शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरुन 90 हून कमी झाली असेल.
 3. रेमडिसिवीरची गरज आहे की नाही हे डॉक्टर ठरवतात.
 • हे करु नका
 1. कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरासोबतच मन शांत राहणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.
 2. मोबाइल आणि कोरोनापासून दूर राहण्याचा सल्ला यासाठी की यामुळे तुम्ही कोरोनाशी संबंधित बातम्यांपासून दूर राहू शकता.
 3. आपली ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासू नका, असे केल्याने मानसिक ताण निर्माण होतो.
 4. कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यदेखील निरोगी असणे गरजेचे असते.
बातम्या आणखी आहेत...